Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५) :


    वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५)


                          र्लॉड
    वेलस्नलीची कारकिर्द अनेक लढाया व त्यात त्याने मिळविलेले विजय व त्यांच्या
    मुत्सद्देगीरीने गाजली. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व
    त्यांचा जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती
    फौजेची पध्दत राबवली या योजनेत त्यास फार मोठे यश मिळाले.
    • तैनाजी फौजेची पध्दतीच्या धोरणाचे स्वरूप :
    तैनाती फौज स्वीकारणार्‍या शासनकत्र्यास पुढील अटी स्वीकारव्या लागत असत.

    (१) परराज्यांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही.

    (२) मोठया राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी ंकंपनीची मोठी फौज ठेवावी
    लागेल. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकार्‍यांच्या हातात राहील. या
    फौजेच्या खर्चासाठी आपल्या राज्यातील काही मुलुख कंपनीला कायमचा तोडून
    द्यावा लागेल. लहान राज्ये यात दरवर्षी कंपनीस ठरावीक रक्कम देतील.


    (३) या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल.

    (४)
    कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना इतर युरोपियनांना सेवेत ठेवता येणार
    नाही.

    (५) राज्यांचे अंतर्गत व बाहय शत्रूंपासून कंपनी संरक्षण करेल.
    • या पध्दतीचे कंपनीला होणारे फायदे :
    (१) कंपनीचे संरक्षण मिळाल्यामुळे भारतीय राज्ये दुर्बल बनली. पण इंग्रजांची शक्ती वाढली.

    (२) राज्यांच्या राजधानीत कंपनीचे सैन्य राहत असल्याने व राज्यांचे
    स्वातंत्र्य कायम असल्यामूळे इतर युरोपियन सज्ञ्ल्त्;ाांना ईष्र्या
    करण्याची संधी मिळाली नाही.

    (३) इंग्रजांनी राजकीय अभिलाशा वाढीस लागली. 
    (४) तैनाती फौज पध्दतीमुळे
    कंपनीला वाटत असलेली फेंर्चांची भीती पूर्णपणे नाहीशी झाली कारण तहानुसार
    कोणतेही तैनाती फौज स्वीकारलेले राज्य कंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही
    युरोपियनास सेवेसाठी ठेवू शकत नव्हते

    (५) राज्यांचे परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात आल्याने भारतीय राज्यांच्या भांडणांत कंपनी मध्यस्थ बनली

    (६) तैनाती फौजेच्या अधिकार्‍यांना भरपूर वेतन मिळू लागले. तसेच या
    राज्यातील इंग्रज रेसिडेंट अतिशय प्रभावाशाली बनून कालांतराने
    राज्यांच्याअंतर्गत कारभारतही हस्तक्षेप करु लागले.

    (७) कंपनीला दरवर्षी भूप्रदेश मिळत गेल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले.
    • भारतीय राज्यांच्या सार्वभौमत्वाचा शेवट :
    (१)
    परराष्ट्रसंबंध कंपनीच्या आधिपत्याखाली गेल्यामूळे भारतीय राज्ये आपले
    सार्वभौमत्व गमावून बसली. लष्करीदृष्टया ही राज्ये दुर्बल बनली. त्याचा
    परिणाम असा झाला. कि भारतातील राजांचे मानसिक बळ कमी झाले. ही गोष्ट भारतीय
    राजांना हानिकारक ठरली. राज्यातील प्रजेलाही फार मोठया प्रमाणावर त्रास
    भोगावा लागला.

    (२)राज्यांचा दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला की
    राजांना राज्यकारभार करणे कठीण होऊन बसले मन्रो म्हणतो. तैनाती फौज पध्दती
    आपले खरे रुप दाखविल यात मला कोणतीही शंका नाही शेवटी ही पध्दती ज्या
    राज्याच्या रक्षणाची जबाबदारी पत्करली आहे त्या राज्याला पुर्णपणे नष्ट
    करणार.

    (३) या पध्दतीने प्रत्येक दुर्बल राजाचे रक्षण केले आणि त्याद्वारे जनतेला आपली स्थिती सुधारण्यापासून वंचित केले.

    (४) ही पध्दती स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. कंपनी या
    राज्यांच्या उत्पन्नाचा अंदाजे १ भाग घेत होती, पण ही रक्कम इतकी जास्त असे
    की बहुतेक राज्यांकडे रक्कम थकीत राहू लागली. इंग्रज लष्करी अधिकार्‍यांचे
    वेतन प्रचंड होते आणि लष्करी साहित्य इतके महाग होते की राजांना आपल्या
    प्रजेवर मोठया प्रमाणावर कर लादणे भाग पडले. रक्कम देणे शक्य झाले नाही तर
    कंपनी राजाकडून त्याच्या राज्याच्या प्रदेशाची मागणी करीत असे. पण हा
    भूप्रदेश फार मोठा असे. वेलस्लीनेच कंपनीच्या संचालकांना एका प्रसंगी
    लिहिले की ४० लक्ष रु ऐवजी आम्ही ६२ लक्ष वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश
    मागितला आहे.

                            वेलस्लीच्या कारकिर्दीतचत दुसरे इंग्रज मराठा युध्द (१८०२-१८०४) घडून आले.
    या वेळी दुसरा बाजीराव पेशवा होता व नाना फडणीसाचा मृत्यू झालेला होता.
    त्यामुळे दौलतराव श्ंिादे व यशवंतराव होळकर या दोन बडया सरदारांनी
    पेशव्यांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात बाजीरावाने
    होळकरांविरुध्द श्ंिाद्यांची मदत घेतली पण होळकराने या दोघांचा पराभव
    केल्यामूळे बाजीरावाने वसई येथे इंग्रजांचा आश्रय घेतला. इंग्रजांनी ही
    संधी साधून वसईच्या तहाने दुसर्‍या बाजीरावास तैनाती फौज स्वीकारणेस भाग
    पाडले. (३१ डिसेंबर १८०२) पेशव्याने इंग्रजांना २६ लाखांचा मुलुख द्यायचे व
    परराष्ट्रीय धोरणात त्यांचा सल्ला मान्य करायचे मान्य केले. वसईचा तह हा
    मराठयाचे स्वातंत्र्य लिलावात काढणारा होता. त्यामूळे दौलतराव शिंदेने
    वसईच्या तहास नकार देताच १८०३ मध्ये वेलस्लीने त्याच्या विरुध्द युध्द
    पुकारले हेच दुसरे इंग्रज मराठा युध्द होय. या प्रसंगी वेलस्लीने श्ंिादे व
    भोसले यांचा पराभव केला. या वेळी होळकर व गायकवाड तटस्थ राहिले.
    इंग्रजांनी श्ंिादे व भोसले यांना तैनाती फौज स्वीकारावयास लावल्या
    इंग्रजांनी भोसल्यांकडून कटक प्रांत व श्ंिादे यांच्याकडून भडोच, अहमदनगरम्
    दिल्ली. हे प्रदेश ताब्यात घेतले. यानंतर होळकराने इंग्रजांशी युध्द सुरु
    केले. हे युध्द सुरु असतानाच वेलस्लीचा मायदेशीच्या सरकारशी मतभेद
    झाल्यामुळे त्याने १८०५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो मायदेशी
    निघून गेला. त्याच्या काळात इंग्रज सज्ञ्ल्त्;ाा सर्वश्रेष्ठ सज्ञ्ल्त्;ाा
    म्हणून भारतात उदयास आली होती.

                        
    वेलस्लीनंतर तटस्थ धोरणाचा पुरस्कार करणारा र्लॉड कॉर्नवॉलिस दुसर्‍यांदा
    भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला पण येथे लवकरच त्याचा मृत्यू झाला.
    त्याच्या जागेवर सर बार्लो (१८०५-१८०७) हा गव्हर्नर जनरल म्हणून आला.
    त्याने श्ंिादे व होळकर यांच्याशी समझोत्याचे करार करुन त्यांचे काही
    प्रदेश परत केले. बर्लोनंतर र्लॉड म्ंिांटो हा गव्हर्नर जनरल झाला
    (१८०७-१८१३) यानेही तटस्थतेचे धोरण स्वीकारले. याच्या कारकिर्दीतचत शिख
    राजा रणतिजसिंग याच्यांशी करार होऊन इंग्रजी राज्य व शीख राज्य यांच्यात
    सतलज नदी ही हद ठरविण्यात आली होती.

                        
    याच सुमारास इंग्रज सरकारने १८१३ चा सनदी कायदा पास करुन कंपनीची
    व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि र्बोड ऑफ कंट्रोल मार्फत इंग्रज
    सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर केले.

    No comments:

    Post a Comment