Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 October Marathi |
6 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
जागतिक शिक्षक दिन: 5 ऑक्टोबर
दरवर्षी 5 ऑक्टोबर या दिवशी ‘जागतिक शिक्षक दिन’ पाळला जातो. यावर्षी हा दिवस “यंग टीचर्स: द फ्यूचर ऑफ द प्रोफेशन” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.
इतिहास
1994 साली 5 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांकडून ‘1966 ILO/UNESCO रिकमेंडेशन कंसर्निंग द स्टेटस द टीचर्स’ या घोषणापत्राला अंगिकारले गेले होते.
घोषणापत्रात असलेल्या शिफारशी शिक्षकांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदार्या यांच्यासंदर्भात मानदंड ठरवते तसेच त्यांची प्राथमिक तयारी आणि पुढील शिक्षण, भर्ती, रोजगार आणि शिकवणी आणि शिक्षणाचे वातावरण यासाठी मानके ठरवते.
भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. 1962 सालापासून या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जात आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट शिक्षक आणि मुत्सद्दी राजकारणी होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. भारतरत्न (1954) प्राप्तकर्ता डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उप-राष्ट्रपती (1952-62) आणि दुसरे राष्ट्रपती (1962-67) होते.
जागतिक अंदाज
जगभरात अंदाजे 264 दशलक्ष मुले व तरुण अद्यापही शाळाबाह्य आहेत आणि UNESCOच्या अनुसार जगभरात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे 2030 शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी जगभरात 69 दशलक्ष नवीन शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे.
‘हिम विजय’: भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव
चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेट प्रदेशाच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये भारतीय लष्कर पहिल्यांदाच ‘हिम विजय’ या नावाने आतापर्यंतचा सर्वात मोठा पर्वतीय युद्ध सराव आयोजित केला आहे. सरावाची सांगता 25 ऑक्टोबर 2019 रोजी होणार.
- नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत अरुणाचल प्रदेशातल्या पर्वतीय क्षेत्रात 14 हजार फूट उंचीवर नव्या प्रकाराचे युद्ध धोरण तपासण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.
- सरावामध्ये प्रत्येकी 4 हजार सैनिक असलेले तीन गट तयार करण्यात आले आहेत.
- या अभ्यासामध्ये नव्याने संकलित केलेल्या ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ (IBG) या तुकडीची क्षमता तपासली जात आहे.
No comments:
Post a Comment