जेवणात आपण तांदळाचा नेहमी वापर करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हेच तांदूळ तुमच्या चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत करु शकतात.
जपानमध्ये अनेक लोक तांदळाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावतात. तांदळाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
जपानमध्ये अनेक लोक तांदळाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावतात. तांदळाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
यासाठी तांदूळ शिजवून त्याचे पाणी बाजूला काढून ठेवा. या भातात दूध आणि मध मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्याला एखाद्या पॅकप्रमाणे लावा. त्यानंतर हा मास्क काढून तांदूळ शिजवलेल्या पाण्याने चेहरा धुवा.
तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळतो. तसेच डागही दूर होतात.