Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 November Marathi |
8 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
न्यूझीलँडने 2050 सालापर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ लक्ष्य ठेवणारा कायदा मंजूर केला
न्यूझीलँडने 2050 सालापर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ लक्ष्य ठेवणारा कायदा मंजूर केला
न्यूझीलँड या देशाने 2050 या सालापर्यंत कार्बनचे होणारे उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्याची योजना तयार केली आहे आणि त्यासंदर्भातला कायदा संसदेने 7 नोव्हेंबर 2019 रोजी मंजूर देखील केला.
कायद्याची वैशिष्ट्ये
- पॅरिसच्या हवामान कराराच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून 2050 या सालापर्यंत ‘मिथेन’ वायू वगळता हरितगृह वायूंच्या (GHG) उत्सर्जनास पुर्णपणे आळा घालण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
- त्याच कालावधीत कृषी क्षेत्रातले उप-उत्पादन असलेल्या ‘मिथेन’ वायूच्या उत्पादनात 24-47 टक्क्यांनी कपात करण्याची योजना आहे.
- लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी आणि दर पाच वर्षांनी "कार्बन बजेट" तयार करून किती उत्सर्जन करण्यास परवानगी दिली जावी हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र ‘क्लायमेट चेंज कमिशन’ची स्थापना करण्यात येणार आहे.
न्यूझीलँड केवळ 50 दशलक्षांपेक्षा कमी लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याने 2035 या सालापर्यंत 100 टक्के अक्षय ऊर्जा निर्मितीची वचनबद्धता दर्शविलेली आहे.
न्यूझीलँड हा नैऋत्य प्रशांत महासागरातला एक स्वतंत्र बेटराष्ट्र आहे. भौगोलिकदृष्ट्या हा देश दोन मुख्य भूभाग (उत्तर बेट आणि दक्षिण बेट) आणि सुमारे 600 लहान बेटे यामध्ये विखुरलेला आहे. वेलिंग्टन हे देशाचे राजधानी शहर आहे आणि न्यूझीलँड डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
PCIचा ‘राजा राम मोहन रॉय’ पुरस्कार गुलाब कोठारी यांनी जिंकला
PCIचा ‘राजा राम मोहन रॉय’ पुरस्कार गुलाब कोठारी यांनी जिंकला
पत्रकारितेमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी गुलाब कोठारी (राजस्थान पत्रिका समूहाचे अध्यक्ष) यांची राम राम मोहन रॉय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार भारतीय पत्र परिषदेतर्फे (PCI) दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे.
वर्ष 2019 साठी दिल्या जाणार्या ‘पत्रकारितेमध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार’ याच्या अन्य पुरस्कारांची विजेते पुढीलप्रमाणे आहेत -
- ‘ग्रामीण पत्रकारिता’ वर्ग (संयुक्तपणे) - संजय सैनी (दैनिक भास्कर) आणि राज चेंगप्पा (इंडिया टुडे)
- ‘विकासात्मक अहवाल’ वर्ग - शिव स्वरूप अवस्थी (दैनिक जागरण) आणि अनू अब्राहिम (मातृभूमी)
- ‘वित्तीय अहवाल’ वर्ग – कृष्ण कौशिक आणि संदीप सिंग (इंडियन एक्सप्रेस)
- 'छायाचित्र अहवाल - सिंगल न्यूज पिक्चर' वर्ग - पी. उन्नीकृष्णन आणि अखिल ई. एस. (मातृभूमी)
- 'छायाचित्र अहवाल - फोटो फिचर' वर्ग - सिप्रा दास (इंडिया एम्पायर मॅगझिन आणि पार्लमेंटरी मॅगझिन)
- ‘क्रिडा अहवाल’ वर्ग - सौरभ दुग्गल (हिंदुस्तान टाईम्स)
- 'लिंग आधारित अहवाल' वर्ग - रुबी सरकार (देशबंधू)
16 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रीय पत्र दिनानिमित्त आयोजित केल्या जाणार्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारांचे वाटप केले जाणार आहे.
PCI विषयी
भारतात ‘पत्र परिषद’ याची स्थापना सन 1956 मध्ये झाली, जे की देशातले पहिले पत्र आयोग होते. त्यानंतर दिनांक 16 नोव्हेंबर 1966 रोजी भारतीय पत्र परिषद (PCI) याची स्थापना करण्यात आली. स्थापना दिनाच्या निमित्ताने 16 नोव्हेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय पत्र दिन’ (राष्ट्रीय वृत्तसंस्था दिन किंवा राष्ट्रीय वृत्त दिन) पाळला जातो.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment