Current affairs | Evening News Marathi
Current affairs 5 October Marathi |
5 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
दिल्लीत ‘स्वच्छ पाणी अभियान’चा शुभारंभ
दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी नागरिकांना सुरक्षित पेयजल उपलब्ध व्हावे या हेतूने ‘स्वच्छ पाणी अभियान’ राबवविण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी हे अभियान दिल्ली क्षेत्रात राबवविले जाणार आहे आणि हळूहळू ते राष्ट्राव्यापी करण्याची योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आरंभ करण्यात आलेले 'स्वच्छ भारत अभियान' आणि 2024 सालापर्यंत घराघरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्याचे ध्येय यांच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ पाणी अभियान' किंवा ‘क्लीन वॉटर मिशन’ हा कार्यक्रम राबवविला जाणार आहे.
पार्श्वभूमी
राजधानी दिल्लीत 11 ठिकाणांहून भारतीय मानक विभागाने (BIS) संकलित केलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने pH पातळी, गंध, धातूची उपस्थितो यासारख्या वेगवेगळ्या मापदंडांवर आवश्यक असणारी मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे दिल्ली जल विभागाने असे अभियान दिल्लीत राबवविण्याची कल्पना मांडली.
आता देशभरात पेयजलाच्या संदर्भात निकष अनिवार्य केले जाऊ शकतात किंवा नाही याचा शोध भारत सरकार घेत आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून BIS, भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) आणि जलशक्ती मंत्रालय याबाबत चर्चा करीत आहेत. तसेच देशातल्या राज्य सरकारांकडून यासंदर्भात त्यांचे मत मागविण्यात आले आहे आणि राज्यातल्या विविध ठिकाणांहून नमुने मागविण्यात आले आहेत.
प्लास्टिकपासून डांबर तयार करण्यासाठी इंडियन ऑईल कंपनीने पुढाकार घेतला
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक इंधन विक्रेता कंपनीने एकदाच वापर होणार्या प्लास्टिकच्या कचर्यापासून एक उपयोगी उत्पादन तयार करून सरकारच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
या उपक्रमानुसार, प्लास्टिकच्या कचर्यापासून डांबर म्हणजेच टार (रस्ते तयार करण्यासाठी वापरला जाणारा चिकट पदार्थ, जो शुद्धीकरणादरम्यान खनिजतेलापासून नैसर्गिकरीत्या प्राप्त होतो) याची निर्मिती केली जाणार आहे.
फरीदाबाद (हरियाणा) येथे असलेल्या कंपनीच्या एका केंद्रावर यासंबंधीचा प्रायोगिक प्रकल्प तयार करण्यात आला आहे. कंपनी रस्ते बांधकामात डांबरचा वापर करण्यासाठी प्लास्टिकपासून तयार केलेल्या डांबरचा व्यवसायिकपणे पुरवठा करणार आहे.
प्लास्टिक-निर्मित डांबरचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या रस्त्याची कार्यक्षमता CSIR-CRRI यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन ऑईलच्या संशोधन विभागाकडून तपासली जात आहे.
कंपनीने घेतलेले अन्य पुढाकार
- कंपनीने स्पेशल ग्रेड क्रम्ब रबर मॉडिफाइड बिटुमेन (CRMB55) विकसित केले आहे, ज्याची निर्मिती प्लास्टिकच्या कचर्यापासून केली गेली आहे.
- विविध संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एकदाच वापर होणार्या प्लास्टिकचा कचरा खरेदी करण्यासंदर्भात कंपनीने एक इच्छापत्र (EoI) देखील प्रसिद्ध केले आहे.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आणि स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment