Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 February 2020 Marathi |
16 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
मुंबई-पुणे महामार्गावर धावणार लांबपल्ल्याची पहिली इलेक्ट्रिक बस
15 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते भारतातल्या लांबपल्ल्याच्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन मुंबईत करण्यात आले. लांबपल्ल्याची पहिली इलेक्ट्रिक बस (विजेवर चालणारी गाडी) मुंबई-पुणे महामार्गावर धावणार आहे.
मुंबई-पुणे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातल्या इतर ठिकाणी अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरादरम्यान या बस चालवल्या जाणार आहेत. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदुषणात घट होण्यास मदत होणार.
गाडीची वैशिष्ट्ये
- बसचे 'शिवाई' असे नामकरण करण्यात आले आहे.
- 45 प्रवासी प्रवास करू शकतील एवढी आसन क्षमता आहे.
- ही बस वातानुकुलीत असून चार्ज केल्यानंतर 300 किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची क्षमता या बसची आहे. दोन शहरांदरम्यान दररोज दोन चकरा मारणार.
- बस पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 1 ते 5 तासांचा कालावधी लागतो.
- बसमध्ये CCTV, दोन TV संच आणि चालकाशी संवाद साधण्यासाठी माईक यंत्रणा देण्यात आलेली आहे.
- ही बस ‘मित्र मोबिलिटी सोल्यूशन’ या कंपनीद्वारे तयार करण्यात आयाली असून त्याचे संचालन प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्यूशन्स या प्रवास कंपनी करणार.
राजीव बन्सल: एअर इंडिया कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
राजीव बन्सल ह्यांची एअर इंडिया कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून दुसऱ्यांदा नेमणूक करण्यात आली आहे. ते प्रमुखपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अश्वनी लोहानीची जागा घेणार आहेत.
राजीव बन्सल हे 1988 सालचे IAS अधिकारी आहेत. वर्तमानात ते पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पदावर आहेत.
याव्यतिरिक्त, कार्मिक मंत्रालयाने कर्जबाजारी झालेल्या या कंपनीचे 100 टक्के भागभांडवल विक्री करण्याची घोषणा केली.
एअर इंडिया कंपनी
एअर इंडिया ही भारताची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. ही भारतभर व जगातल्या प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते.
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभोय टाटा ह्यांनी 1931 साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. 1931 साली टाटांना ब्रिटिश सरकारने हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. 15 ऑक्टोबर 1932 रोजी ‘टाटा एअरलाइन्स’ची स्थापना केली गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर 26 जुलै 1946 रोजी ‘टाटा एअरलाइन्स’चे नाव बदलून ‘एअर इंडिया’ ठेवण्यात आले, जी एक सार्वजनिक कंपनी बनली.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment