Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 February 2020 Marathi |
15 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
अंटार्क्टिकामध्ये प्रथमच 20.75 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले
पृथ्वीचे दक्षिण ध्रुव असलेल्या अंटार्क्टिकामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. तिथे 20.75 अंश सेल्सियसची नोंद झाली. अर्जेंटिना देशाच्या एका संशोधन तळावरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 हा आकडा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तत्पूर्वी जानेवारी 1982 साली तिथे 18.3 अंश सेल्सियसची नोंद झाली होती.
अंटार्क्टिकाच्या उत्तर टोकावर इस्पेरान्झामध्ये मार्च 2015 मध्ये 17.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेले होते. अंटार्क्टिकाच्या द्वीपसमूहाचा दक्षिण अमेरिकेच्या बाजूचा जो भाग आहे तिथे तापमान वेगाने वाढत आहे. गेल्या 50 वर्षांत तिथल्या तापमानात 3 अंश सेल्सियसची वाढ झालेली आहे. या भागातल्या जवळपास सगळ्याच हिमनद्या वितळत चालल्या आहेत.
अंटार्क्टिकामधल्या हिमनद्या वितळत असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. एल निनो आणि महासागरामधला प्रवाह यामधील बदलांमुळे उच्च तापमानाचा परिणाम झाला. वैज्ञानिकांच्या मते, अंटार्क्टिक प्रदेश जगातले 70 टक्क्यांपेक्षा जास्त ताजे पाणी साठवते. जर ते वितळले तर समुद्राची पातळी 50-60 मीटर एवढ्या उंचीने वाढणार.
अंटार्क्टिका बाबत
हा पृथ्वीवरच्या सात खंडांपैकी एक खंड आहे. पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकाला दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. हा खंड सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, ऑस्ट्रेलिया अडीच हजार किलोमीटर, आफ्रिका चार हजार किलोमीटर आणि भारत बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे.
अंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक यांनी 1772 साली लावला. 1729 साली प्रथमच बेलिग्ज हाऊजेन यांनी याविषयी विस्तृत माहितीची नोंद करून ठेवली.
आरोग्य मंत्रालयाचा “शालेय सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत” उपक्रम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने 12 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत “शालेय सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत” उपक्रमाचा शुभारंभ केला गेला. हा ‘आयुषमान भारत’ योजनेच्या अंतर्गत चालविला जाणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधून शालेय विद्यार्थ्यांच्या विकासाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.
उपक्रमाविषयी
- समाजात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या दोन शिक्षकांची “सुदृढ शारिरीक आरोग्य सदिच्छादूत” म्हणून केंद्र सरकार नियुक्ती करणार आहे.
- हा उपक्रम सुरुवातीला 200 जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे. अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात आकांक्षी जिल्ह्यांमधल्या सर्व सरकारी उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा समावेश असणार.
- दूत वर्ग प्रमुखाच्या माध्यमातून काम करतील. वर्ग प्रमुख "हेल्थ अँड वेलनेस मेसेंजर" म्हणून काम करणार.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,

No comments:
Post a Comment