Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, November 20, 2017

    २० नोव्हेंबर - दिनविशेष

    Views

    आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन


    लोकशिक्षण दिन

    बालक हक्क दिन

    ठळक घटना/घडामोडी


    १९१० : मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.


    १९१७ : पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
    १९१७ : युक्रेन प्रजासत्ताक झाले.


    १९२३ : जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.


    १९४० : दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.


    १९४३ : दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.


    १९४७ : दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.


    १९४७ : युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.


    १९६९ : व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.


    १९७९ : सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.


    १९८४ : सेटीची स्थापना.


    १९८५ : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.


    १९९३ : एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.


    १९९४ : अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्‍यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.


    १९९८ : अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.



    १९९८ : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.


    २००३ : इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.




    जयंती/जन्मदिवस



    २७० : रोमन सम्राट मॅक्सिमिनस


    १७५० : टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा.


    १६०२ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक

    १६२५ : डच चित्रकार पॉलस पोर्टर


    १७६१ : पोप आठवा पायस.


    १७६५ : इंग्लिश दर्यासारंग सर थॉमस फ्रीमॅन्टल


    १८४१ : कॅनडाचा सातवा पंतप्रधान विल्फ्रिड लॉरिये


    १८५१ : इटलीची राणी मार्घेरिता


    १८५४ : मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे


    १८५८ : सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.


    १८६४ : एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.


    १८८९ : एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.


    १८९६ : येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.


    १९१० : विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.


    १९२४ : रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.


    १९४१ : हसीना मोइन, उर्दू लेखक.


    १९४२ : ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.


    १९४८ : जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.


    १९६३ : इंग्लिश गणितज्ञ टिमोथी गॉवर्स


    १९६९ : शिल्पा शिरोडकर, हिंदी चित्रपट अभिनेत्री

    No comments:

    Post a Comment