Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 10, 2017

    चालू घडामोडी (10 जुलै 2017)

    Views


    आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुधा सिंगला सुवर्णपदक :

    • भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या 22 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुधाने मिनिट 59.47 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.
       
    • सुधाने 20092011 आणि 2013 च्या स्पर्धेतरौप्यपदकावर समाधान मानले होते. परंतु यंदाच्या स्पर्धेत नुकतीच विवाहबध्द झालेल्या महाराष्ट्र कन्या ललिता बाबरने माघार घेतल्याने तिला सुवर्णपदकाची संधी होती.
       
    • तसेच याशिवाय बहारिनची विश्व आणि आशियाई विक्रमवीर रुथ जेबेट हीचे आव्हानही या स्पर्धेत नसल्याने सुधाचा सुवर्णपदकाचा मार्ग सोपा झाला.

    अहमदाबाद शहरला वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जा :

    • युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.
       
    • पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या 41व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
       
    • अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह20 देशांनी पाठिंबा दिला.
       
    • अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.
       
    • अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची26 सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत.
       
    • तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.

    एनआरएआयच्या अध्यक्षपदी रानिंदरसिंग यांची फेरनिवड :

    • माजी आंतरराष्ट्रीय ट्रॅप नेमबाज रानिंदरसिंग यांचीराष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) अध्यक्षपदी फेरनिवड झाली.
       
    • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे पुत्रअसलेले 48 वर्षांचे रानिंदर यांनी मोहालीत झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी शामसिंग यादव यांचा 89-1 असा दारुण पराभव केला.
       
    • महासचिवपदी डी.व्ही. सीताराम राव यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली. सिनियर उपाध्यक्ष म्हणून ओडिशातील बिजदचे खा.के. एन. सिंगदेव हे एकमताने निवडून आले.
       
    • कोषाध्यक्षपदी करणकुमार निर्वाचित झाले. अध्यक्षांसह उपाध्यक्षपदाच्या आठ व सचिवांच्या सहा पदांसाठी निवडणूक पार पडली.
       
    • तसेच रानिंदर हे दिग्विजयसिंग यांच्या निधनानंतर संघटनेचे अध्यक्ष बनले होते.

    दिनविशेष :

    • कोलकाता येथे 10 जुलै 1800 रोजी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना करण्यात आली.
       
    • विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू सुनील गावसकरयांचा 10 जुलै 1949 मध्ये जन्म झाला.

    No comments:

    Post a Comment