Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

    इ.स. १८५७
    साली राष्ट्रसभेची स्थापना झाली असली तरी त्या आधी बंगाल, मुबई, मद्रास
    येथे सामाजिक आणि राजकीय प्रश्नावंर विचार करण्यासाठी ज्या विविध संस्था
    निर्माण णाल्या त्यांचा वृत्तांत पुढीलप्रमाणे

    १) जमीनदारांची संघटना

    इ. स. १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन लॅंड होल्डर्स
    असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे
    आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते.
    त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला त्या इंग्रजांना
    भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली
    होती. तसेच इंगलंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशही

    सहकार्य करण्यात आले.

    २) ब्रिटिश इंडियन असोसिएशन

    या संस्थेची स्थापना इ.स. १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन
    या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त
    जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार
    यांचाही समावेश या संघटनेस झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय
    स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते.
    मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.
    ब्रिटिश इंडियन असोसिएशने पुढील महत्वाच्या मागण्या केल्या (अ)
    भारतीयांचे हित व काटकसर यासाठी सर्व सनदी संवा समतेच्या तत्वावर खुल्या
    कराव्यात (ब) सर्वोच्च न्यायालय व ग्रामीण न्यायालय येथे ज्यूरी पध्दत
    सूरू करावी (क) न्याससत्तेवर येणार्‍या मर्यादा दुर करण्यासाठी
    न्यायसज्ञ्ल्त्;ाा व कार्यकारी सज्ञ्ल्त्;ाा यांचे विभाजन करण्यात यावे
    (ड) प्रत्येक प्रांतात सरकार नियूक्त व लोक निर्वाचित सदस्यांचे
    प्रातिनिधिक मंडळ असावे, तसेच या दोन्ही सदस्यांची संख्या सारखी असावी आणि
    लोकनिर्वाचित सदस्य हे प्रत्येक जिल्हयातून निवडून आलेले असावेत अशा
    महत्त्वाच्या मागण्या काळाच्या ओघात करण्यात आल्या होत्या हि संघटना फक्त
    वरच्या वर्गाचेच हित पाहते असा आरोप या संघटनेवर होऊ लागला. त्यामुळे
    हळूहळू या संघटनेचे महत्व कमी कमी होत गेले.

    ३) ईस्ट इंंडिया असोसिएशन

    इ.स.
    १८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी लंडन
    इंडियन सोसायटी ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर ईस्ट
    इंडिया असोसिएशन मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय
    झाली. या संस्थेत सेवानिवृज्ञ्ल्त्;ा इंग्रज अधिकारी होते. इ.स. मध्ये
    मुबई, मद्रास, कलकज्ञ्ल्त्;ाा येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या त्या
    इ. स. १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या पुढे ब्रिटिशांची सहानूभूती
    कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.

    ४) पुणे सार्वजनिक सभा

    Ranade
    न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव
    जोशी र्ऊफ सार्वजनिक काका यांनी पुण्यात इ.स. १८७० साली सार्वजनिक सभेची
    स्थापना केली. इ.स. १८७१ मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यातील
    सार्वजनिक व्यवस्था योग्य लागावी एवढाच संकुचित होता. न्यायमूर्ती रानडे
    यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. र्लॉड लिटन या
    साम्राज्यावादी व्हाईसरॉयने इ.स. १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा
    दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञम्प्;म्प्;ाी अशी
    पदवी अर्पण केली. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र
    समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या
    अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या
    निमिज्ञ्ल्त्;ााने जमलेल्या सर्व प्रांतील लोकप्रतिनिधीपूढे व
    राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि
    निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची
    कल्पना सुचविली.

    ५) मद्रास महाजन सभा

    मद्रासमध्ये
    १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी
    माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५
    मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना
    प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी
    करण्यात आली होती.

    ६) इंडियन असोसिएशन

    Surendranath_Banerjee
    २६
    जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन नावाची संस्था
    स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि
    सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी
    ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये
    कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले. या
    अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ.
    प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे
    काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे
    ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या इ.स. १८८४ च्या शेवटी इंडियन नॅशनल
    युनियनची स्थापना हयूम यांनी केली. हिंदुस्थानचे संघटन करणे नैतिक सामाजिक
    व राजकीय दृष्टिने हिंदुस्थानचा विकास साधणे हिंदुस्थानचे संघटन करणे
    नैतिक जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची
    उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.

    No comments:

    Post a Comment