Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    खुदीराम बोस


    खुदीराम बोस 




    भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.



    बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली. यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले.

    सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

    No comments:

    Post a Comment