चालू घडामोडी : १३ ऑगस्ट
‘पवनहंस’च्या विक्रीला मंजुरी
• सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार कंपनी ‘पवनहंस लिमिटेड’ची विक्री करण्यासाठी सरकारने वित्त व्यवहार, कायदेशीर सल्लागार आणि मालमत्ता मूल्यमापकाची नेमणूक केली आहे.
• पवनहंस ही सरकारी कंपनी असून, नफा कमावत आहे. तिच्यात धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्यास अर्थव्यवहार मंत्रिमंडळ समितीने गेल्या वर्षी तत्त्वत: मान्यता दिली होती.
• मंत्रिमंडळ समितीने पवन हंसमधील सरकारच्या हिस्सेदारीची १०० टक्के विक्री करण्यास परवानगी दिली आहे. धोरणात्मक खरेदीदार ही हिस्सेदारी विकत घेऊ शकेल.
• मात्र, आतापर्यंत नफ्यात असलेल्या पवनहंस या कंपनीच्या निर्गुंतवणुकीस संसदीय समितीने आक्षेप घेतला आहे.
• हेलिकॉप्टरची सेवा पुरविणारी पवन हंस ही कंपनी केंद्र सरकार आणि सरकारी मालकीची ओएनजीसी ही कंपनी यांच्या संयुक्त मालकीची आहे. १९८५ मध्ये पवनहंसची स्थापना करण्यात आली होती.
• या कंपनीमध्ये ९०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ४५० कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. उरलेले कर्मचारी हंगामी स्वरूपाचे आहेत.
• या कंपनीमध्ये ९०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ४५० कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. उरलेले कर्मचारी हंगामी स्वरूपाचे आहेत.
बाबा रामदेववर आधारित पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती
• योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित ‘गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव’ या पुस्तकाच्या विक्रीला दिल्लीमधील न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
•प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तर जगरनॉट बुक्सने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
• बाबा रामदेव यांचा हरियाणामध्ये जन्म घेण्यापासून ते एक यशस्वी व्यवसायिक होण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकामध्ये
सांगण्यात आला आहे. यामध्ये त्यांचे सहकारी बाळकृष्ण तसंच इतरांबद्दलही सांगण्यात आले आहे.
सांगण्यात आला आहे. यामध्ये त्यांचे सहकारी बाळकृष्ण तसंच इतरांबद्दलही सांगण्यात आले आहे.
• न्यायालयाने प्रकाशक किंवा लेखकाची बाजू ऐकून न घेताच पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीला स्थगिती दिल्याने प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या मदर तेरेसा डॉ. रुथ फाऊ यांचे निधन
• पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्टर रुथ फाऊ
यांचे वयाच्या ८५व्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
यांचे वयाच्या ८५व्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
• ८५ वर्षाच्या होत्या.तसेच त्या पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून प्रसिद्ध होत्या.
• डॉ. फाऊ या १९६०मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून, त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.
• नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी १९६२मध्ये कराचीमध्ये ‘मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर’ स्थापन केले आणि या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत.
•त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले.
•त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले.
• पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज त्यांना १९७९मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार १९८९मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना २०१५मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.