Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, February 26, 2018

    २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस -

    Views

    २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस -





    जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून - पाळला जातो..


     आमचे सूत्रसंचालन व भाषण हे अँप डाऊनलोड करा आणि हवी ती माहिती मिळवा !


    मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व , ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन "मराठी राजभाषा दिवस" साजरा केला जातो.    
          ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली आज तिच्याप्रती आदर व्यक्त  करण्यासाठीचा महंमंगल दिवस आहे.
    मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो।जय मराठी।

    🔜 मराठी भाषा दिन सूत्रसंचालन -आशिष देशपांडे सरांच्या pdf फाईल्स! 🔙

    हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढ दिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

    जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी

    धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी

    एवढ्या जगात माय  मानतो मराठी

    👉 मराठी दिन साठी काही व्हाट्सअप्प मॅसेज 


    मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.
    ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता.कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा,कादंबरी,नाटक,ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला.वयाच्या १७व्या वर्षापासून'बालबोधमेवा'या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली.१९४२मध्ये प्रसिद्ध झालेला'विशाखा'हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.
    कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार,वेडात मराठे वीर दौडले सात,आगगाडी आणि जमीन,पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.
    'नटसम्राट'या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.तर १९८८मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते.

    👉 मराठी दिन साठी काही फोटो 


    सामाजिक अन्याय,विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला.केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता.त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होते.

    🔜 आमचे सूत्रसंचालन व भाषण हे अँप डाऊनलोड करा आणि हवी ती माहिती मिळवा !

    जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
     या निमित्ताने आज आपण  आपल्या मित्र परिवार, कुटूंबिय यांच्यासमवेत मराठीचा जागर करू शकता. अगदी घरातील सदस्य कुणी कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी अशा माध्यमातून हे करता येऊ शकते. आपणच आपल्या मुलाबाळाना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा. आणि या निमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध करुया।

    👉 मराठी दिन साठी काही SMS 

    मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा !

    No comments:

    Post a Comment