Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 8 April 2019 Marathi | 8 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे निधन
दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
सलग 25 वर्षापासून न चुकता इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल आणि थिएटर ओलंपियाड ही लोकप्रिय कार्यक्रमे एकट्याने आयोजित करण्यामध्ये कार्तिक चंद्र रथ यांचा हातखंडा होता.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत 500 पेक्षा अधिक नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केलीत. 1980च्या दशकातल्या "भगवान जाने मनीषा" या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांना केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ओडिशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला गेला.
लक्ष्मी विलास बँक आणि इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स यांचे विलीनीकरण होणार
खासगी क्षेत्रातल्या लक्ष्मी विलास बँकेच्या संचालक मंडळाने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स ही वित्तीय कंपनी आणि बँक यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. मात्र अजूनही भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या विलीनीकरणाला मंजुरी मिळालेली नाही.
मंडळाने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या शेअर स्वॅप अॅक्विझीशन या अधिग्रहणाच्या प्रक्रियेला मंजुरी दिली. या विलीनीकरणानंतर बँक भारतातल्या आठ खासगी बँकांमध्ये सामील होणार.
इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स ही बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या अधिग्रहनानंतर ही कंपनी बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवणार. बँकेचा सर्वाधिक कारभार हा दक्षिण भारतात चालतो.
कोहिमाच्या लढाईला 75 वर्षे पूर्ण
दुसर्या महायुद्धादरम्यान 1944 साली लढलेली कोहिमाची लढाई या घटनेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झालीत आहेत.
त्यानिमित्त 4 एप्रिलला नागालँड राज्य सरकारच्यावतीने ब्रिटन आणि जपानच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 'रीमेब्रब्रन्स, रिकोन्सिलेशन अँड रीबर्थ' या संकल्पनेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
ऐतिहासिक घटनेबद्दल
कोहिमाची लढाई दुसर्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्य, आझाद हिंद फौज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये लढली गेली होती. त्याचा घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे,
1944 सालाच्या सुरुवातीस ब्रिटनने भारतातून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश) आणि तेथून आग्नेय आशियामध्ये ठाण मांडून बसलेल्या जपान्यांना हुसकावण्यासाठीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी ईशान्य भारतातल्या मिझोरम प्रदेशातल्या इंफाळ शहरात आपले इंडियन फोर्थ कोअर हे सैन्यदल जमवले होते. त्याला मात देण्यासाठी जपानने उ-गो मोहीम या नावाखाली प्रतिआक्रमण करण्याचे ठरवले.
सन 1944 मध्ये 4 एप्रिल ते 22 जून या काळात आधुनिक भारताच्या नागालँड राज्यातल्या कोहिमा शहराच्या सीमेवर लढली गेलेली ही लढाई जपानच्या उ गो मोहिमेचा सर्वोच्चबिंदू होता.
तीन टप्प्यांत लढल्या गेलेल्या या लढाईच्या सुरुवातीस एप्रिलच्या पूर्वार्धात जपानने ‘कोहिमा रिज’ (कोहिमा कठडा) ही जागा जिंकून इंफाळकडे जाणारा रस्ता ताब्यात घेतला. 16-18 एप्रिल या काळात ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली परंतु कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मे महिन्याच्या मध्यापासून 22 जूनपर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणार्या जपानी सैन्याला मागे सारत रस्ता काबीज केला. तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी ‘मैल दगड-109’ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.
इराणचे रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) हे दहशतवादी गट म्हणून अमेरिकेकडून घोषित
संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने इराणच्या रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) या सशस्त्र दलाला ‘एक दहशतवादी गट’ म्हणून घोषित केले आहे.
प्रथमच अमेरिकेनी औपचारिकपणे एखाद्या देशाच्या लष्करी दलाला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे.
पार्श्वभूमी
इराण या देशाचे रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) हे सशस्त्र दल 1979 सालाच्या इस्लामिक क्रांतीनंतर स्थापन करण्यात आले. हे दल शिया मुस्लिम रूढी आणि परंपरांना मानणार्या सत्तारूढ व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आले. हे दल इराणची सर्वात शक्तिशाली सुरक्षा संस्था आहे. इराणी अर्थव्यवस्थेचा मोठा भाग त्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्याचा राजकीय व्यवस्थेत प्रचंड प्रभुत्व आहे.
IRGC वर इराणच्या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र आणि अणू-चाचण्या अश्या संरक्षण कार्यक्रमांना राबवविले जात असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. इराणने असा इशारा दिला आहे की त्यांच्या मारा क्षमता क्षेत्रात इस्राएल आणि अमेरिकेचे लष्करी तळ येतात.
इराण हा मध्यपूर्व प्रदेशातला एक देश आहे. या देशाची राजधानी तेहरान हे शहर आहे. या देशात अधिकृत भाषा म्हणून फारसी वापरली जाते. इराणी रियाल हे या देशाचे राष्ट्रीय चलन आहे.
टीक-टॉक अॅपमध्ये प्रसिद्ध होणार्या अयोग्य चित्रफीतींवर बंदी घालण्याचे मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश
टीक-टॉक या लोकप्रिय चीनी व्हिडिओ अॅपमध्ये प्रसिद्ध होणार्या अयोग्य चित्रफीतींवर बंदी घालण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे.
‘टीक-टॉक’ अॅप 2019 साली अनावरीत केले. हे अॅप बिजींग येथील बाईटडान्स को. कंपनीच्या मालकीचे आहे. हे 2018 साली चौथे सर्वाधिक डाउनलोड केले जाणारे अॅप होते.
अॅपवर प्रसिद्ध होणारी सामुग्री पोर्नोग्राफीला प्रोत्साहित करणारी ठरत आहे. या अॅपचे भारतात 54 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. त्या व्यासपीठावरील सामुग्री पोर्नोग्राफी, विकृती, बालमृत्यू, आत्महत्या यांची जाहिरात करते.
‘माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थी मार्गदर्शके) अधिनियम-2011’ या कायद्याची अंमलबजावणी भारतात केली जाते.
#tiktok #informationtechnology
No comments:
Post a Comment