Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, February 16, 2019

    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    ICC ट्वेंटी-20 क्रमवारीत गोलंदाज कुलदीप यादव द्वितीय स्थानी

    भारतीय गोलंदाज कुलदीप यादव ह्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) 14 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या ट्वेंटी-20 गोलंदाजाच्या क्रमवारीत आपल्या कारकीर्दीचे सर्वोत्तम स्थान पटकावत, यादीत द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.

    अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान या क्रमवारीत अग्रस्थानी आहे. अन्य भारतीय गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहल ह्याला 17वे स्थान तर भुवनेश्वर कुमारला 18वे स्थान प्राप्त झाले आहे.

    ट्वेंटी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम हा अग्रस्थानी आहे. भारतीयांमध्ये रोहित शर्मा सातवा, लोकेश राहुल दहावा, शिखर धवनने अकराव्या स्थानी आहे.

    तसेच ट्वेंटी-20 संघाच्या क्रमवारीत पाकिस्तान संघाने पहिले स्थान मिळवले आहे, तर द्वितीय क्रमांक भारतीय संघाचा आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

    हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन मंडळ आहे. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    9 लक्ष रोहिंग्या निर्वासितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी $920 दशलक्षचा निधी आवश्यक: UNHCR

    संयुक्त राष्ट्रसंघ निर्वासितांसाठी उच्चायुक्त (UNHCR) या संघटनेनी सुमारे 9 लक्ष रोहिंग्या निर्वासितांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी $920 दशलक्षचा निधी आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत हा निधी उभारण्यास भागीदार देशांच्या सरकारांना आवाहन केले आहे.
    UN आणि भागीदारांनी ‘2019 जाइंट रिस्पॉन्स प्लान फॉर द रोहिंग्या ह्यूमॅनिटेरियन क्रायसेस’ नावाचा मदत कार्यक्रम चालवला आहे, ज्याच्या अंतर्गत बांग्लादेशात म्यानमारमधून पळून आलेले 9 लक्षाहून अधिक निर्वासित तसेच त्यामुळे 3.3 लक्षाहून अधिक असुरक्षित बांग्लादेशींच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
    बांग्लादेश सरकारच्या सहकार्याने 2018 साली राबवविलेल्या प्रथम संयुक्त प्रतिसाद योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, यावर्षी नवीन योजना 132 भागीदारांना एकत्र आणते, ज्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या उप-संघटना, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशासकीय संस्था (NGO) आणि सरकारी संस्था अश्यांचा समावेश आहे. 2018 योजनेला मागितलेल्या $ 950 दशलक्ष एवढ्याच्या बदल्यात $ 655 दशलक्ष एवढा निधी प्राप्त झाला होता.
    पार्श्वभूमी
    गेल्यावर्षी राखिने राज्यातल्या रोहिंग्या सशस्त्र गटाने पोलीस ठाण्यांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या संघर्षात म्यानमारच्या सुरक्षा दलावर हत्याकांडाचा आरोप करण्यात आला. तेव्हापासून 9 लक्षाहून अधिक रोहिंग्या लोकांनी बांग्लादेशकडे स्थलांतरण केले. रोहिंग्या समुदायाच्या लोकांना मुख्यत्वे बौद्ध म्यानमारमधील बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून ओळखले जाते.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    पुण्यात ‘MCCIA-GIZ माहिती आणि नवकल्पना सुविधा कक्ष’ (IIFC) याचे उद्घाटन

    दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी पुणे (महाराष्ट्र) शहरात ‘MCCIA-GIZ - माहिती आणि नवकल्पना सुविधा कक्ष’ (Information and Innovation Facilitation Cell -IIFC) याचे उद्घाटन करण्यात आले.
    ‘इंडो-जर्मन MSME नवकल्पना प्रकल्प’च्या अंतर्गत मराठा वाणिज्य, उद्योग आणि कृषी महासंघ (Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture -MCCIA) आणि जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (GIZ) या संघटनांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या विभागाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
    MCCIA कडून ‘फायनॅन्स फॉर MSME – वन स्टॉप सोल्यूशन फॉर MSME फायनॅन्स’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात विविध बँकांनी प्रस्तुत केलेल्या सर्व प्रकारच्या MSME ऋण उत्पादनांचा लाभ घेण्यासाठी एक गंतव्य म्हणून काम करणार्‍या या विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
    गेल्या 8 दशकांपेक्षा जास्त काळापासून पुणे क्षेत्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये MCCIAने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    प्रमोद चंद्र मोदी: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) नवे अध्यक्ष

    केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याच्या अध्यक्षपदी प्रमोद चंद्र मोदी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
    निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या सुशील चंद्रा यांच्या जागेवर ही निवड करण्यात आली आहे. प्रमोद चंद्र मोदी हे 1982 सालच्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत.
    केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) 
    हे मंडळ भारतात प्रत्यक्ष करविषयक धोरणे आणि नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रदान करते. CBDT हे ‘केंद्रीय महसूल मंडळ अधिनियम-1963’च्या अंतर्गत दि. 1 जानेवारी 1964 पासून कार्यरत असलेले एक वैधानिक प्राधिकरण आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    भारताने पाकिस्तानकडून ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला

    दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान या शेजारी देशाकडून ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा (MFN) दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
    आंतरराष्ट्रीय व्‍यापार संघटना (WTO) याच्या स्थापनेनंतर भारताने पाकिस्तानला 1996 साली ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा दिला होता. सध्या भारत-पाकिस्तानमधील व्यापाराची उलाढाल वार्षिक USD 200 कोटी एवढी होत आहे. 
    MFN म्हणजे काय?
    मोस्ट फेवर्ड नेशन याचा अर्थ सर्वात महत्त्वाचा देश असा होतो. आंतरराष्ट्रीय व्‍यापार संघटना (WTO) आणि आंतररष्ट्रीय ट्रेड नियमांच्या आधारावर व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा देशाचा दर्जा दिला जातो. ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा दिल्यानंतर देशाला याबाबतीत विश्वास असतो की त्यांना व्यापारात कोणतेच नुकसान होणार नाही.
    हा दर्जा मिळाल्यानंतर आयात-निर्यातमध्ये विशेष सूट मिळते. अशा देशाकडून सर्वात कमी आयात शुल्क आकारले जाते. WTOच्या सदस्य देशांना हा दर्जा दिला जातो. या दर्जाप्रमाणे संबंधित देशाशी व्यापार करताना कोणताही भेदभाव करता येत नाही. याचाच अर्थ कोणत्याही देशासाठी जास्त अथवा कमी कर लागू करून विशिष्ट वागणूक देता येत नाही. 
    पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे. हा देश इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचा (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना/OIC) जनक राष्ट्र आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi | 16 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    UNच्या व्यवस्थापन धोरण विभागामध्ये सहाय्यक महासचिव पदावर चंद्रमौली रामनाथन यांची नियुक्ती

    संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो ग्युटेरस यांनी भारताचे चंद्रमौली रामनाथन यांची ‘व्यवस्थापन नियोजन, धोरण आणि अनुपालन’ विभागाचे कंट्रोलर, सहाय्यक महासचिव (कार्यक्रम नियोजन, वित्त आणि अर्थसंकल्प) पदी निवड केली आहे.
    या पदावर असलेले उरुग्वेचे बटीना तूची बर्टसिएतस यांचा पदावरील कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवड करण्यात आली आहे.
    अर्थतज्ञ रामनाथन यांना वित्त आणि अर्थसंकल्प, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सुमारे 40 वर्षांचा अनुभव आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून समर्थित असलेल्या IPSAS (इंटरनॅशनल पब्लिक सेक्टर अकाऊंटिंग स्टँडर्ड्स) आणि Umoja (युनायटेड नेशन्स एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग सोल्यूशन) या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्येही त्यांनी पुढाकार घेतला होता.
    संयुक्त राष्ट्रसंघ (UN)
    1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) 5 कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. स्थापनेच्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघाची 51 सदस्य राष्ट्रे होती; ही संख्या आता 193 इतकी आहे.
    संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरशासकीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात मुख्य अधिकारी पद ‘महासचिव’ हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगीज अँटोनियो गुटेरस यांच्याकडे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
    संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -
    • UN महासभा (General Assembly)
    • UN सुरक्षा परिषद (Security Council)
    • UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)
    • UN सचिवालय
    • UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि
    • UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -
    • जागतिक बँक समूह
    • जागतिक आरोग्य संघटना (WHO)
    • द वर्ल्ड फूड प्रोग्राम
    • संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)
    • संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children's Fund –UNICEF)
    संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्काला प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16 February 2019 Marathi |  16  फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    No comments:

    Post a Comment