समाजसुधारकांची तयारी
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे. आधुनिक महाराष्ट्नाच्या इतिहासामध्ये समाजसुधारक हा अभ्यासघटक हा खुप महत्वाचा ठरतो. दुसृया बाजूला
महाराष्ट्नातील समाजसुधारकांची कामगिरी व प्रयत्न हा घटक तसा इतिहासाचाच एक भाग आहे, परंतु
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासकमात या घटकास स्वतंत्र स्थान दिले आहे. या घटकांतर्गत बिटिश सत्तेची स्थापना
झाल्यानंतर महाराष्ट्नात झालेल्या प्रबोधन प्रकियेवर प्रश्न विचारले जातात. संस्थात्मक प्रयत्नांबरोबरच मुख्यत: व्यक्तिगत प्रयत्नांवर भर दिला जातो.
महाराष्ट्नातील समाजसुधारकांची कामगिरी व प्रयत्न हा घटक तसा इतिहासाचाच एक भाग आहे, परंतु
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासकमात या घटकास स्वतंत्र स्थान दिले आहे. या घटकांतर्गत बिटिश सत्तेची स्थापना
झाल्यानंतर महाराष्ट्नात झालेल्या प्रबोधन प्रकियेवर प्रश्न विचारले जातात. संस्थात्मक प्रयत्नांबरोबरच मुख्यत: व्यक्तिगत प्रयत्नांवर भर दिला जातो.
पूर्व परीक्षेच्या अभ्यासकमामध्ये कोणते समाजसुधारक महत्त्वाचे आहेत याची माहिती नाही अथवा त्यांचा नामोल्लेखही नाही. पण जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरुन महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव
पाटील यांच्याविषयी सतत प्रश्न विचारलेले आढळतात. त्याशिवाय जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर,
विष्णूशास्त्री पंडित, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांच्या
विषयीही बृयाचदा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सर्व समाजसुधारकांची यादी तयार करुन त्यात
महत्वानुसार अगकम तयार करता येतो. समाजसुधारकांचे प्रयत्न या घटकावर प्रश्न विचारतांना
समाजसुधारकांचे जन्म व मृत्यू दिनांक, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांनी स्थापन केलेल्या
महत्त्वाच्या संस्था, त्यांचे लेखन विषयक कार्य व त्यांचे वैचारिक विश्व यावर प्रश्न विचारले गेलेले दिसतात.
उदा. "गुलामगिरी' गंथ कोणी लिहिला? चवदार तळे येथे कोणी, कधी, सत्यागह केला? वेदोक्त प्रकरण कधी घडले होते? लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाचा उल्लेख केला जातो? इ.
समाजसुधारकावरील प्रश्नांचे स्वरुप पूर्णत: वस्तूनिष्ठ असते. त्यामुळे समाजसुधारकाच्या घटकाचे एकदा, दोनदा सूक्ष्म वाचन झाले तर वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती एकत्रित करुन त्याची सतत रिव्हिजन करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. इतिहास व समाजसुधारक या घटकांच्या तयारीच्या द्ृष्टीने जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हे या परीक्षेच्या तयारीतील महत्त्वाचे पाऊल आहे. प्रश्नांचे स्वरुप, प्रश्न विचारण्याची पद्घती, विषयात खोलवर जाण्याची आयोग, परीक्षकांची क्षमता या बाबी जशा विश्लेषणातून स्पष्ट होतात तशाच प्रकारे काही प्रश्न, काही काळानंतर परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आढळतात, त्या प्रश्नांची तयारी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामधून होईल. तसेच प्रश्न व एकंदर प्रश्नपत्रिकेत होणारे बदलही यातून लक्षात घेता येतात.
बाजारपेठेत या घटकांच्या तयारीसाठी विपुल संदर्भसाधने उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त संदर्भ साधने वापरण्याऐवजी - मोजकी परंतु अधिकृत, दर्जेदार संदर्भसाधने, त्यांचे सूक्ष्म व वांरवार केलेले पुनर्वाचन या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहास या घटकाची तयारी करत असताना इयत्ता 5 वी व 8 वी इयत्तांची बालभारती प्रकाशनाची पाठय्पुस्तके पायाभूत संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतात. त्यानंतर डॉ.जयसिंहराव पवार यांच्या "हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास' या पुस्तकाचे वाचन करावे. त्याशिवाय गोवर व बेल्हेकर लिखित "आधुनिक भारत' या गंथातील निवडक प्रकरणे अभ्यासावीत. समाजसुधारक या घटकाच्या तयारीसाठी भिडे- पाटील यांनी लिहीलेले "महाराष्ट्नातील समाजसुधारणेचा इतिहास' या पुस्तकाचा पायाभूत संदर्भ म्हणून आधार घ्यावा. त्याशिवाय "द युनिक अॅकॅडमी, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्न वार्षिकी संदर्भगंथातील "महाराष्ट्नाचे शिल्पकार' या प्रकरणाचा विशेष आधार घ्यावा. तसेच वृत्तपत्रात या समाजसुधारकांवर येणारे लेख, द युनिक अॅकॅडमी, पुणे यांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी प्रकाशित केलेला विशेषांक हाही या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
' इतिहास व समाजसुधारक या घटकांवर विचारल्या जाणाया प्रश्नांची संख्या मर्यादीत असते, प्रश्न तुलनेने सोपे असतात. त्यामुळे नेमक्या तयारीच्या बळावर या घटकातील प्रश्न पैकीच्या पैकी गुण देवू शकतात. गरज आहे फक्त प्रश्नांचे स्वरुप समजावून घेवून नेमकी तयारी करण्याची. ते तुम्ही नक्की कराल.