Current affairs | Evening News Marathi
Current affairs 25 April 2020 Marathi |
25 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
“तियानवेन 1”: चीनची पहिली मंगळ मोहीम
"Tianwein 1": China's first Mars mission
चीन देशाने मंगळावर मानवरहित उपग्रह पाठविण्याची योजना तयार केली आहे. पुढील वर्षी प्रत्यक्षात येणाऱ्या चीनच्या मंगळ मोहिमेचे नाव 'तियानवेन 1' असे आहे. 'चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
चीनचे प्रसिद्ध कवी क्व युआन यांच्या कवितेवरून 'तियानवेन' असे नाव देण्यात आले आहे. 'स्वर्गाला विचारलेले प्रश्न' असा तियानवेन या चीनी शब्दाचा अर्थ आहे. मंगळ मोहिमेची आखणी करताना या कवितेच्या संदर्भाने मोहिमेला नाव देण्यात आले आहे.
भारत, अमेरिका, रशिया आदी देशांनंतर आता चीनची मंगळ मोहीम चालवली जाणार आहे.
चीनने आपला पहिला उपग्रह 'डाँग फेंग हों-1' अवकाशात पाठवला त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही घोषणा करण्यात आली आहे. हा दिवस चीनकडून 'अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जातो.
मंगळ ग्रह
मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला ‘तांबडा ग्रह’ असे सुद्धा म्हटले जाते. आयर्न ऑक्साइडमुळे ग्रहाला तांबडा रंग मिळाला आहे.
हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतला आतापर्यंतचा सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स (उंची: 26.4 किलोमीटर) तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळ ग्रहावर आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.
मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 23 कोटी किमी (1.5 खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे 687 दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस 24 तास, 39 मिनिटे व 35.244 सेकंद इतका भरतो.
राष्ट्रीय पंचायतराज दिन: 24 एप्रिल
National Panchayat Raj Day: April 24
2010 सालापासून भारतात दरवर्षी 24 एप्रिलला ‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ पाळला जात आहे. याप्रसंगी सर्वोत्कृष्ट पंचायत योजनांतर्गत राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्कार आणि ग्रामपंचायत पुरस्कार योजनेच्या विजेतांना सन्मानित केले गेले.
पंचायती राज यंत्रणेत ग्राम, तहसील, तालुका आणि जिल्हा यांचा अंतर्भाव आहे.
पंचायतराजचा इतिहास
भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते. लॉर्ड रिपन यांनी 12 मे 1882 रोजी भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. शाही आयोगाने केलेल्या शिफारसींच्या आधारावर 1920 साली संयुक्त प्रांत, आसाम, बंगाल, बिहार, मद्रास आणि पंजाबमध्ये पंचायतची स्थापना करण्यासाठी कायदा तयार केला गेला होता.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता यांच्याच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाने आपला अहवाल 1957 साली सादर केला. या अहवालात प्रथमच लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पंचायत राज्याची संकल्पना मांडण्यात आली. राजस्थान सरकारने बलवंतराय समितीच्या सूचना विचारात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची योजना आखली. 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले. 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायतराज प्रणाली प्रथम राजस्थान राज्यातल्या नागौर या जिल्ह्यात स्वीकारली गेली होती. त्यानंतर ही व्यवस्था पंचायतराज या नावाने लोकप्रिय झाली.
वर्ष 1992 मध्ये भारतीय संविधानात केलेल्या दुरुस्तीद्वारे पंचायती राज व्यवस्था सादर केली गेली; ती 73 वी दुरुस्ती होती. त्या कायद्याने पंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून संविधानिक दर्जा दिला. हा कायदा 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाला होता. देशातल्या प्रत्येक राज्यात पंचायतराज संस्थांचा कार्यकाळ 5 वर्ष करण्यात आला. पंचायतराज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले.
महाराष्ट्र पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य होते. ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा-1961’ हा कायदा नाईक समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला. महाराष्ट्रातली पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी अशी शिफारस नाईक समितीने केली होती.
No comments:
Post a Comment