Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, June 16, 2017

    चालू घडामोडी (16 जून 2017)

    Views

    चालू घडामोडी (16 जून 2017)


    चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश :

    • चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली.
       
    • बांगलादेशने दिलेले 265 धावांचे आव्हान टीम इंडियाने 40.1 षटकांत 9 गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने 129 चेंडूत 123 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
       
    • तसेच त्याला कर्णधार विराट कोहली (96) आणि सलामीवीर शिखर धवन (46) यांनी दमदार साथ दिली.
       
    • तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला 264 धावात गुंडाळले.

    न्यायिक कृतिवादाचे प्रणेते न्या. भगवती कालवश :

    • देशातील न्यायिक कृतिवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी सरन्यायाधीशपी.एन. भगवती यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.
       
    • भगवती देशाचे 17 वे सरन्यायाधीश होते. त्यांनी जुलै 1985 ते डिसेंबर 1986 यादरम्यान देशाचे हे सर्वोच्च न्यायिक पद भूषविले होते.
       
    • तसेच ते गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. जुलै 1973 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.
       
    • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी जनहित याचिका आणि भारतीय न्यायिक प्रणालीप्रती संपूर्ण उत्तरदायित्व या दोन संकल्पना अस्तित्वात आणल्या.
       
    • जनहित याचिकांचे कैवारी असल्यामुळे त्यांनी 'मूलभूत अधिकाऱ्याच्या मुद्यावर कोणतीही व्यक्ती त्या मुद्याशी स्वत:चा प्रत्यक्ष संबंध नसतानाही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते,' असा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. कैद्यांनाही मूलभूत अधिकार असतात, असा ऐतिहासिक निकालही त्यांनी दिला होता.

    इस्रो बनवतेय केरोसीनवर चालणारे सेमी-क्रायोजेनिक इंजिन :

    • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. याच इस्रोने आता आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
       
    • इस्रोकडून सध्या प्रक्षेपकासाठीचे सेमी-क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्याचे काम सुरू आहे. या इंजिनामध्ये इंधन म्हणून रिफाईंड केरोसीनचा वापर करण्यात येणार आहे.
       
    • अन्य पारंपरिक इंधनांच्या तुलनेत रिफाईंड केरोसीन हे अधिक पर्यावरणपूरक समजले जाते. याशिवाय किंमत आणि साठवणुकीच्यादृष्टीने केरोसीन किफायतशीर आहे.
       
    • तसेच सध्या इस्रोकडून प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेमी-क्रायोजेनिक इंजिनांमध्ये लिक्विड फ्युएलचा वापर केला जातो.
       
    • सूत्रांच्या माहितीनुसार, केरोसीनचा वापर केलेल्या या सेमी-क्रायोजेनिक इंजिनाची पहिली चाचणी 2021 पर्यंत पार पडू शकते.