‘भारत-सौदी अरब धोरणात्मक भागीदारी’ला चालना देण्यासाठी NITI आयोग आणि SCISP यांच्यात सहमती
भारताच्या राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था (NITI) आयोग आणि सौदी सेंटर फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीक पार्टनर्शिप (SCISP) यांनी उपस्थित ‘भारत-सौदी अरब धोरणात्मक भागीदारी’ पुढेही चालू ठेवण्यासाठी याला चालना देण्यासाठी मान्य केले आहे. NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत रियाधमध्ये झालेल्या व्यापक चर्चेनंतर यास सहमती दिली गेली.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 February 2019 Marathi | 18 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
होडेडा येथून मागे हटण्यास हौथी बंडखोर येमेन सरकारसोबत सहमत
होडेडा येथून आपले सशस्त्र दल मागे हटविण्यास हौथी बंडखोर येमेन सरकारसोबत सहमत झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने येमेन देशात शांती राखण्यासाठीच्या प्रयत्नात पहिल्या टप्प्यात सशस्त्र दल मागे हटविण्याच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्यात आले. तसेच ते दुसऱ्या टप्प्यासाठी तत्त्वतः सहमत झाले आहेत.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 February 2019 Marathi | 18 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
ख्रिस गेलने 2019च्या विश्वचषकानंतर ODI क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलने 2019 सालच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (ODI) निवृत्ती जाहीर आहे. आत्तापर्यंत 284 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने 39 वर्षीय ख्रिस गेलने खेळले आहेत. 37.12च्या सरासरीने त्याने 9 हजारांच्या वर धावा केल्या आहेत. त्यात 23 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 February 2019 Marathi | 18 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
इलेसी मर्टन्सने ‘कतार ओपन’ टेनिस स्पर्धा जिंकली
बिहारमध्ये एकूण 33,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी बरौनी या शहरात एका कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल लालजी टंडन आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते एकूण 33,000 कोटी रुपये खर्च असलेल्या विकास प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यासाठी कोणशीला ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे बिहारमध्ये पायाभूत सुविधा, संपर्क, ऊर्जा सुरक्षा आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये विकासास प्रोत्साहन मिळणार.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 February 2019 Marathi | 18 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
झारखंडमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन
दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमध्ये विविध प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यासाठी कोणशीला ठेवण्यात आली. त्यातल्या मंडल धरणामुळे झारखंड आणि बिहार या राज्यांमधील सुमारे 1.11 लक्ष हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यासाठी मदत होणार आणि तेथे 24 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आहे.
No comments:
Post a Comment