Current affairs | Evening News Marathi
Current affairs 12 November Marathi |
12 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
राष्ट्रीय शिक्षण दिन: 11 नोव्हेंबर
देशात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात. मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते.
दाल तलाव ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ घोषित केला जाणार
जम्मू व काश्मीर सरकारने श्रीनगरचे प्रसिद्ध दाल तलाव आणि त्याच्याजवळच्या आसपासच्या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत केली आहे.
दाल तलाव "लेक ऑफ फ्लॉवर्स", "ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर" किंवा "श्रीनगर्स ज्वेल" या नावानेही ओळखले जाते. यात झेलम नदीचे पाणी साठते.
No comments:
Post a Comment