Current affairs | Evening News Marathi
Current affairs 21 April 2020 Marathi |
21 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून भारताला 1 अब्ज डॉलरची मदत
New Development Bank assists India to $ 1 billion to cure Covid-19 epidemic
केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 20 एप्रिल 2020 रोजी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) संचालक मंडळाच्या पाचव्या वार्षिक बैठकीत सहभागी झाल्या.
बैठकीदरम्यान कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी भारताला 1 अब्ज डॉलर एवढा आपत्कालीन निधी देण्याची घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. बँकेनी आतापर्यंत भारताच्या 4,183 दशलक्ष डॉलर एवढ्या खर्चाच्या 14 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
BRICSच्या सदस्य देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका) 2014 साली न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) स्थापन केली होती. 15 जुलै 2014 रोजी बँकेची स्थापना झाली. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे.
महामारीचा सामना करण्यात राज्यांच्या मदतीसाठी सहा आंतरमंत्रीय गटांची स्थापना
Establishment of six inter-ministerial groups to help states cope with the epidemic
परिस्थितीचे जागीच मुल्यांकन करून त्याचे निवारण करण्यासाठी राज्य प्रशासनाला योग्य आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्याच्या संदर्भातला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सहा आंतरमंत्रीय गटाची स्थापना केली आहे. पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रत्येकी 2 तर मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांसाठी प्रत्येकी 1 अशा 6 आंतरमंत्रीय केंद्रीय गटांचा (IMCTs) त्यात समावेश आहे.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार संचारबंदीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भातल्या तक्रारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, सामाजिक अंतर पाळणे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सज्जता, आरोग्यसेवा व्यवसायिकांची सुरक्षा आणि कामगार व गरीब नागरिकांसाठीच्या मदत शिबिरांची परिस्थिती यावर हे गट विशेष लक्ष देणार आहेत.
No comments:
Post a Comment