Current affairs | Evening News Marathi
Current affairs 27 October Marathi |
27 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
जगातली सर्वात मोठी शाळा: 55,547 विद्यार्थ्यांसह लखनऊ मधले सिटी मॉन्टेसरी स्कूल
लखनऊ (उत्तरप्रदेश) मधले सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) ही शाळा 'जगातली सर्वात मोठी शाळा' ठरली आहे. 2019-20 या वर्षी 55,547 विद्यार्थी असलेल्या या शाळेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
जगदीश गांधी सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) याचे संस्थापक आहेत. फक्त पाच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या शाळेला सुरुवात करण्यात आली होती आज ती सर्वात मोठी शाळा झाली आहे. सध्या संस्थेच्या 18 शाखा आहेत आणि संपूर्ण शहरात जवळपास 56,000 विद्यार्थी आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बाबत
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दरवर्षी प्रकाशित होणारे एक संदर्भ पुस्तक आहे ज्यामध्ये जागतिक विक्रमांचे संकलन केले जाते. सन 1955 साली स्थापना झाल्यापासून सन 2000 पर्यंत याला 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स' (अमेरिकेमध्ये) या नावाने ओळखले जात होते. हे पुस्तक 'सर्वाधिक विकले जाणारे कॉपीराइट पुस्तक' याच्या रूपात स्वताःच एक विक्रमधारी पुस्तक आहे.
असे पुस्तक तयार करण्याची संकल्पना सर ह्यूग बीव्हर यांनी मंडळी होती. त्याच संकल्पनेला धरून ऑगस्ट 1954 मध्ये लंडनमध्ये नोरिस आणि रॉस मॅक’विर्टर या जुळ्या भावांनी या पुस्तकाची स्थापना केली.
भारत, नेपाळ, भूतान या देशांच्या सीमेवर ‘वन्यजीवन संरक्षण उद्यान’ तयार करण्याची योजना
सीमेवरील वन्यजीवन संरक्षण 'शांती उद्यान' तयार करण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान या देशांनी एक योजना तयार केली आहे आणि त्याच्या संदर्भात एका सामंजस्य कराराचा मसुदा तयार केला आहे.
भारताच्या पुढाकाराने इतर दोन्ही देशांनी प्रस्तावित उद्यानात तीन देशांच्या लगतच्या परिसरातल्या समृद्ध जैवविविधतेचा समावेश असणार आहे.
या परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांना स्थलांतरणासाठी अधिक क्षेत्र उपलब्ध व्हावे आणि त्यात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण व्हावी नाही यासाठी हा कायदा वन्यजीवांच्या संरक्षणार्थ अधिक फायदेशीर ठरणार आहे.
भारत आणि भूतान या देशांच्यामध्ये यापूर्वीच एक वन संरक्षित क्षेत्र असून त्यामध्ये आसाम राज्यामध्ये असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे आणि नवीन त्रिपक्षीय प्रकल्पामुळे हा मानस राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार ठरणार आहे.
नेपाळ
नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळ हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीनची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. काठमांडू नेपाळची राजधानी आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
28 मे 2008 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकतांत्रिक नेपाळची स्थापना केली.
देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून माउंट एव्हरेस्ट सह जगातल्या सर्वोच्च 14 पर्वतशिखरांमधले आठ नेपाळमध्ये आहेत. ही सर्व शिखरे 8 हजार मीटरपेक्षा उंच आहेत.
भूतान
भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरचा एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी आहे. भूतानी ङुलत्रुम हे राष्ट्रीय चलन आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment