राष्ट्रीय
या शहरात ‘इंडो-जर्मन MSME नवकल्पना प्रकल्प’च्या अंतर्गत ‘MCCIA-GIZ - माहिती आणि नवकल्पना सुविधा कक्ष’ (IIFC) उघडण्यात आले - पुणे (महाराष्ट्र).
आंतरराष्ट्रीय
भारताने या शेजारी देशाकडून ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा (MFN) दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला - पाकिस्तान.
UNच्या ‘2019 जाइंट रिस्पॉन्स प्लान फॉर द रोहिंग्या ह्यूमॅनिटेरियन क्रायसेस’ नावाच्या कार्यक्रमाला निर्वासितांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी एवढा निधी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले गेले - $920 दशलक्ष.
क्रिडा
14 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘ICC ट्वेंटी-20 गोलंदाजा’च्या क्रमवारीत या भारतीयाने आपल्या कारकीर्दीचे सर्वोत्तम द्वितीय स्थान प्राप्त केले - कुलदीप यादव.
14 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘ICC ट्वेंटी-20 गोलंदाजा’च्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेला खेळाडू - रशीद खान (अफगाणिस्तान).
14 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘ICC ट्वेंटी-20 फलंदाजा’च्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेला खेळाडू - बाबर आझम (पाकिस्तान).
14 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘ICC ट्वेंटी-20 संघा’च्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेला संघ - पाकिस्तान.
व्यक्ती विशेष
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘व्यवस्थापन नियोजन, धोरण आणि पालन’ विभागाचे नवे सहाय्यक महासचिव (कार्यक्रम नियोजन, वित्त आणि अर्थसंकल्प) - चंद्रमौली रामनाथन.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याचे नवे अध्यक्ष - प्रमोद चंद्र मोदी.
संयुक्त राष्ट्रसंघाचे वर्तमान महासचिव - अँटोनियो ग्युटेरस.
सामान्य ज्ञान
संयुक्त राष्ट्रसंघ (UN) याचे स्थापना वर्ष – सन 1945 (24 ऑक्टोबर).
संयुक्त राष्ट्रसंघ (UN) याचे मुख्यालय - मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका).
आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना (WTO) याचे स्थापना वर्ष – सन 1995.
पाकिस्तानची राजधानी - इस्लामाबाद.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याचे स्थापना वर्ष – सन 1964.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) याचे मुख्यालय – दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).
No comments:
Post a Comment