Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 27, 2018

    २७ फेब्रुवारी दिनविशेष

    Views
    विष्णु वामन शिरवाडकर - (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले.

    वि. वा. शिरवाडकर यांची थोडक्यात माहिती वाचा येथे क्लिक करा

    जागतिक दिवस


    • जागतिक नाट्यदिन.
    • मराठी भाषा दिवस.

    ठळक घटना/घडामोडी


    • १५६०: बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रान्सला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
    • १५९४: हेन्री चौथा फ्रान्सच्या राजेपदी.
    • १७००: न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
    • १८०१: वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत आले.
    • १८४४: डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
    • १८७९: सॅकेरिन या साखरेसारख्या मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
    • १९००: ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
    • १९३३: जर्मनीच्या संसदभवनाला आग लागली.
    • १९४२: दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेचे विमानवाहू जहाज यू.एस.एस. लँगली बुडवले.
    • १९४३: बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
    • १९५१: अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं(८ वर्षे)पुरतीच.
    • १९६३: हुआन बोश डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी आले.
    • १९६७: डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
    • १९८९: व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
    • १९९१: कुवैतला इराकी सैन्यापासून मुक्ती.
    • १९९९: ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
    • २००२: लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.
    • २००२: गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
    • २००४: फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
    • २००७: शांघाय रोखे बाजारातील भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
    • २०१०: चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.

    जन्म/वाढदिवस


    • २७२: कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट.
    • १४८५: चैतन्य महाप्रभुं, बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक.
    • १८०७: हेन्री वॅड्सवर्थ लाँगफेलो, इंग्लिश कवि.
    • १९०२: जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
    • १९०६: माल मॅथिसन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
    • १९१०: केली जॉन्सन, अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
    • १९१२: कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार.
    • १९१२: वि. वा. शिरवाडकर, मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक.
    • १९२०: रेज सिम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९२४: नॉर्मन मार्शल, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
    • १९२८: एरियेल शरोन, इस्राइलचे पंतप्रधान.
    • १९३४: राल्फ नेडर, अमेरिकन राजकारणी, ग्राहक-हक्क चळवळीची नेता.
    • १९३९: लेस्टर किंग, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
    • १९४४: ग्रेम पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९४७: ऍशली वुडकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
    • १९६६: इनामुल हक, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
    • १९७४: जिमी माहर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • १९१२: वि. वा. शिरवाडकर उर्फ `कुसुमाग्रज', मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार.
    • १९२१: शोफील्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९३१: चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.
    • १९४७: एफ.ए. मॅककिनन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १८८७: आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.

    No comments:

    Post a Comment