काळाराम मंदिर सत्याग्रह
काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या नेतृत्वाखाली २०मार्च इ.स.१९३१ रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील काळा राम मंदिरराच्या प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता.
इतिहास
१७८२ साली सरदार रंगाराव ओढेकरानी सुमारे तीस लाख रुपये खर्च करुन नाशिकात हे मंदिर बांधुन घेतले. दरवर्षी रामनवमीला या मंदिरातून रथयात्रा निघत असे. मंदिरातील हे रथ स्पृश्य व अस्पृश्य दोघांनी मिळून ओढण्याची प्रथा सुरुवातीपासुनच चालत आलेली होती. पुण्यातील पेशवे माधवराव यांच्या मातोश्री गोपीकाबाई या मुळच्या नाशिकच्या. त्यांच्या माहेरचे आडनाव रास्ते. त्यानी या मंदिराला दोन रथ भेट दिले होते. पुढे त्या दोन्ही रथाची देखभाल व इतर खर्च याची जबाबदारी रास्त्यांवरच होती. आज मात्र अस्पृश्यांनी थेट मंदिरात प्रवेश मिळावा म्हणुन सत्याग्रह करण्याची भीम गर्जना केली. त्यामुळे राम बाटणार म्हणुन सनातन्यानी दंड थोपटले.
१९३० वर्ष नवीन विचारांचे, प्रतिकाराचे, पराक्रमाचे व दोन जगप्रसिद्ध सत्याग्रहाचे म्हणुन भारताच्या इतिहासात अनंतकाळापर्यंत आठवला जाणारे असे हे अप्रतीम वर्ष. २ मार्च १९३० ला बाबासाहेबानी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरु केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला म. गांधी यानी दांडीयात्रा सुरु केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता. गांधीची सगळी समिकरण शेवटी संवर्णाना लाभदायक ठरणारी तर बाबासाहेबांची अस्पृश्याना किमान माणुस म्हणुन स्विकारावे याची. गांधीचा लढा परकीयांशी होता तर बाबासाहेबांचा स्वकीयासारखे दिसणारे पण पराकोटीचं परकियत्व बाळगणा-या ऐत्तद्देशीयांशी होता. गांधी हे गूढ व्यक्तीमत्व होते तर बाबासाहेब स्पष्टवक्ते होते. गांधी हे भारतातील अत्यंत धनाढ्य लोकाना पाठिशी घेऊन चालणारे एक अतीश्रीमंत नेते होते तर बाबासाहेब पै पै साठी मोताज अशा दरिद्री लोकांचे नेते होते. एका साम्य दोन्हीकडे होते, करोडोची किंमत ओवाळून टाकावा अशी निष्ठावानांची फौज दोघांकडे होती. चळवळीत इतर सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो निष्ठावाणांचा येथे दोन्हीकडचे निष्ठावान सर्व ताकत झोकून देण्यास होते.
काळाराम मंदिर सत्याग्रह
१५ नोव्हे १९२९ च्या बहिष्कृत भारतात बाबासाहेबानी एक झणझणीत अग्रलेख लिहला. “सर्वच स्पृश्य हिंदुंच्या जनतेचे मतपरिवर्तन झाल्याशिवाय मंदिर प्रवेश नसावा असे जर त्यांचे मत असेल तर अस्पृश्यांना अनंत कालापर्यंत थांबावे लागणार. सत्याग्रह करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जो पर्यंत हिंदु म्हणुन या समाजाचा आहोत तो पर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बाजावुनच दम घेऊ” अशा अर्थाचा अग्रलेखा झडकल्यावर सारे सनातनी पेटुन उठले.
पुण्यातील अस्पृश्यांनी चालविलेला पर्वती मंदिर सत्याग्रहाच्या अपयशानी बाबासाहेब बरेच अस्वस्थ झाले. सनातन्यानी अस्पृश्यांवर दगडफेक करुन जखमी केले. राजभोज तर थेट दवाखान्यात पोहचले होते. वार पुण्यात झाला पण जखम तिकडे मुंबईत बाबासाहेबांच्या हृदयात झाली. आता मात्र ही चळवळ बाबासाहेब स्वत: चालविण्याच्या विचारात होते. सनातन्यांचे धार्मिक नाकम्हणजे नाशिक. बाबासाहेबानी या वेळेस यांचा नाकच दाबायचा संकल्प केला. नाशिक म्हणजे सनातन्यांचे अत्यंत महत्वाचे तिर्थस्थान. धर्माचा श्वासच कोंडवुन सोडायला एकंदरीत आराखडा आखण्यात आला. १७ नोव्हे. १९२९ देवळाली येथे सभा घेण्यात आली. येथे महारांचा एक संघ स्थापण करण्यात आला. संभाजी रोकडे या सभेचे अध्यक्ष होते व दादासाहेब गायकवाड हे चिटणीस होते. नाशिकच्या सत्याग्रहाची पहिली रुपरेषा येथे ठरली.
No comments:
Post a Comment