Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    असहकार आंदोलन

    Views

    असहकार आंदोलन

    भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग
    हत्याकंाडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द
    कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही. इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ नच
    केले गेले. या घटनांमुळे भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारविरूध्दचा आपला लढा
    अधिक तीव्र केला.
    • खिलाफत चळवळ

    पहिल्या महायुध्दानंतर तर्कस्तानवर कठोर तह लादला गेल्याने प्रक्षुब्ध
    झालेल्या भारतीय मुस्लीम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले. राष्ट्रीय सभेने
    खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुस्लिमांनी राष्ट्रीय

    सभेच्या
    आंदोलनास दिलेला पाठिंबा यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यात गांधीजीना यश
    मिळाले.
    • असहकार चळवळ

    १९२० सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या
    असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली. त्यात पुढील बाबींचा
    समावेश होता. (१) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे. (२) सरकारी
    सभा समारंभावर बहिष्कार टाकणे. (३) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना
    काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे (४) सरकारी
    कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे. (५) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार
    टाकणे. (६) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे. (७)
    दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.
    असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शासनाने
    दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू
    करण्याचा निर्धार व्यक्त केला. चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने
    ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी ५
    फेब्रुवारी, १९२२ रोजी घेतला.
    • विधायक कार्यक्रम

    गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली. त्यामुळे
    राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

    स्वरात्य पक्ष

    पंडित मोतीलाल नेहरू, बॅ. चित्ता रंजन दास इ. ज्येष्ठ नेत्यांनी
    कायदेमंडळात जाऊन ब्रिटिश शासनाशी लढा देण्याच्या उददेशाने १९२२ साली
    स्वराज्य पक्षाची स्थापना केली. १९२३ च्या प्रांतिक विधिमंडळाच्या
    निवडणुकीत या पक्षाला बर्‍यापैकी यश मिळाले. यात शासनाने आडमुठेपणाने धोरण
    स्वीकारल्याने अल्पावधीत त्यांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला.

    यशापयश

    असहकार आंदोलनाने भारतीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली.
    लाखोंच्या संख्येत सामान्य लोक निर्भयपणे असहकार आंदोलनात सहभागी झाले. या
    आंदोलनाद्वारे हिंदू-मुस्लीम ऐक्य दृढ झाले. सत्याग्रहाच्या अभिनव
    मार्गाने ब्रिटिश साम्राज्यवादी राजवटीचा पाया कमकुवत करण्यात गांधीजी
    यशस्वी झाले.