Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, May 16, 2017

    माते, उब तुझ्या पंखात..||

    Views
    माते, उब तुझ्या पंखात..||
        उंच भरारी घेतली जरी,
        सुंदर नील नभात,
        मायेचा तव स्पर्श शोधितो,
        उब तुझ्या पंखात
        माते, उब तुझ्या पंखात..||
        किती सोसलेस तू पावसाळे,
        तरी मला कंठाशी कवटाळे,
        आज तुझे पाखरू भरारे,
        आत्मविश्वासे या जगात,
        माते, उब तुझ्या पंखात..||
        श्यामलाही तूच घडविशी,
        शिवबालाही तूच घडविशी,
        शिकवीशी दिघुला,
        'बाळा अश्रुंचीही फुले बनू शकतात',
        माते, उब तुझ्या पंखात..||
        अवीट गोडी देवदत्त ती,
        भरली तुझ्याच काळजात,
        विज्ञानालाही न कळे कधीही,
        काय तुझ्या हृदयात,
        माते, उब तुझ्या पंखात..||
        जागी सर्वसुखी मीच एकही,
        जागा मिळे मला अजुनही
        आईच्या पदरात,
        माते, उब तुझ्या पंखात..||