Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    १८५७ चा रात्री उठाव

    Views

        १८५७ चा राष्ट्रीय उठावसन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची
    सज्ञ्ल्त्;ाा प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.१८५७साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते.इसवी सन १८५७ मध्ये जे बंड झाले तेच भारताचेपहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सज्ञ्ल्त्;ाा उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पणहा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूकयाविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला. ब्रिटिशांनी भारत जिंकलीा व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले. या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले. शेती भाती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला
    असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते. १७६०-७० च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशीबंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी
    कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे. देशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही. शेकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी १७६३ ते १८६ च्या दरम्यान किमान ४० मोठे लष्करी संघर्ष झाले होते. त्यात जनतेचा सहभाग मोठा असला तरी त्यांचे स्वरूपव परिणाम स्थानिकच होते आणि हे उठाव एकमेकांपासून अगदी अलग होते.१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला.

    •  १८५७ पूर्वीचे उठाव :भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सज्ञ्ल्त्;ाा स्थापन झाली, तेथील लोकांना इग्रंज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केले.कंपनी सरकारच्या काळात शेतकर्यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी उठाव केले. असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले.भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिलेे. छोटा नागपुर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड,महाराष्ट्र्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुध्द उठाव केले. बिहारमध्ये संथाळांनी तर फार मोठया प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या. महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी केलेल्या उठावही असाच तीव्र होता. उमाजींनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले. उमाजी नाईक यांनी एक जाहिरनामा काढून इंग्रजांविरुध्दलढा देण्याचे व इंग्रज सज्ञ्ल्त्;ाा झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले. १८३२साली उमाजींना पकडून फाशी देण्यात आली.कोल्हापुर लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकार्यांविरुध्द वेळोवेळी उठाव केले होते. त्यांपैकी १८०६ सालच्या वेल्लोर येथील तसेच १८२४ सालचा बराकपुर येथील उठाव हे विशेष उग्र स्वरूपाचे
      होते.इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे परंतु त्यामुळे लोकांतील असंतोष फक्त दडपला गेला,तो नाहीसा झाला नाही, दारूच्या कोठारावर ठिणगी
      पडावी तसे १८५७ साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गांत साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र उठावाने झाला.१८५७ च्या उठावाची पाश्र्र्वभूमी आणि कारणेब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे जमीनदारांची व सरंजामदारांची वतने खालसा केल्यामूळे वअनेक सत्ताधीशांना आपल्या सज्ञ्ल्त्;ाा गमवाव्या लागल्यामुळे असंतुष्ट झालेल्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे कंपनी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले मध्य व पूर्व हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला. मध्ये हिंदुस्थानातील छोटा नागपूर भागातील कोलरी आदिवासींनी १८२७ मध्ये तर मुंडा आदिवासींनी १८३१ मध्ये उठाव केला. पूर्व हिंदुस्थानात उत्तर पूर्व भागातील खासी टेकडयांवरील आदिवासंींनी १८२९ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. नागा व कुफी बंडखोरांचे उठावही महत्वपूर्ण मानले जातात. ओरिसातील खोंडा आदिवासी तसेच बिहारमधील संथाळांचा उठाव ही ब्रिटिशांना हादरा देणारा ठरला.महाराष्ट्र्रातील खानदेशातील आदिवासींनी त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रोत्साहनाने दुसर्या बाजीरावास पेशवे पदावर पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांपूढे त्यांचा निभाव लागला नाही. महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी रामोशंच्या मदतीने ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. नाईकांनी ब्रिटिश धार्जीण्या व्यापारी सावकार संस्थानिक व जमीनदार यांची लूट केली. शेवटी फंदफितुरीने१८३१ मध्ये ते ब्रिटिशांच्या हाती लागले. ठाणे जिल्यातील कोळी व आदिवासी लोकांनी मराठी सत्तेच्या पुनरुजिवनासाठी १८३९ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले. १८४० मध्ये सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांनी तर १८४१ मध्ये कोल्हापुर भागातील गडकर्यांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केला. ब्रिटिशांच्या विरोधात घडून आलेले वरील सर्व उठाव ब्रिटिश सरकारने मोडून काढले.वरील सर्व उठाव दडपून टाकण्यात कंपनी सरकारला यश आले. असले तरी भारतीयांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत गेला.     
                     

    Mangal  Pandey
                  १७५७-१८५७ या शंभर वर्षाच्या कालखंडात कंपनी सरकारने आपला प्रचंड साम्राज्यविस्तार केला. कंपनीच्या धोरणामुळे प्रजा संस्थानिक जहांगीरदार
    जमीनदार असंतुष्ट झाले. राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक व लष्करी क्षेत्रातील असंतोषामधून १८५७ चा उठाव घडून आला.इसवी सन १८५७ च्या उठावाची
    सुरवात १० मे या दिवशी झाली. इस्ट इंडिया कंपनीच्या मेरठ येथील सैनिकांनी बंड पुकारले व युरोपियन अधिकार्याना ठार मारले. नंतर ते दिल्लीवर चाल करुन
    गेले. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला व मोगलांचे प्रतिष्ठेचे नाव लावणार्या दुसर्या बहादूरशहाच्या नावे भारताचा सम्राट म्हणून द्वाही फिरविली.कंपनीच्या शिपायांच्या आपल्या मालकाविरुध्द बर्याच तक्रारी होत्या.
    सेवेच्या अधिकाधिक जाचक होत चाललेल्या अटी,धार्मिक बाबींत हस्तक्षेप आणि अधिकार्यांचा वर्णीय अहंकार असे त्यांचे स्वरुप होते. पण मुळात त्या सर्वामागे ब्रिटिश सत्तेविरुध्दचा असंतोष होता. कारण हे शिपाई झाले तरी
    भारतीय समाजातलेच होते. पण मुळात त्या सर्वामागे ब्रिटिश सत्तेविरुध्दचा असंतोष होता. कारण हे शिपाईझाले तरी भारतीय समाजातलेच होते. ते एकप्रकारे
    गणवेशातील शेतकरीच होते. भारतीय समाजाच्या अन्य घटकांमध्ये ज्या आशा आकांक्षा, निराशा आणि असंतोष होता त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या अंत:करणात पडलेले होते. शिपायांचे हे बंड म्हणजे भारतीय अर्धव्यवस्था नष्ट झाली, तिला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविण्यात आले आणि देशाची मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात आली हे होय. सर्वात वरकडी म्हणजे जमीनमहसूल
    वाढविण्याच्या वसाहतवादी धोरणामुळे बर्याच शेतकर्यांना आपल्या जमिनीलाच मुकावे लागले व ती वसुली शेतकरी, व्यापारी आणि सावकारांच्या घशात गेली. परंपरागत हस्तव्यवसायही नष्ट झाल्याने लक्षावधी कारागिरांवर बेकारी आणि दारिद्रयओढवले. शेतकरी व कारागीरांच्या या आर्थिक दुरवस्थेमुळे १७७० पर्यंत १२ वेळा मोठा व कित्येकदा छोटे दुष्काळ पडले.हजारो जमीनदार व पाळेगारांचे शेतीच्या वसुलीवर आणि स्वत:च्या शेतजमिनीवरच नियंत्रण राहिले नाही. शेकडो वतनदारांची वतने नष्ट झाली. आपल्या अंतर्गत कारभारात ईस्ट इंडिया कंपनीने हस्तक्षेप केलेला अनेक संस्थानिकांना आवडला नव्हता. विद्वान आणि उपासकवर्गाना संस्थानिक, छोटे वतनदार, सरदार आणि जमीनदारांचा जो आश्रय
    होता, तोच नाहीसा झाल्याने त्यांच्यावर दारिद्रय कोसळले.ब्रिटिश सज्ञ्ल्त्;ाा परकीय होती हेच उठावाचे एक मुख्य कारण होते. या देशात ब्रिटिश सदैव परकेच राहिले. या परकीय घुसखोरांच्या हुकुमांपुढे हांजी हांजी
    करण्याची आपणावर वेळ आली याचा भारतीय जनतेला मोठा अपमान वाटे.