Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 November Marathi |
11 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: 10 नोव्हेंबर
दरवर्षीप्रमाणे 10 नोव्हेंबर 2019 रोजी ‘शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन पाळण्यात आला.
यावर्षी हा दिन "ओपन सायन्स, लिव्हिंग नो वन बिहाइंड" या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.
या दिनाविषयी
दरवर्षी 10 नोव्हेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन’ साजरा केला जातो. या दिवशी विज्ञान कश्याप्रकारे जागतिक शांती आणि प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकते, याविषयी जनजागृती प्रसारित केली जाते.
10 नोव्हेंबर ही तारीख जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा 2001 साली सुरू करण्यात आली. या दिनाला प्रथम आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या रूपात 1999 साली हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात साजरा केला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा दिवस साजरा केला जातो.
उद्देश्य - जगातल्या प्रत्येक नागरिकांना सर्व वैज्ञानिक शोधांचे महत्त्व आणि त्यांचा उपयोग याविषयी जागरूकता फैलावण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारा हा दिवस साजरा केला जातो.
भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ दरवर्षी 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी विविध देशांमध्ये विज्ञान विभाग, संस्था आणि विद्यापीठांकडून विज्ञानासंबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डॉ. रमन यांनी 1928 साली आपल्या वैज्ञानिक शोधांना जगापुढे मांडले होते.
जीवशास्त्रज्ञ के. उल्लास करंथ ह्यांना WCSचा ‘जॉर्ज शॅलर जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला
भारताचे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. के. उल्लास करंथ ह्यांचा न्यूयॉर्क शहरात वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी (WCS) याच्यावतीने ‘जॉर्ज शॅलर जीवनगौरव पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला आहे. ते हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत.
डॉ. के. उल्लास करंथ व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या नेतृत्वासाठी ते ओळखले जातात. ते वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीसोबत 1988 सालापासून जुळलेले होते आणि त्यांच्या निवृत्तीवेळी 29 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
त्यांनी थायलँड, मलेशिया, कंबोडिया, लाओ पीडीआर, म्यानमार, इंडोनेशिया, रशिया तसेच आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडात चाललेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता.
ते पद्मश्री सन्मान प्राप्त आहे तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ते सध्या भारतात ‘सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज’चे संचालक आहेत.
WCS विषयी
वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी (WCS) ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात वन्यजीवन क्षेत्रात काम करणारी जागतिक संघटना आहे. ही संस्था सुमारे 60 राष्ट्रांमध्ये आणि जगातल्या सर्व महासागर क्षेत्रात विविध प्रकल्प चालवते.
No comments:
Post a Comment