• Online Admissions
  • Oneline Gk
  • Home
  • about
  • contact
  • sitemap
  • Job Alerts
  • Privacy policy

Jay Malhar Primary School Bale

Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
    • CURRENT AFAIRS
    • GK
    • Job Alerts
    • Geography
    • History
    • 4 Teachers
    • 4 Student
    • Exams
    • MPSC

    Breaking

    Sports

    Online Admission

    जय मल्हार प्राथमिक शाळा बाळे, सोलापूर.ऑनलाईन प्रवेश प्रकिया-२०२०-२१

    Translate

    Saturday, July 15, 2017

    Home Dinvishesh | दिनविशेष | In the History नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व

    नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व

    Govind Padvi Saturday, July 15, 2017 Dinvishesh | दिनविशेष | In the History,
    Views

    नारायण श्रीपाद राजहंस


    नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.[१]
    बालगंधर्व
    Bal Gandharv.jpg
    नाटकात स्त्री-भूमिकेतील वेशभूषेत नारायण राजहंस (इ.स. १९२४)
    टोपणनावे बालगंधर्व
    आयुष्य
    जन्म जून २६, इ.स. १८८८
    जन्म स्थान नागठाणे, पलुस तालुका सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
    मृत्यू इ.स. १९६७
    व्यक्तिगत माहिती
    धर्म हिंदू
    नागरिकत्व भारतीय
    देश भारत ध्वज भारत
    भाषा मराठी
    पारिवारिक माहिती
    वडील श्रीपाद राजहंस
    जोडीदार गोहर कर्नाटकी
    संगीत साधना
    गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय गायन
    संगीत कारकीर्द
    पेशा गायकी, अभिनय, गायन (संगीत नाटके)
    कारकिर्दीचा काळ इ.स. १९०५ - इ.स. १९५५
    गौरव
    विशेष उपाधी बालगंधर्व
    पुरस्कार पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार

    अनुक्रमणिका

    जन्मसंपादन करा

    नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म जून २६, इ.स. १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यात नागठाणे या गावी झाला.

    कारकीर्दसंपादन करा

    बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.[२]
    बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत इ.स. १९०५ साली आरंभली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या इ.स. १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी इ.स. १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र इ.स. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.
    बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.
    भाऊराव कोल्हटकरांच्या इ.स. १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले. इ.स. १९२९ सालच्या ४२ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
    स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल इ.स. १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. इ.स. १९६७मध्ये बालगंधर्वांच्या मृत्यू झाला. गोहरबाईंनी त्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळण्यातही सहभाग दिला. इ.स. १९५१मध्ये नारायणरावांनी गोहरबाईंशी कायदेशीर विवाह केला.
    त्यांनी संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. इ.स. १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.

    निधनसंपादन करा

    १५ जुलै १९६७ रोजी वृद्धापकाळामुळे व दीर्घ आजाराने बालगंधर्वांचे निधन झाले.

    वारसासंपादन करा

    इ.स. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतिमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्‌घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्या हस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते.[३]

    चरित्रवर्णनसंपादन करा

    चित्र:बालगंधर्व.gif
    बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट १९८८

    साहित्यातूनसंपादन करा

    • मोहन नाडकर्णी (इ.स. २००२). बालगंधर्व: द नॉनपॅरेल थेस्पियन. नॅशनल बुक ट्रस्ट, पृ. ७७. (इंग्लिश मजकूर) 
    • असा बालगंधर्व (कादंबरी, लेखक अभिराम भडकमकर) .या पुस्तकाला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे. (२०१२)
    • असा हा राजहंस (लेखक व्यंकटेश श्रीपाद राजहंस( (२०१७)
    • बालगंधर्व - व्यक्ती आणि कार्य (लेखिका : मोहिनी वर्दे)
    • बालगंधर्व यांचे चरित्र (लेखक : बापूकाका राजहंस)
    • मी पाहिलेले बालगंधर्व (लेखक : बबनराव नावडीकर)
    • गंधर्वगाथा (लेखक : भा. द. खेर)
    • Balgandharva and the Marathi theatre (इंग्रजी, लेखक : ज्ञानेश्वर नाडकर्णी)
    • Bal Gandharva: The Nonpareil Thespian (इंग्रजी, लेखक मोहन नाडकर्णी)

    स्मृतिस्थळेसंपादन करा

    • भिलवडी -नागठाणे (तालुका पलूस) या बालगंधर्वांच्या जन्मस्थानी येथील बालगंधर्व स्मारक समितीतर्फे एक स्मारक उभे केले जात आहे.
    • पुणे शहरात ’बालगंधर्व रंगमंदिर’ नावाचे एक नाट्यगृह आहे.
    • नागठाणे गावात, तासगाव जीवन विकास संस्थेचे ’नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय’ आहे.

    चित्रपट माध्यमांतूनसंपादन करा

    • बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास इ.स. २००२ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.[४]
    • बालगंधर्वांच्या जीवनप्रवासावर नितिन चंद्रकांत देसाई यांनी ' बालगंधर्व ' या चित्रपटाची निर्मिती इ.स. २०११ साली केली. या बालगंधर्वांची भूमिका अभिनेते सुबोध भावे यांनी साकारली आहे.

    पुरस्कारसंपादन करा

    • बालगंधर्वांचा संगीत इ.स. १९५५ साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला.
    • भारत सरकारने बालगंधर्वाना इ.स. १९६४ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले.[५]
    • विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. बालगंधर्व यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

    बालगंधर्व यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारसंपादन करा

    • पुणे महानगरपालिकेतर्फे इ.स. २०११ सालापासून दिला जाणारा बालगंधर्व (मुख्य) पुरस्कार आणि बालगंधर्व सहपुरस्कार
    • ’बालगंधर्व रसिक मंडळा’तर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगैरव पुरस्कार
    • नागठाणेच्या बालगंधर्व समितीतर्फे दरवर्षी नाट्यअभिनय किंवा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या कलावंताला इ.स. २०१० सालापासून बालगंधर्व पुरस्कार व युवा बालगंधर्व पुरस्कार दिले जातात.
    • बालगंधर्व परिवारातर्फे दरवर्षी एका नाट्यकलावंताला बालगंधर्व ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि सुमारे २५ रंगकर्मींना अन्य बालगंधर्व पुरस्कार दिले जातात.



    Tags # Dinvishesh | दिनविशेष | In the History
    Author Image

    About Govind Padvi

    Dinvishesh | दिनविशेष | In the History
    By Govind Padvi - Saturday, July 15, 2017
    Labels: Dinvishesh | दिनविशेष | In the History

    No comments:

    Post a Comment

    Newer Post Older Post Home
    Subscribe to: Post Comments (Atom)

    Your Visiting No.

    Socialize

    • facebook count=3.5k;
      Followers
    • twitter count=1.7k;
      Followers
    • gplus count=735;
      Followers
    • youtube count=2.8k;
      Followers
    • pinterest count=524;
      Followers
    • instagram count=849;
      Followers

    AddToAny

    facebook Page

    notes

    विज्ञान शॉर्ट नोट्स

    १०वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ९वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ८वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ७वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ६वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ५वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    Powered by Blogger.

    ®

    Follow Us

    Recent

    Popular

    • सूत्रसंचालन व भाषणांची PDF
      सूत्रसंचालन व भाषणांची PDF
      भाषणांची PDF भाषणांची नावे  डाउनलोड लिंक   शाळा प्रवेश दिन मराठी सूत्रसंचालन  ...
    •  26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.
      26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.
      आज भारताचा संविधान दिन Constitution Day marathi ,hindi ,english speech. 🍁     मराठी  भाषण : 1   🍁  आज संपूर्ण देशभरता संविध...
    • चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017
      चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017
      चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017 लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत
    • भारताचे संविधान PDF (मराठी, इंग्रजी, हिंदी)
      भारताचे संविधान PDF (मराठी, इंग्रजी, हिंदी)
      Download Indian Constitution in pdf format in Marathi , Hindi and English भारताचे सांविधान .. अभ्यासाची इच्छा असलेल्यांसाठी.... भारत...
    • Student attendance | विद्यार्थी हजेरी [Automatically]
      मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते . प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दि...
    • पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर
      पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर   Baseline Exam Excel software for Result ! ( पायाभूत चाचणीचा रिझल्ट बनवा  5 मिनिटात ! ) ...
    • चौधरी चरण सिंह (जन्म: 23 दिसम्बर, 1902 मेरठ - मृत्यु- 29 मई, 1987)
      चौधरी चरण सिंह (जन्म: 23 दिसम्बर, 1902 मेरठ - मृत्यु- 29 मई, 1987) ”अभी तक सो रहे हैं जो उन्हें आवाज़ तो दे दूँ , बिलखते बादलों को मैं...
    • चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017
      चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017
      चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017 ● लोकसत्ता ● सकाळ ● महाराष्ट्र टाईम्स ● तरुण भारत
    • Micro Teaching and its concepts: Read full story.         माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें.
      Micro Teaching and its concepts: Read full story. माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें.
      माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें 1  माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें 1.1  परिभाषा 1...
    • (no title)
      (no title)
      Evening News 22 December 2017 - Hindi / English / Marathi Hindi केंद्र  ने  चना  और  मसूर  दाल  पर  आयात  शुल्क  में  बढ़ोतरी  की: ...

    Menu

    • Home
    • Geography
    • History
    • Job Alert
    • For student
    • For Tacher
    • Dinvishesh
    • Vocab Express
    • Evening News / Current Affairs

    Labels

    Evening News (658) current affairs (650) CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स (455) current affairs - Marathi (353) Evening News - Marathi (348) One line (319) Dinvishesh | दिनविशेष | In the History (236) Job Alerts (142) एक पंक्ति में (131) एका ओळीत (130) Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) (129) One line-Marathi (121) One line - English (105) One line- Hindi (67) व्यक्ती विशेष (58) science (57) One line- Hindi (45) current affairs- Hindi (39) Evening News- Hindi (33) मराठी बालगीते (32) MPSC (30) Evening News-English (24) PDF (14) शिक्षकांसाठी (12) जनरल नॉलेज (11) इतिहास (10) Job Alerts Maharashtra (9) लेख (9) हेल्थ टिप्स (9) Computer GK (7) History | इतिहास (7) Math's|गणित (7) दैनिक सामान्य ज्ञान | Daily General Knowledge (6) प्रोत्साहन (6) सरल (6) Apps (5) Geography (5) Teach Tips (5) आरोग्य शिक्षण (5) जागतिक दिवस (5) समाजसुधारक; व्यक्ती विशेष (5) सहज सोपे उपक्रम (5) CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स (4) Delhi -Job Alerts (4) कायदे | The laws (4) ADMISSION Form-2020_21 (3) Awards (3) Festival Stories उत्सव कथा (3) International news (3)   (3) कवी (3) तंत्रज्ञान माहिती (3) पायाभूत चाचणी (3) शब्दसंग्रह टिपा (3) शाळा सिद्धी (3) 10th (2) 5th (2) Bank's Information (2) Job Alerts Across India (2) Mhani | म्हणी (2) One line-  Hindi (2) UPSC Jobs Alerts (2) Uttar Pradesh Jobs | उत्तर प्रदेश भर्ती (2) science question & answer bank (2) अहवाल (2) ऑडीओ (2) जानेवारी (2) भारताचा भूगोल (2) भाषणे (2) मराठी व्याकरण (2) महाराष्ट्र (2) मानवी शरीर (2) राज्यशास्त्र (2) विविध शालेय स्पर्धा परीक्षांची माहिती (2) शिक्षक भर्ती (2) सत्याग्रह /आंदोलन / उठाव (2) सराव प्रश्नपत्रिका (2) हिंदी-Gk (2) 1st to 10th PDF Books (1) ACT | नियम | धारा (1) Admit Card | प्रवेश पत्र (1) Banking Jobs (1) Bihar - Job Alerts (1) Civics | नागरिकशास्त्र (1) EVS-1 (1) Economics topic notes | अर्थशास्त्र विषयाच्या नोट्स (1) Environment News (1) Gandhinagar Job Alerts (1) Hariyana Jobs (1) International Day (1) Jharkhand Jobs (1) Job Alerts Chhattisgarh (1) Job Alerts Gujarat (1) Maha Pariksha (1) MahaGenco Engineers (1) Mathematics-5th (1) National News (1) New Dehli Job Alerts (1) Post office Job (1) Pune (1) Question Paper (1) Rajasthan Job Alerts (1) Scholarship Examination | शिष्यवृत्ती परीक्षा (1) Second Semester Practice Question Paper | द्वितीय सत्र सराव प्रश्नपत्रिका (1) Sms (1) Speech (1) Sport Awards | स्पोर्ट पुरस्कार | Khel Puraskar (1) Std- 5th (1) TEST (1) TET/CTET (1) UGC NET (1) Whatsapp stickers (1) conomic (1) mission (1) moon mission (1) occasion (1) pulwama (1) अर्थशास्त्र (1) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020-21 (1) कार्बन फुट - प्रिंट (1) क्रांतिकारक (1) क्रिकेट (1) चित्रकार (1) जगाचा भूगोल (1) ज्ञानरचनावाद (1) टेस्ट (1) थोरांचे जीवनपट (1) नकाशे (1) परिसर अभ्यास-१ (1) पालकांसाठी (1) पुणे | Fergusson College (1) पुरस्कार (1) फर्ग्युसन कॉलेज (1) बैठक (1) बोध कथा (1) भारत का भूगोल (1) मनोगत | Occult (1) मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ (1) महाराष्ट्राचा भूगोल (1) योजना (1) राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय (1) रिजल्ट (1) विद्यार्थ्यांसाठी (1) विशाल टेक्निकल हायस्कूल बाळे (1) शायर (1) शास्त्रज्ञ (1) संविधान (1) स्वच्छ विद्यालय पुरस्कार (1)

    Follow by Email

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner

    All Popular Posts

    • सूत्रसंचालन व भाषणांची PDF
      भाषणांची PDF भाषणांची नावे  डाउनलोड लिंक   शाळा प्रवेश दिन मराठी सूत्रसंचालन  ...
    • 26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.
      आज भारताचा संविधान दिन Constitution Day marathi ,hindi ,english speech. 🍁     मराठी  भाषण : 1   🍁  आज संपूर्ण देशभरता संविध...
    • चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017
      चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017 लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत
    • Student attendance | विद्यार्थी हजेरी [Automatically]
      मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते . प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दि...
    • भारताचे संविधान PDF (मराठी, इंग्रजी, हिंदी)
      Download Indian Constitution in pdf format in Marathi , Hindi and English भारताचे सांविधान .. अभ्यासाची इच्छा असलेल्यांसाठी.... भारत...
    • जळू (Leech, Hirudinea)
      MPSC Science: जळू (Leech, Hirudinea)- मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात "जळू" अ...
    • Micro Teaching and its concepts: Read full story. माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें.
      माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें 1  माइक्रो टीचिंग और इसकी अवधारणाएं : पूरी जानकारी पढ़ें 1.1  परिभाषा 1...
    • पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर
      पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर   Baseline Exam Excel software for Result ! ( पायाभूत चाचणीचा रिझल्ट बनवा  5 मिनिटात ! ) ...
    • जय मल्हार प्राथमिक शाळा बाळे, ता. सोलापूर , जि. सोलापूर . परिसर अभ्यास भाग-१ टेस्ट (इयत्ता-५ वी)
       जय मल्हार प्राथमिक शाळा बाळे,  ता. सोलापूर , जि. सोलापूर .  परिसर अभ्यास भाग-१ टेस्ट  (इयत्ता-५ वी) दिनांक:-२/१०/२०२० वेळ:-११:०० ते ११:३० ...
    • Current affairs | Evening News Marathi Current affairs 15 September 2020 Marathi 15 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स
        Current affairs | Evening News Marathi Current affairs 15 September  2020  Marathi    15 सप्टेंबर   मराठी करेंट अफेयर्स राष्ट्रीय अभियंता ...

    Contact Form

    Name

    Email *

    Message *

    THIS WEBSITE CREATED BY GOVIND RANJIT PADVI | THANKS FOR VISITING All Copyrights By Jay Malharschool Bale