Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, February 17, 2019

    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) अन्य रोगांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

    राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) या संशोधन संस्थेने अॅक्वायर्ड इम्यूनो-डिफिशिएन्शी सिंड्रोम (एड्स) या लक्षित क्षेत्राबरोबरच अन्य रोगांसाठी संशोधनावर आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय येत्या काही महिन्यांत संस्थेचे नाव बदलण्याचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
    HIVचा संसर्ग होण्याच्या प्रकरणात लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे देशातली रोग नियंत्रित करण्यास मोठे यश आले आहे. म्हणूनच, आता इतर क्षेत्रात संस्था आणि त्याच्या संशोधन कार्यसंघाचा चांगल्या प्रकारे उपयोग करवून घेण्यासाठी संस्थेचे पुनर्नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
    संस्थेबाबत
    राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) सन 1992 मध्ये पुणे (महाराष्ट्र) या शहरात स्थापन करण्यात आली. HIV संसर्ग आणि एड्स या रोगावर संशोधन करण्यासाठी समर्पित असलेली ही एक प्रमुख संस्था आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    विदर्भ संघाने दुसर्‍यांदा इराणी चषक जिंकला

    नागपूर येथे फैज फजल याच्या नेतृत्वात विदर्भ संघाने यंदा सलग दुसर्‍यांदा इराणी चषकाचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले.
    यजमान विदर्भचा संघ इराणी चषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखणारा 2014-15 हंगामानंतरचा पहिलाच संघ ठरला. विदर्भाच्या अक्षय कार्नेवार याला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
    स्पर्धेविषयी
    इराणी चषक या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदा सन 1959-60 च्या हंगामात आयोजन करण्यात आले होते. सन 1928 ते सन 1970 या काळात आपल्या मृत्यूपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) स्थापनेपासून जुळून राहिलेल्या झेड. आर. इराणी या माजी क्रिकेटपटूच्या स्मृतीत ही स्पर्धा खेळली जाते. ही स्पर्धा प्रत्येक वर्षीच्या रणजी करंडक विजेता संघ व शेष भारतातील संघातील निवडलेल्या खेळाडूंच्या संघात खेळली जाते.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद 2019

    गुवाहाटीत 83वी ‘राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद’ ही स्पर्धा पार पडली.
    • सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूवर मात करून स्पर्धेतली महिला एकेरीचे विजेतेपद राखले आहे.
    • पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सौरभ वर्माने लक्ष्य सेनवर मात करत विजेतेपद पटकावले.
    • प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
    राष्ट्रीय विजेत्या सायना, सौरभला 3.25 लक्ष रुपयांचे, तर सिंधू, लक्ष्य सेनला 1.70 लक्ष रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
    भारतीय ‘राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा’ ही 1934 सालापासून भारतातल्या सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंना निवडण्याकरिता खेळली जाणारी वार्षिक स्पर्धा आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    वार्षिक FIH हॉकी स्टार पुरस्कार 2018

    आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) 2018 सालच्या हॉकी स्टार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्षातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना दिलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहे -
    • वर्षातला सर्वोत्कृष्ट हॉकीपटू (पुरुष) - आर्थर व्हॅन दोरेन (बेल्जियम).
    • वर्षातली सर्वोत्कृष्ट हॉकीपटू (महिला) - इव्हा डी गोदे (नेदरलँड).
    • वर्षातली सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक (महिला) - अॅलिसन अन्नान (डच महिला संघाची प्रशिक्षक).
    • वर्षातला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक (पुरुष) - शेन मॅक्लीओड (बेल्जियम संघाचे प्रशिक्षक).
    • वर्षातला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) - आर्थर डी स्लुव्हर (बेल्जियम).
    • वर्षातली सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू (महिला) - ल्युसिना व्होन डर हेदी (अर्जेंटिना).
    • वर्षातली सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (महिला) - मॅडी हिन्च (इंग्लंड) (सलग तिसऱ्या वर्षी).
    • वर्षातला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (पुरुष) - विन्सेंट वनाश (बेल्जियम).
    • वर्षातला सर्वोत्कृष्ट पंच (पुरुष) – मार्सिन ग्रोचल (पोलंड).
    • वर्षातली सर्वोत्कृष्ट पंच (महिला) - मिशेल मीस्टर (जर्मनी).
    आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे. FIH चे पाच खंडात एकूण 128 सदस्य संघ आहेत. FIH दर चार वर्षांनंतर पुरुष हॉकी विश्वचषक (1971 सालापासून) महिला हॉकी विश्वचषक (1974 सालापासून) या स्पर्धा आयोजित करते.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    केरळमधील 'इको परिपथ: पठनमथिट्टा-गवी-वागामोन-थेक्‍कडी’ पर्यटन प्रकल्प

    केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत केरळ राज्यात 'इको परिपथाचा विकास: पठनमथिट्टा – गवी – वागामोन - थेक्‍कडी’ या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
    केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फॉन्स यांच्या हस्ते दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी एका कार्यक्रमात वागमोन येथे या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
    डिसेंबर 2015 मध्ये हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. 76.55 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या प्रमुख कार्यांमध्ये वागामोन येथे पर्यटन पार्क, कदामनिता येथे सांस्कृतिक केंद्र, पीरुमेदू (इदूक्की) येथे लोग हट, रस्ते, चालण्याचे ट्रेल, पाइन व्हॅली फॉरेस्ट येथे रेन शेल्टर, थेक्कडी, कुमिली, मुझियार धरण, पेनस्टॉक आणि कक्की धरण यांचा समावेश आहे.
    योजनेविषयी
    भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन परिपथ (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
    या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 पर्यटन परिपथांची ओळख पटविण्यात आलेली आहे. ते आहेत - बुद्धीष्ट परिपथ, ईशान्य परिपथ, तीर्थंकार परिपथ, सागरकिनारा परिपथ, हिमालय परिपथ, कृष्ण परिपथ, वाळवंट परिपथ, पर्यावरण परिपथ, वन्यजीवन परिपथ, आदिवासी परिपथ, ग्रामीण परिपथ, सूफी परिपथ, आध्यात्मिक परिपथ, रामायण परिपथ आणि वारसा परिपथ.
    आतापर्यंत मंत्रालयाने 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 77 प्रकल्पांसाठी 6131.88 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 February 2019 Marathi | 17 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment