उस्ताद ज़ाकिर हुसैन - (९ मार्च १९५१) तालगंधर्व ते म्हणजे तबला आणि तबला म्हणजे ते. खरंतर एवढीच त्यांची ओळख पुरेशी आहे. भारतीय संगीताचा दर्दी चाहता असलेल्या संगीत रसिकाला एवढ्या माहितीवरूनच त्यांना ओळखता येते, हे अगदी खरं आहे. एवढंच कशाला, कोणत्याही सामान्य माणसालाही काहीही माहिती न सांगता त्यांच्या तबल्याचा एक ‘तुकडा’ ऐकवा आणि तोही सर्वात प्रथम विचारेल ते त्यांचेच नाव. उस्ताद ज़ाकिर हुसैन आहेत का? होय. उस्ताद ज़ाकिर हुसैन अल्लारखाँ कुरेशी हे त्यांचे पूर्ण नाव. पण तबला म्हटला की ज़ाकिरभाई हीच त्यांची खरी ओळख, जणू काय तबलावादनाचा ‘ब्रॅण्ड’च.वयाच्या अवघ्या १२व्या वर्षापासून ज़ाकिर आपले वडिल व गुरु उस्ताद अल्लारखाँबरोबर तबला वादन करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत असत. १९७० साली म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी ज़ाकिर अमेरिकेत संगीत शिक्षणाच्या पुढील वाटचालीसाठी दाखल झाले आणि तेथून सुरू झाला तो त्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचा प्रवास; जो आजतायागत अव्याहत सुरू आहे.
जागतिक दिवस
शिक्षक दिन: लेबेनॉन
ठळक घटना/घडामोडी
५९०: बहराम सहावा पर्शियाच्या राजेपदी.
१८४७: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - अमेरिकेने मेक्सिकोच्या व्हेरा क्रुझ शहरावर चढाई केली.
१९३५: अॅडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्तवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले.
१९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी. २९ बॉम्बफेकी विमानांनी जपानची राजधानी टोक्योवर तुफान बॉम्बहल्ले केले. १,००,०००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
१९५२: पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन.
१९५७: अलास्काच्या अँड्रियानोफ द्वीपसमूहाजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९. १ तीव्रतेचा भूकंप झाला त्यामुळे ५० फूटी त्सुनामी तयार झाले.
१९५९: बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
१९६७: जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला.
१९७६: इटलीच्या कॅव्हालीझ स्की रिसॉर्टवर केबलकारला अपघात. ४२ ठार.
१९८२: सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग.
२००६: एन्सेलाडस या शनिच्या चंद्रावर द्रवरुपात पाणी असल्याचा शोध लागला.
जन्म/वाढदिवस
१२८५: गो-निजो जपानी सम्राट.
१६२९: अलेक्सिस पहिला, रशियाचा झार.
१८८७: फिल मीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९०: व्याचेस्लाव्ह मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
१८९४: फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
१९२९: डेसमंड हॉइट, गयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
१९४३: बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
१९५१: उस्ताद ज़ाकिर हुसैन अल्लारखाँ कुरेशी, आंतरराष्ट्रीय संगीत जगात तळपणारा हिरा. आंतरराष्ट्रीय तबलावादक.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१२०२: स्वेर, नॉर्वेचा राजा.
१६५०: संत तुकाराम.
१८८८: कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.
१९७१: के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
१९९२: मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
१९९४: देविकारणी, अभिनेत्री.
२००३: बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
No comments:
Post a Comment