Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, December 12, 2018

    Oneline Gk - 12 December 2018- Marathi / एका ओळीत जीके 12 डिसेंबर 2018 मराठी

    Views

    Marathi | मराठी


    राष्ट्रीय

    • हे भारताचे 5000 किमीपर्यंत मारा करणारे अणु-क्षमतेचे आंतरखंडीय लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र (ICBM) आहे - अग्नी-5.
    • नव्या निर्णयानुसार, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (NPS) केंद्र सरकारकडून दिले जाणारे योगदान इतक्या टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले - 14%.
    • ‘नागरिकत्व नियम-2009’ मधील दुरूस्तीनुसार, या देशांमधून भारतात आलेल्या सहा अल्पसंख्याक समुदायामधील अर्जदारांना नागरिकत्वाच्या अर्जामध्ये त्यांचा समुदाय स्पष्ट करावा लागणार - पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश.
    • भारताच्या या सरकारी संस्थेकडून विकसित केलेल्या लाइट युटिलिटी हेलीकॉप्टर (LUH) ने 6 किलोमीटर उंचीवरील उड्डाण चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL).

    आंतरराष्ट्रीय

    • NASAचे हे अंतराळयान आपल्या सूर्यमालेच्या काठावर पोहोचणारे मानवी इतिहासातले दुसरे मानव निर्मित यान आहे - व्हॉयजर 2 (पृथ्वीपासून 18 अब्ज किलोमीटर दूर).

    क्रिडा

    • ‘आशियाई कॉन्टिनेन्टल 2018’ ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली गेली आहे - मकाती सिटी (फिलिपिन्स).

    व्यक्ती विशेष

    • ‘स्विफ्ट इंडिया’ याच्या संचालक मंडळाचे नवे अध्यक्ष - अरुंधती भट्टाचार्य.
    • पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद (PMEAC) याचे वर्तमान अध्यक्ष - बिबेक देब्रोय.

    सामान्य ज्ञान

    • अग्नी क्षेपणास्त्र हे या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
    • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे स्थापना वर्ष – सन 1935.
    • भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय - मुंबई.
    • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937).
    • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949).
    • लाइट युटिलिटी हेलीकॉप्टर (LUH) हे 3 टन वजनी श्रेणीतले इतक्या इंजिनवर चालणारे हलके हेलीकॉप्टर आहे - एक.


    No comments:

    Post a Comment