Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, October 16, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 16 October Marathi | 16 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 October  Marathi |
       16 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स


    UNESCOच्या सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारासाठी भारतातल्या चार स्थळांची निवड झाली

    संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) या संस्थेनी या वर्षीचा ‘‘सांस्कृतिक वारसा संवर्धन’ संदर्भातला UNESCO आशियाई-प्रशांत पुरस्कार’ जाहीर केला.
    पुरस्कारासाठी भारत, चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भुटान या देशांमधल्या 16 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यात भारतातल्या चार स्थळांची निवड झाली आहे.
    मुंबई या शहरातल्या अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च, केनेसेथ ईलियाहू सिनेगॉग आणि फ्लोरा फाउंटन या तीन महत्त्वाच्या वस्तू तसेच IIM अहमदाबादच्या परिसरातले विक्रम साराभाई ग्रंथालय यांची पुरस्कारासाठी निवड झाली.
    वर्गनिहाय निवड झालेली स्थळे
    वेगळेपण
    • विक्रम साराभाई ग्रंथालय, IIM अहमदाबाद
    • नेल्सन स्कूल ऑफ म्युझिक, (नेल्सन) न्यूझीलंड
    • कीयुआन गार्डन (सूझौ) चीन
    गुणवत्ता
    • अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च (मुंबई)
    • केनेसेथ ईलियाहू सिनेगॉग (मुंबई)
    • लिट्टल्टन टाईमबॉल स्टेशन (क्राइस्टचर्च) न्यूझीलंड
    • त्सेतो गोएनपा (पारो) भुटान
    • गुयू ब्रिज (झेजियांग) चीन
    सन्माननीय उल्लेख
    • फ्लोरा फाउंटेन (मुंबई)
    • लिडेल ब्रदर्स पॅकिंग प्लांट (वुहान) चीन
    • वेस्टपाक लाँग गॅलरी (सिडनी) ऑस्ट्रेलिया
    • द 5s क्लासरूम (केव) ऑस्ट्रेलिया
    वारसा संदर्भात नवी संरचना
    • चीनमधल्या जियाझियन एन्शियंट जुजुबे गार्डन (शानक्सी) येथले ड्राय पिट लॅटरीन
    • द मिल्स (हाँगकाँग SAR) चीन
    • जोन सुथरलँड थिएटर पॅसेजवे आणि लिफ्ट (सिडनी ओपेरा हाऊस) ऑस्ट्रेलिया
    UNESCO बाबत
    संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
    या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.


    र इंडियाविमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी

    एयर इंडिया ही विमानांसाठी “टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी आहे.
    एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी टॅक्सीबॉटचा वापर केला.
    टॅक्सीबॉट म्हणजे काय?
    टॅक्सीबॉट हे पार्किंग ते धावपट्टी आणि त्याउलट विमानाची टॅक्सीसारखी वाहतूक करण्यासाठी वापरलेले जाणारे रोबॉट एयरक्राफ्ट ट्रॅक्टर होय.
    विमानतळावर विमानाला चालू अवस्थेत हलवणे अशक्य असते, त्यावेळी  विमानाच्या वाहतुकीसाठी अश्या वाहनांचा उपयोग केला जातो.



    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स, 

    No comments:

    Post a Comment