Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, March 7, 2018

    ७ मार्च दिनविशेष

    Views
    दादोजी कोंडदेव - (१५७७-१६४९) शिवाजीचे बालपणाचे गुरू दादोजी कोंडदेव हे इ.स.१६३६पासून ते वयाचे बहात्तरावे वर्षी मृत्यू पावेपर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजीकडे होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती.दादोजी कोंडदेव शहाजी भोसले यांचे चाकर होते. शहाजी भोसले यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही.



    जागतिक दिवस


    शिक्षक दिन: आल्बेनिया.


    ठळक घटना/घडामोडी


    १७७१: हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
    १७९८: फ्रांसच्या सैन्याने रोमचा पाडाव केला व रोमन प्रजासत्ताकची स्थापना झाली.
    १७९९: नेपोलियन बोनापार्टने पॅलेस्टाईनमधील जाफा शहर जिंकले. २,०० आल्बेनियन कैद्यांची कत्तल.
    १८१४: नेपोलियन बोनापार्टने क्राओनची लढाई जिंकली.
    १८२७: ब्राझिलच्या सैनिकांनी आर्जेन्टिनाच्या कार्मेन दि पॅटागोन्सच्या नाविक तळावर हल्ला केला परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना पळवून लावले.
    १८६२: अमेरिकन यादवी युद्ध-पी रिजची लढाई - जनरल सॅम्युएल कर्टीसच्या नेतृत्त्वाखाली युनियन सैन्याने जनरल अर्ल व्हान डॉर्नच्या कॉन्फेडरेट सैन्याला पी रिज, आर्कान्सा येथे हरवले.
    १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.
    १९११: मेक्सिकोत क्रांति.
    १९१२: रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर पोचल्याचे जाहीर केले.
    १९१८: पहिले महायुद्ध - फिनलंडने जर्मनीशी संधी केली.
    १९३६: दुसरे महायुद्ध - व्हर्सायचा तह धुडकावुन जर्मनीने र्‍हाइनलँडमध्ये सैन्य पाठवले.
    १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीत रेमाजेन जवळचा र्‍हाइन नदीवरचा पूल काबीज केला.
    १९५१: कोरियन युद्ध - संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने चीनी सैन्यावर हल्ला केला.
    १९६५: अलाबामाच्या सेल्मा शहरात ६०० लोकांचे समान हक्कांसाठीचे निदर्शन पोलिसांनी मोडुन काढले.
    १९८३: नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.
    १९८९: चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये लश्करी कायदा लागु केला.
    २००५: स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने.
    २०१४: मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान कुआलालंपुरपासून बीजिंगला चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.


    जन्म/वाढदिवस


    १८९: पब्लियस सेप्टिमियस गेटा, रोमन सम्राट.
    १६९३: पोप क्लेमेंट तेरावा.
    १७९२: जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
    १८५०: टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
    १८५१: फ्रँक पेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १८६०: रेजिनाल्ड वूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १८६४: जॉर्ज बीन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९१८: जॅक आयकिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९२०: विली वॅट्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९३४: नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    १९४२: उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    १९५२: व्हिव्ह रिचर्ड्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.


    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    ३२२: ऍरिस्टोटल, ग्रीक तत्त्वज्ञ.
    १६१: अँटोनियस पायस, रोमन सम्राट.
    १६४९: दादोजी कोंडदेव.
    १७२४: पोप इनोसंट तेरावा.
    १९५२: परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
    १९६१: गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री

    No comments:

    Post a Comment