Current affairs | Evening News Marathi
Current affairs 17 February 2020 Marathi |
17 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
दोन राज्यांमधल्या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणारी नवी ‘काशी महाकाल एक्सप्रेस’
New 'Kashi Mahakal Express' connecting three Jyotirlingas in two states
तीर्थस्थळांना भेट देणारी ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाने नव्या रेलगाडीचे उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते या गाडीचे उत्तरप्रदेश राज्याच्या वाराणसी या शहरात उद्घाटन करण्यात आले.
भारतीय पुराणात आणि हिंदू समाजाच्या संस्कृतीत आदराचे स्थान असलेले ‘शंकर’ देव ह्यांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी तीनला जोडणारी ही रेलगाडी आहे. इंदौर (मध्यप्रदेश) नजीक ओंमकारेश्वर, उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महाकालेश्वर आणि वाराणसीतले काशी विश्वनाथ या ज्योर्तिलिंगाचा प्रवास या गाडीच्या माध्यमातून शक्य होणार आहे.
तेजस गाडीनंतर, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या माध्यमातून चालवण्यात येणारी अशी सार्वजनिक क्षेत्रातली ही तिसरी कॉर्पोरेट म्हणजेच खासगी रेलगाडी आहे.
गाडीची वैशिष्ट्ये | Features of the car- कमी आवाजातले संपुर्ण वेळ असे भक्तीमय संगीत, प्रत्येक कोचमध्ये खाजगी गार्ड, फक्त शाकाहारी जेवण आणि थर्ड एअऱ कंडीश्नर कोच ही काही वैशिष्ट्ये आहेत.
- वाराणसी आणि इंदौर या शहरांदरम्यान आठवड्यातून तीन वेळा ही गाडी धावणार आहे.
- वाराणसी आणि इंदौर दरम्यानचे 1131 किलोमीटरचे अंतर ही गाडी 19 तासांमध्ये कापणार.
- महाकाल एक्सप्रेसमध्ये देवासाठी एक जागा कायम आरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच देवासाठी एखादी जागा आरक्षित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र यावर अंतिम निर्णय़ होणे बाकी आहे.
बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय
The first 'Indian Banknot' Museum in South India in Bangalore
कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.
संग्रहालयाची वैशिष्ट्ये | Features of the Museum☺️- ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.
- ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.
- सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.
- तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे.
No comments:
Post a Comment