Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचा उदय व विकास

    प्राचीन काळापासून भारतातील उद्योगधंदे अतिशय भरभराटीस आले होते. भारतीय
    मालास सर्वत्र फार मोठी मागणी होती. भारतीय तलम व स्वस्त कापडास संपूर्ण
    जगातून मागणी होती त्यामुळे भारत हा आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होता. पण
    व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने
    व्यापार शिक्षण धर्मप्रसार व साम्राज्यविस्तार या पायर्‍यांनी भारतातील
    बहूतांश भागावर आपली सज्ञ्ल्त्;ाा हळूहळू प्रस्थापित केली. इंग्लडमध्ये
    औद्योगिक क्रांती झाली आणि भारतातील परिस्थिती बदलू लागली ब्रिटिशांच्या
    स्वार्थी धोरणामुळे भारतीय पक्क्या मालाचा खप कमी होत जाऊन ब्रिटिशांच्या
    मालाचा खप अधिक होऊ लागला. भारतीय कच्चा

    माल इंंग्लंमध्ये जाऊ लागला व
    इंग्लंडमधून पक्क्ा माल भारतात येऊ लागला त्यामुळे भारतातील पैशांचा ओघ
    इंग्लंकडे वाहू लागला भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या व
    नैसर्गिकदृष्टया समृध्द अशा देशावर इंग्रजानी जी राजकीय सज्ञ्ल्त्;ाा
    स्थापन केली त्याचा हा परिणाम होय. भारतीय शेतकरी दिवसेदिवस अधिक दरिद्री
    होऊ लागले भारतीयांचे विविध मार्गानी शोषण होऊ लागले. त्यामूळे शेतकरी व
    इतर जनता यांच्यातील असंतोष दिवसेंदिवस वाढू लागला. तसेच वारंवार
    पडणार्‍या दुष्काळांमूळे लक्षावधी शेतकरी व इतर दुर्बल घटक मृत्युमुखी
    पडले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लहान मोठे २४ दुष्काळ पडले.
    यासर्व गोष्टींना बहुतांशी कंपनी सरकार जाबाबदार आहे ही गोष्ट जनतेच्या
    लक्षात आल्यामूळे या काळात विविध उठाव घडून आले.

    विविध उठाव

    ब्रिटिश काळात महसूल वेळेवर भरणे हा कठोर नियम बनला खेडयांची
    स्वयंपूर्णता नष्ट झाली. पारंपरिक उद्योगांचा र्‍हास झाला शेतीवरील भार
    प्रचंड वाढला शेतीचे व्यापारीकरण झाले. या व्यापारीकरणाची कुर्‍हाड
    आदिवासींच्या जंगल जमिनींवर सुध्दा कोसळली जमीनदार जमीन महसूल अधिकारी,
    सावकार, दलाल, यांनी विविध पदधतीने शेतकर्‍यांचे शोषण करण्यास सुरुवात
    केली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातून १८१८-१८५७
    या काळात धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक, डांग, सेंधवा, धार,
    महाराष्ट्र्राच्या या परिसरात रामोशी भिल्ल, कोळी, इ. जातींच्या लोकांनी
    ब्रिटिश सत्तेविरुध्द उठाव केले. १८२२ -१८५७ या काळात खानदेशात भिल्लांचे
    उठाव झाले हे सर्व उठाव सशस्त्र होते. त्यामुळे जेव्हा १८५७ चा उठाव झाला
    तेव्हा त्यात अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

    उमाजी नाईक

    Umaji Naik
    १८१८ साली मराठी सत्तेचा अस्त झाला. त्यावेळपर्यत आदिवासींच्या जीवनात
    शांतता होती. यानंतर इंग्रजांची सज्ञ्ल्त्;ाा स्थापना झाली. त्यांनी
    शेतजमिनीवर नवीन महसूल आकारणी केली यातून आदिवासीही सुटले नाहीत.
    त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र्रात
    उमाजी नाईक यांनी रामेशी लोेकांना एकत्र करुन इंग्रजांच्या विरोधात बंड
    पुकारले जमीनदार, सावकार व महसूल अधिकारी यांच्यावर उमाजीने हल्ले चढविले
    ब्रिटिशांची महसूल व्यवस्था खिळखिळी केली. सरकारी कचेर्‍यांवर उमाजीने
    हल्ले चढविले. त्यांनी सातारा कोल्हापूर येथे केलेला उठाव इतिहासप्रसिध्द
    आहे. त्यामुळे उमाजीची दहशत चांगलीच निर्माण झाली. उमाजी नाईकचा सहकारी
    बापू त्र्ंिाबकजी सावंत याने जंगलझाडीच्या साहयाने इंग्रजांशी त्याचा लढा
    सुरु केला. शेवटी इंग्रजांनी उमाजीस कैद केली. १८२६-१८२९ पर्यत इंग्रजांशी
    त्याचा लढा सुरु होता. शेवटी इंग्रजांनी उमाजीस कैद केले. पण त्यांच्या
    सहकार्‍यांनी लढा सुरुच ठेवला. रामोशी लोकांचा संघटितपणा व लढाऊ
    वृज्ञ्ल्त्;ाी पाहून इंग्रजांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागले त्यामुळे
    इंग्रजांनी अनेकांना पोलिस दलात सामावून घेतले तसेच अनेकांना जमिनी देऊन
    त्यांचे पुनवर्सन करण्यात आले.

    संथाळांचे बंड - (इ.स. १८५५-५६)

    मानभूम, बारभूम, हजारीबाग, मिदनापूर, बांकूश, वीरभूम, प्रदेशात राहणारे
    संथाळ शांतताप्रिय व साधे लोक होते. शतकानूशतके जी जमीन संथाळ कसत होते,
    ती बंगालच्या १७९३ च्या कायमधारा पध्दतीमुळे जमीनदारांची झाली. या
    जमीनदारांनी जास्त करांची मागणी केल्यामुळे हे शांतताप्रिय लोक आपली
    पितृभूमी सोडून राजमहालच्या तर्वतीय भागात गेले. तेथील जंगले मोठया
    परिश्रमाने कापून त्यांनी शेतीयोग्य जमीन तयार केली. पण जमीनदारांनी
    त्यावरही आपला मालकीहक्क सांगितला. बंगालपरिस्थितीचे योग्य वर्णन केले की,
    आपले उत्पन्न पशुधन स्व:त परिवार सर्वकाही कर्जापायी सावकारांच्या घशात
    गेल्यावरही कर्ज शिल्लक राहिल्याचे पाहाणे संथाळांच्या नशिबी आले.
    त्यापेक्षाही तिरस्कारीची गोष्ट अशी होती. की पोलिस जमीन महसूल अधिकारी
    आणि न्याय अधिकारी सावकारांचीच बाजू घेऊन संथाळांवर अन्याय व अत्याचार
    करीत होते.
    संथाळांचा
    खरा राग बंगाल व उत्तर भारतातील शहरी लोकांवर होता. पण जेव्हा त्यांच्या
    लक्षात आले, की त्यांचे रक्षण करण्याऐवजी अधिकार शोषण करणार्‍यांची बाजू
    घेतात. त्यामुळे जुन १८५५ मध्ये संथाळांची संधिू व कान्हू या दोन
    भावांच्या नेतृत्वाखाली घोषणा केली की, ते देश आपल्या ताब्यात घेऊन तेथे
    आपले सरकार बनवतील संथाळांनी भागलपूर व राजमहाल यांच्यामधील रेल्वे व
    तारायंत्रे उदध्वस्त केली. तेथे कंपनीची सज्ञ्ल्त्;ाा संपुष्टांत आल्याची व
    आपला स्वतंत्र परगणा स्थापन झाल्याचे जाहीर केले. तेथे कंपनीची
    सज्ञ्ल्त्;ाा संपुष्टात आल्याची व आपला स्वतंत्र परगणा स्थापन झाल्याचे
    जाहीर केले. त्यामुळे सरकारने त्वरीत लष्करी कारवाई केली. लष्कराला तोंड
    देता न आल्याने संथाळांनी जंगलाचा आश्रय घेतला व लढा सुरुच ठेवला.
    त्यामुळे मेजर बरो यांच्या नेतृत्वाखालील इंग्रज फौजेला अपमानकारक पराभव
    पत्कारला लागला त्यानंतर मोठया प्रमाणावर लष्करी कारवाई ब्रिटिशांना करावी
    लागली फेब्रुवारी १८५६ मध्ये संथाळ नेत्यांना पकडण्यात आले आणि बंड अतिशय
    क्रुरतेने दडपून टाकण्यात आले. परंतु संथाळांचा राग शांत करण्यासाठी
    सरकारला स्वतंत्र संथाल जिल्हा (परगणा) निर्माण करावा लागला.

    नीळ उत्पादकांचे बंड -(इ.स. १८६०)

    आपल्या मालकीच्या जमिनीवर एखाद्या सरंजामदाराप्रमाणे वागणार्‍या इंग्रज
    जमीनदारांविरुध्द हे बंड झाले. त्यात बंडखोरींना ग्रामीण भागातील जमीनदार
    सावकार, श्रीमंत, शेतकरी आणि नीळ उत्पादक कर्मचारी अशा सर्वाचीच सहानुभूती
    मिळाली.
    एकोणिसाव्या
    शतकाच्या सुरुवातीला निवृत युरोपियन अधिकार्‍यांनी व श्रीमंत ब्रिटिशांनी
    बंगाल व बिहारच्या जमीनदारांगडून जमिनी घेऊन तेथे मोठया प्रमाणावर नीळ
    लागवड सुरु केली. या जमीनमालकांना अमेरिकन गुलामांकडून निग्रो गुलाम काम
    करवून घेण्याचा अनूभव होता. त्यामुळे हे लोक शेतकर्‍यांवर प्रचंड
    अत्याचार करीत आणि त्यांना जबरदस्तीने निळीचे उत्पादन करावयास लावीत
    एप्रिल १८६० मध्ये पावना व नडिया जिल्हयातील सर्व शेतकर्‍यांनी इतिहासात
    प्रथमच हरताळ केला. त्यांनी नीळ उत्पादनास विरोध केला. पुढे हा हरताळ
    जेस्सोर, ख्रुलना, राजशाही, ढाका, माल्दा, दिनाजपूर व बंगालच्या इतर भागात
    पसरला. या निमिज्ञ्ल्त्;ााने शेतकर्‍यांनी जी एकी दाखवली त्यास इतिहासात
    तोड नाही हा सार्वत्रिक उठाव होऊ नये म्हणून सरकारने पोलिसांना ज्या सूचना
    दिल्या त्यानुसार
    (१) जनतेच्या भूमीचे रक्षण करणे. (२) जमीन मालकाला जमिनीत वाटेल ते
    उत्पन्न काढण्याची परवानगी देणे. (३) त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याची
    संधी देऊ नये यासारख्या सूचना होत्या इ.स. १८६० मध्ये नीळ आयोग नेमण्यात
    आले. त्याच्या शिफारशी १८६२ च्या कायद्यास समाविष्ट करण्यात आल्या शेवटी
    बंगालमधील नीळ उत्पादकांनी पराभव मान्य केला व ते बिहार व उत्तर प्रदेशात
    निघून गेले.

    वासुदेव बळवंत फडके

    Vasudev Fadake
    भारतातील क्रांतिकार्याची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली म्हणून
    त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. त्यांचा जन्म १८४५ मध्ये झाला. ते
    कुलाबा जिल्हयातील शिरढोण या गावाचे रहिवासी होते. रेल्वे खात्यात
    नोकरीला असल्यामूळे त्यांचा ब्रिटिश नोकरशाहीशी जवळून संबंध आला. ब्रिटिश
    प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उद्दाम उर्मट व अपमानास्पद वागणुकीमुळे तरुण
    असलेल्या वासुदेव बळवंत फडके. यांचे रक्त खवळून उठले. त्यांनी आपल्या
    आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी रजा मागितली. ती नाकारल्याने त्यांनी
    नोकरीचा राजीनामा दिला. त्याच क्षणी ब्रिटिशांनी अत्याचारी व क्रुर राजवट
    उलथून पाडण्याचा निर्धार त्यांनी केला.
    इ.स. १८७६साली महाराष्ट्र्रात फार मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नान्न करुन
    मरु लागले. पण सरकारने करांचे ओझे दिवसेंदिवस वाढतच होते. सरकारची
    दुष्काळ-निवारण यंत्रणा योग्य पध्दतीने कार्य करीत नव्हती अशा परिस्थितीत
    वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश राज्यकर्त्याविरुध्द भाषणे देऊन जनतेला जागृत
    करण्याचा प्रयत्न करू लागले. राज्यकर्त्याविरुध्द बंड पुकारुण ते यशस्वी
    करण्याची जिद्द त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. त्यांनी पश्चिम
    महाराष्ट्र्राचा दौरा करुन तेथील रामोशांना संघटित करण्याचे कार्य केले.
    ब्रिटिश आवश्यकता होती. म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशांच्या
    मदतीने श्रीमंतांच्या घरावर दरोडे टाकण्यास प्रांरभ केला. त्यामुळे काही
    लोक त्यांना दरोडेखोर म्हणू लागले. पण हे दरोडे पोटासाठी नसून देशासाठी
    होते हे विसरुन चालणार नाही रामोशांच्या मदतीने तारायंत्र उदध्वस्त करणे
    तुरुगांवर हल्ले करुन कैद्यांना मुक्त करणे व त्यांना आपल्या कामात घेणे
    दळणवळण यंत्रणा निकामी बनवणे असे कार्य वासुदेव बळंवत फडके यांनी सुरु
    केले व ब्रिटिशांना जेरीस आणले ब्रिटिश यंत्रणेलाच त्यांनी अशी कृत्ये
    करुन फार मोठे आव्हान दिले. तसेच वासुदेव बळवंत फडके गोरगरिबांना मदत करीत
    असल्यामुळे ते त्यांना परमेश्र्वर मानीत असत. हळूहळू त्यांच्या कार्याचे
    महत्व सरकारच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना
    पकंडण्यासाठी फार मोठे बक्षीस लावले. त्याला प्रत्यूतर म्हणून वासूदेव
    बळवंत फडके यांनी असे जाहीर केले की मुंबईचे गव्हर्नर रिर्चड टेंपल यांचे
    शीर कापून आणणार्‍यास अधिक बक्षिस दिले जाईल. अनेक दिवस प्रयत्न करुनही
    वासुदेव बळवंत हे इंग्रजाच्या हाती लागत नव्हते शेवटी २७ जूल्ै १८७९ रोजी
    डॅनियल नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍यांचे त्यांना पकडण्यात यश मिळवले.
    पुण्याच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. जनतेने
    स्वयंस्फूर्तीने त्यांच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला . पण त्याचा उपयोग
    झाला नाही. न्यायालयाने त्यांच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला. पण त्याचा
    उपयोग झाला नाही. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेशी शिक्षा ठोठावली व
    त्यांची एडनला रवानगी केली. तेथे त्यांनी १८८० साली तुरुंगातून पलायन
    केले. तुरुंगापासून १७ मैल दूर पळाले होते. शेवटी ते सापडले. तुरुंगात
    त्यांचे अतोनात हाल करण्यात आल्यामूळे त्यांची प्रकृती बिघडली त्यातच १८८३
    च्या फेब्रुवारीत या महान देशभक्ताची प्राणज्योत मालवली.

    संपत्तीचे नि:सारण किंवा द्रव्य अपहरणाची कल्पना

    प्लासीच्या
    युध्दापूर्वीच्या ५० वर्षात भारतातील आयात -निर्यात व्यापारात संतुलन
    राहावे म्हणून कंपनीने जवळजवळ २ कोटी पौंड किमतीचे सोने चांदी भारतात आयात
    केले, पण इंग्लंडच्या वाणिज्य तज्ज्ञम्प्;म्प्;ाांनी कंपनीच्या या
    व्यापारविषयक धोरणावर टिका केली. त्याचा परिणाम असा झाला की, इंग्लंडने
    अनेक कायदे करुन भारतीय माल मोठया प्रमाणावर भारतात येणार नाही याची काळजी
    घेतली एवढेच नव्हे तर इ.स. १७२० मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने कायदा
    करुन इंग्लंडमध्ये भारतीय रेशमी व सुती कापड वापरणात्यांवर दंड लावण्यात
    आला. प्लासीच्या युध्दानंतर परिस्थिती बदलली भारताच्या अर्थव्यवस्थेवर
    इंग्लंडचा एक अधिकार प्रस्थापित होऊन भारतातील संपत्ती चा ओघ इंग्लंडकडे
    वाहू लागला ब्रिटिशांनी भारतात केलेल्या साम्राज्यविस्तारामुळे कंपनीकडे
    आता वेगवेगळया मार्गानी प्रचंड पैसा येऊ लागला. तो पुढीलप्रमाणे (१) जमीन
    महसूल पध्दतीतून मिळणारा नफा (२) भारतीय बाजारपेठेवर एकाधिकार असल्याने
    व्यापारातून मिळणारा नफा.(३) कंपनीचे अधिकारी भारतात भेटीच्या स्वरुपात
    मिळविल असलेला पैसा. (४) कंपनीचे लष्कारी व मुलकी अधिकार्‍यांना व इंग्रज
    सेवकांना मिळणारे प्रचंड वेतन.
    हा सर्व जास्तीचा पैसा कंपनी भांडवलाच्या रुपाने भारतात गुंतवीत असे
    त्यावर मिळणारे व्याजही इंग्रजांनाच मिळत होते. हा सर्व पैसा इंग्लंडमध्ये
    जात असे. ही व्यवस्था १८१३ च्या सनदी कायद्यानुसार समाप्त करण्यात आली
    असे असले तरी इंग्रजांनी पुढे ज्या धोरणाचा स्वीकार केला. त्यानुसारही
    संपत्ती चा प्रवाह सातत्याने इंग्लंडकडे वाहत होता व भारत यात दिवसेंदिवस
    अधिकाधिक गरीब होत होता. अशा मार्गानी भारताचे शोषण होते होते.

    दादाभाई नौरोजी व संपत्तीचे नि:सारण

    Dadabhai Nauroji
    संपत्ती
    चे नि:सारण हा सिध्दान्त सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी मे १८६७ मध्ये
    मांडला भारतीयांचे आर्थिक शोषण होत होते. आणि पैशांचा ओघ इंग्लंडकडे वाहत
    होता. वास्तविक पाहता या आधी परकीय राज्यकर्त्यानी केलेले शोषण आणि
    ब्रिटिशांनी केलेले शोषण यात एक मुलभूत फरक होता. तो म्हणजे ब्रिटिशांच्या
    आणि आलेले परकीय भारतात आले व ते भारतीय बनले त्यांचे आपल्या मायभूमीशी
    असलेले संबंध तुटले. त्यामुळे त्यांनी शोषण केलेला पैसा भारतात राहिला
    कारण तो पैसा भारतातील अर्थव्यवस्थेत गुंतवला गेला. याउलट ब्रिटिशांनी
    भारतात सज्ञ्ल्त्;ाा स्थापन केल्यांनतर मातृभूमी इंग्लंड हीच राहिली.
    त्यामूळे त्यांनी शोषण केलेला पैसा भारतात न राहता इंग्लंडमध्ये गेला
    त्यावरुनच राष्ट्रवादी आर्थिक विचारांची पध्दतशीर मांडणी सर्वप्रथम
    दादाभाई नौरोजी यांनी केले

    No comments:

    Post a Comment