ठळक घटना, घडामोडी
२००४ - यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी
१९८१ - अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७५ - अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६२ - कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.
१९४७ - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.
१९४२ - दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला
जयंती/जन्मदिवस
१९६२ - डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
१९४२ - रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
१९३६ - माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
१९२६ - बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता
१९२४ - रुसी शेरियर मोदी – कसोटी
१९११ - गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू – ’लोककवी’
१८८८ - जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
१८८८ - मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न (१९९२)
पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा.
१८८६ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
१८७२ - ’संगीतरत्नज’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु
१८५१ - राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
१८२१ - फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ
No comments:
Post a Comment