Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 October Marathi |
31 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
राष्ट्रीय एकता दिवस: 31 ऑक्टोबर
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 144 वी जयंती देशभरात राष्ट्रीय एकता (ऐक्य / एकात्मकता) दिवस म्हणून साजरी केली जात आहे. सन 2014 पासून लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे.
यावर्षीचे कार्यक्रम
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केवाडिया येथील स्टॅचू ऑफ युनिटी येथे जाऊन वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.
- यानिमित्ताने देशात ठिकठिकाणी ‘रन फॉर यूनिटी म्हणजेच एकता दौड’चे आयोजन केले गेले.
- राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला.
- फिट इंडिया अर्थात आरोग्यपूर्ण भारताच्या महत्वावर भर देतानाच एकता दौड हा मन, शरीर आणि आत्मा यांना लाभदायक ठरणारा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे.
- runforunity.gov.in हे वेब पोर्टलही सूरू करण्यात आले असून देशभरात आयोजित केलेल्या विविध ठिकाणच्या एकता दौडची माहिती यावर मिळणार आहे.
- यावषी प्रथमच उत्कृष्ट कामगिरीसाठी सरदार पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारही जाहीर केले जाणार आहेत.
- या दिवसाचे औचित्य साधून केंद्र सरकारने UGC, CBSE मंडळासह सर्व राज्य सरकारांना 31 ऑक्टोबर रोजी देशभरातील विद्यापीठे आणि शाळांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या सूचना पत्राच्या माध्यमातून केल्या गेल्या. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षिततेची प्रतिज्ञा देखील देण्यात आली.
- केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला होता.
सरदार वल्लभभाई पटेल
वल्लभभाई पटेल (जन्म: 31 ओक्टोबर 1875 – मृत्यू: 15 डिसेंबर 1950) हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांनी भारतातल्या 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेतले. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा नवी दिल्लीत पार पडली
30 आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची दुसरी सभा भरविण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले.
भारताचे अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग आणि फ्रान्सचे ब्रूने पिर्सन कार्यक्रमाचे सह-अध्यक्ष होते. सभेला 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झालेत. ही सभा 'ISA'ची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे आणि विविध प्रशासकीय, आर्थिक आणि कार्यक्रमांशी संबंधित मुद्द्यांविषयी मार्गदर्शन पुरविते.
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)
पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्यास मान्यता दिली आहे.
No comments:
Post a Comment