Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, April 29, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 29 April 2020 Marathi | 29 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 29 April 2020  Marathi |
       29 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स

    कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन28 एप्रिल

    दरवर्षी 28 एप्रिल या दिवशी ‘कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन’ साजरा केला जातो.
    2020 या वर्षी हा दिन "स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज" या संकल्पनेखाली पाळला गेला आहे. यावर्षी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, कामाच्या ठिकाणी संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव या विषयाकडे लक्ष केंद्रित केले गेले आहे.
    पार्श्वभूमी
    • 2003 साली, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी कामाच्या ठिकाणी अपघात व रोगांना प्रतिबंध घालण्याच्या विषयावर भर देण्यासाठी ‘कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिन’ या दिनाची स्थापना केली.
    • आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) हा दिवस कामाच्या ठिकाणी सुरक्षित पद्धतींचा अवलंब करण्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि व्यवसायिक सुरक्षा आणि आरोग्य सेवांच्या भूमिकेबद्दल जागृती वाढवण्यासाठी वापरत आहे.
    • जून 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या निष्कर्षात नोंदविल्याप्रमाणे, हा दिवस ILO याच्या व्यवसायिक सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक धोरणाचा एक अविभाज्य भाग आहे.
    • 1996 सालापासून, 28 एप्रिल हा दिवस कामगार संघटनेच्या चळवळीद्वारे जगभरात आयोजित केला जाणारा ‘मृत व जखमी कामगारांसाठीचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन’ देखील आहे.

    गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापना झाली

    भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) होणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांचे नियमन एकाच जागी करण्याच्या उद्देशाने गुजरातच्या गांधीनगर या शहरात ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ (International Financial Services Centres Authority) याची स्थापना करण्यात आली आहे.
    27 एप्रिल 2020 हा दिवस प्राधिकरणाचे स्थापना दिन असणार आणि त्याचे मुख्यालय गांधीनगर येथे असणार अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली.
    वर्तमानात, भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधले (IFSC) बँकिंग, भांडवली बाजारपेठ आणि विमा हे क्षेत्र अनेक नियामकांद्वारे नियमित केले जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI), निवृत्तीवेतन निधी नियंत्रण व विकास प्राधिकरण (PFRDA) आणि भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण (IRDAI) या संस्थांकडून हा कारभार व्यवस्थापित केला जात आहे.
    आता, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) हे भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) चालणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांमध्ये समन्वय राखणारी, नियंत्रण राखणारी व त्यांचे व्यवस्थापन करणारी संस्था असणार आहे.
    IFSCA संस्थेचे स्वरूप
    • आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) यात अध्यक्षांसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश असणार आहे आणि त्या सर्वांची नियुक्ती केंद्र सरकार करणार. हे सदस्य RBI, SEBI, IRDAI व PFRDA यांचे प्रत्येकी एक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे दोन अधिकारी कर्मचारी असणार आहेत. उर्वरित दोन सदस्यांची नेमणूक शोध समितीच्या शिफारशीवरून केली जाणार.
    • ही संस्था ‘विशेष आर्थिक क्षेत्र कायदा-2005’ अन्वये स्थापन करण्यात आली आहे.

    No comments:

    Post a Comment