Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 6, 2018

    ६ फेब्रुवारी दिनविशेष

    Views
     
    पंडित मोतीलाल नेहरु (६ मे १८६१ - ६ फेब्रुवारी १९३१) - मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली.


    पंडित मोतीलाल नेहरुची पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा .
    Motilal Nehru's full information click here to get.... 
     पंडित मोतीलाल नेहरु कि पुरी जानकारी प्राप्त करे click here 

    वैतंगी दिन: न्यू झीलँड.

    बॉब मार्ली दिन: जमैका, इथियोपिया.

    ठळक घटना/घडामोडी

    ३३७: ज्युलियस पहिला पोपपदी.

    १७८८: मॅसेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले.

    १८१९: सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.

    १८४०: वैतंगीचा तह. न्यू झीलंड राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.

    १९२२: अकिल रॅट्टी पोप पायस अकरावा झाला.

    १९३२: कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.

    १९३६: जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

    १९५१: न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.

    १९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.

    १९५९: टेक्सास इन्स्ट्‌रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.

    १९६८: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

    १९९६: टर्किश एअरलाइन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार.

    २००१: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

    २००१: पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.

    २००३: संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.

    २००४: चेचेन अतिरेक्यांनी रशियात मॉस्कोतील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.

    जन्म/वाढदिवस

    १६११: चोंग्झेन, चीनी सम्राट.

    १६६४: मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सम्राट.

    १६६५: ॲन, इंग्लंडची राणी.

    १६९५: निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.

    १८७६: सेलर यंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १८८२: गॉर्डन व्हाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

    १८८९: एलियास हेन्ड्रेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १८९५: जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.

    १९११: रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.

    १९१२: ॲव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.

    १९३९: ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९४५: बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.

    १९७०: डॅरेन लेहमान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

    १९७६: टोनी सुजी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.

    १९८६: ब्रॅन्डन टेलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १५९३: ओगिमाची, जपानी सम्राट.

    १६८५: चार्ल्स दुसरा, इंग्लंडचा राजा.

    १७४०: पोप क्लेमेंट बारावा.

    १८९९: लिओ फोन कॅप्रिव्ही, जर्मनीचा चॅन्सेलर.

    १९१८: गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.

    १९३९: सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज. ज्योतिराव फ़ुल्यांना ‘महात्मा’ ही पदवी यांनीच दिली.

    १९३१: पंडित मोतीलाल नेहरु.

    १९५२: जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.

    १९६४: एमिलियो अग्विनाल्दो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

    १९७६: ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.

    १९८९: चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यू पत्करणारा शेवटचा माणूस.

    १९९३: आर्थर अ‍ॅश, अमेरिकन टेनिसपटू.

    २००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री

    No comments:

    Post a Comment