Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 April 2020 Marathi |
22 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन: 22 एप्रिल
International Earth Day: April 22
पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (किंवा वसुंधरा दिन) जगभर पाळला जातो. यावर्षी 50 व्या पृथ्वी दिनाची “क्लायमेट अॅक्शन” ही संकल्पना होती.
हवामानातला बदल मानव प्रजातीचे भवितव्य आणि आपल्या जगाला राहण्यायोग्य बनविणारी जीवन-समर्थन प्रणाली यांच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान आहे आणि त्यासाठी आता कृती करणे अत्यावश्यक झाले आहे, असा संदेश यावर्षी देण्यात आला आहे.
1970 साली स्थापन करण्यात आलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ या संस्थेच्या समन्वयाने 175 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 2009 साली संयुक्त राष्ट्रसंघानी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.
JNCASR आणि IISc बंगळुरू यांनी कोविड-19 महामारीविषयी भविष्यवाणी करणारे तंत्र विकसित केले
JNCASR and IISc Bengaluru developed predictive techniques for the Covid-19 epidemic
भारतीय विज्ञान संस्था (IISc बंगळुरू) आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) या संस्थेच्या संशोधकांनी कोविड-19 महामारीविषयी भविष्यवाणी करणारे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रामुळे विषाणूच्या बदलांचे आणि उत्परिवर्तनाबद्दल अल्पकालीन भविष्यवाणी आणि रोगाचा प्रसार झाल्यामुळे आवश्यक असलेल्या वैद्यकीय गरजा याविषयी शिफारसी प्रदान केले जातात.
तसेच हे तंत्र आवश्यक वैद्यकीय साठ्यांचा संपूर्ण आराखडा प्रदान करते, ज्याद्वारे जिल्हानिहाय गरजा पूर्ण करण्यात मदत होऊ शकते. हे तंत्र संपूर्ण देशाची राज्य आणि जिल्हानिहाय प्रगतीचा अंतर्दृष्टी देखील पुरवतो.
No comments:
Post a Comment