Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 11, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 12 February 2020 Marathi | 12 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 February 2020  Marathi |
       12 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स


    भुवनेश्वर आणि पुरी येथे द्वितीय “BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव-2020” याचे आयोजन

    Second BIMSTEC Disaster Management Practice-2020 organized at Bhubaneswar and Puri

    ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर आणि पुरी या शहरांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या द्वितीय “BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव-2020 (BIMSTEC DMEx-2020)” याचे आयोजन करण्यात आले. 11 ऑगस्ट 2020 रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
    कार्यक्रमाचा विषय: ‘ए कल्चरल हेरिटेज साइट दॅट सफर्स सेवीयर डॅमेज इन द अर्थक्वेक अँड फील्डिंग ऑर स्टॉर्म’
    हा कार्यक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून (NDRF) आयोजित करण्यात आला आहे.
    सरावादरम्यान भूकंप आणि पूर परिस्थिती आल्यास कश्या प्रकारे त्याला तोंड द्यावे आणि होणारे नुकसान कमी करण्याविषयी कृती करणे यावर भर दिला जात आहे. वारसा ठिकाणांचा अश्या परिस्थितीत कसा बचाव करावा यावर विशेष भर दिला जात आहे.
    BIMSTEC विषयी
    बंगालचा उपसागर बहूक्षेत्रीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्य विषयक पुढाकार (Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation -BIMSTEC) हा एक प्रादेशिक आर्थिक गट आहे. त्यामध्ये बंगालच्या उपसागरालगत असलेल्या सात देशांचा (बांग्लादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान) समावेश आहे.
    BIMSTEC समूह दिनांक 6 जून 1997 रोजी अस्तित्वात आला. त्याचे कायमस्वरूपी सचिवालय ढाका (बांग्लादेश) येथे आहे.

    जागतिक युनानी दिन: 11 फेब्रुवारी  | World Greek Day: February 11

    दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जागतिक युनानी दिन साजरा केला जातो. श्रेष्ठ युनानी विद्वान आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
    युनानी औषधोपचारांच्या रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक गुणधर्माविषयी जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
    युनानी दिनानिमित्त आयुष मंत्रालयाने नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता.
    दिनाविषयी
    मूळ ग्रीसची असलेली युनानी उपचार पद्धती ही अकराव्या शतकात अरब आणि पर्शियामध्ये लोकप्रिय झाली. त्याच मार्गाने ही उपचारपद्धत भारतात आली. आता युनानी पद्धतीचे उपचार, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात भारताचे स्थान जागतिक महत्त्वाचे आहे. 
    हकीम अजमल खान ही एक भारतीय युनानी वैद्य होते ज्यांना युनानी औषधी प्रणालीमधील वैज्ञानिक संशोधनाचे संस्थापक मानले जाते. ते नवी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते.


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,

    No comments:

    Post a Comment