Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, November 20, 2017

    ऍडविन हबल-अमेरिकी खगोलशास्त्री

    Views
    ऍडविन हबल
    अमेरिकी खगोलशास्त्री
    जन्म: २० नवम्बर १८८९
      
    हबल यांचा जन्म मार्शफील्ड (मिसूरी, अमेरिका) येथे झाला. शालेय विद्यार्थी असताना ते हुशार होतेच, शिवाय त्यांना खेळांतही रस होता. त्यांनी एडविन ब्रांट यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशगंगेतील नवतारे आणि तेजस्वितेत बदल होणारे चल तारे यांचा अभ्यास केला.
    आकाशगंगा या कोट्यवधी तारे असलेल्या दीर्घिकेत सूर्यही आहे. मात्र, आकाशात दिसणाऱ्या सर्व ⇨ अभ्रिका आकाशगंगेचा भाग नाहीत, हा शोध हबल यांनी मौंट विल्सन वेधशाळेतील निरीक्षणांद्वारे लावला (१९२२–२४). त्यांनी १,३०० खगोलीय क्षेत्रे निवडून शेकडो छायाचित्रे घेतली. विशिष्ट अभ्रिकांमध्ये १२ सेफीड चल तारे असल्याचे त्यांना आढळले.

        हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.

         इटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्‍या शोधापासून सुरू झालेला अवकाश संशोधनाचा हा प्रवास आजतागायत सुरू आहे. गॅलिलिओने लावलेला दुर्बिणीचा शोध संशोधनक्षेत्रात क्रांतिकारक ठरला. त्या दुर्बिणीचे सर्वात प्रगत रूप हबल दुर्बिणीच्‍या रूपाने आपणास दिसते. अवकाशाचा वेध घेण्‍यासाठी ‘नासा’ व युरोपीयन अवकाश संस्‍था यांनी संयुक्‍त रीत्‍या तयार केलेली हबल दुर्बीण (HubbleSpace Telescope (HST)) २४ एप्रिल १९९० रोजी अवकाशात सोडण्‍यात आली. अवकाशात सोडण्‍यात आलेली ती सर्वात मोठी व प्रगत दुर्बीण. ‘हबल’ने काढलेल्‍या छायाचित्रांमुळे जगभरातील खगोलप्रेमी भारावून जातात. दुर्बिणीने लागलेल्‍या अनेक शोधांवर पुस्‍तकेही लिहिण्‍यात आली आहेत.

          पृथ्‍वीपासून तीनशेऐंशी मैल दूर अवकाशात स्थित असलेल्‍या हबल दुर्बिणीचे वस्‍तुमान अकरा हजार एकशेदहा किलोग्रॅम आहे. तिचा व्‍यास २.४ मीटर असून एकूण क्षेत्रफळ ४.५ वर्ग- मीटर एवढे आहे. पृथ्‍वीवरील परिमाणांनुसार ‘हबल’चा आकार फार मोठा नाही, मात्र तिचा अवकाशात काम करण्‍याचा आवाका फार मोठा आहे. दुर्बीण पृथ्‍वीभोवती सात हजार आठशे मीटर प्रती सेकंद वेगाने जवळपास वर्तुळाकार कक्षेत फिरते. ती दर शहाण्‍णव मिनिटांनी पृथ्‍वीची प्रदक्षिणा पूर्ण करते. दुर्बीण दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशेपासष्‍ट दिवस कार्यरत असते. ‘हबल’चे आरोग्‍य, सुरक्षा आणि कार्यक्षमता यांवर देखरेख करण्‍याचे आणि दुर्बीण नियंत्रित करण्‍यासाठी शेकडो शास्‍त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ नासा च्‍या ‘गोदार्द स्‍पेस फ्लाइट सेंटर ’ आणि ‘स्‍पेस टेलिस्‍कोप सायन्‍स इन्स्टिट्यूट ’ (STScI) येथे अहोरात्र कार्यरत आहेत. ‘हबल’ दुर्बीण पृथ्‍वीच्‍या वातावरणाबाहेर, प्रकाश प्रदूषणापासून दूर अवकाशात बसवण्‍यात आल्‍याने ती कोणत्‍याही दृश्‍यात्‍मक अडथळ्याशिवाय अवकाशाचे निर्भेळ रूप पाहू शकते. दुर्बिणीमुळे मानवाच्‍या अवकाश निरीक्षण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

             धूळ आणि हेलियमच्या ढगात ता-याचा जन्म होताना ‘हबल’ने टिपलेले हे प्रसिद्ध छायाचित्र.आकाशगंगेमध्‍ये आजवर ज्‍या सर्वांत मोठ्या तार्‍याचा जन्‍म पाहण्‍यात आला, त्‍या खगोलीय घटनेचा ‘हबल’कडून जो फोटो काढण्‍यात आला, त्‍या फोटोचा एक लहानसा भाग म्‍हणजे शेजारी दिसत असलेला फोटो. त्यावरून ‘हबल’च्‍या कामाच्‍या व्‍याप्‍तीचा अंदाज यावा.

    हबल दुर्बिणीने घेतलेले वेध पाहण्‍याकरता येथे क्लिक करा.

           ‘हबल’ दुर्बिणीला २४ एप्रिल २०११ रोजी वीस वर्षे पूर्ण झाली. रॉकेट इंजिनीयरिंगचे प्रणेते हर्मन ओबर्थ , रॉबर्ट गोदार्द आणि कॉन्स्टंटाइन सिओलकोव्हस्की या शास्त्रज्ञांपैकी हर्मन ओबर्थ यांनी १९२३ साली ‘The Rocket into Planetary Space’ हा प्रबंध लिहून पृथ्वीच्या कक्षेत एक दुर्बीण रॉकेटच्या साहाय्याने फिरती ठेवता येईल, अशी कल्पना मांडली. अमेरिकेच्‍या एडविन हबल (१८८९-१९५३) या खगोलशास्त्रज्ञाच्‍या नावावरून दुर्बिणीचे नामकरण करण्‍यात आले. एडवीन हबल यांनी १९२४ साली अवकाश निरीक्षण करण्‍याच्‍या हेतूने त्‍या काळची सर्वात मोठी शंभर इंचाची हूकर दुर्बीण वापरली होती. ‘हबल’चे यशस्‍वी प्रक्षेपण २४ एप्रिल १९९० रोजी डिस्कव्‍हरी या स्‍पेस शटलच्‍या साह्याने करण्‍यात आले. ‘हबल’चे अवकाशातील स्‍थान पृथ्‍वीपासून फार जवळ असल्‍याने आकाश निरभ्र असल्‍यास तिच्‍या गडद रंगामुळे ती साध्‍या डोळ्यांनीही दिसू शकते. (‘हबल’ कोणत्‍या वेळी पाहता येईल हे जाणण्‍यासाठी येथे क्लिक करा. तेथे select from map वर क्लिक करून आपला देश-शहर निवडा. मग satellites मध्‍ये HST वर क्लिक करा. तेथे हबल कोणत्‍या वेळी पाहता येईल याचा तक्‍ता दिसेल.)

        ‘हबल’ने आपल्‍या वीस वर्षांच्‍या कार्यकाळात पाच लाखांहून अधिक छायाचित्रे पृथ्‍वीकडे पाठवली आहेत. या छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून ‘हबल’ने ब्रम्‍हांडाच्‍या माहितीचा प्रचंड साठा मानवाला खुला करून दिला आहे. १३.७५ अब्‍ज वर्षापूर्वी झालेल्‍या महास्‍फोटातून विश्‍वाचा जन्‍म झाला ही गोष्‍टही हबलमुळे सिद्ध झाली आहे. या दुर्बिणीमुळे शास्‍त्रज्ञांना डार्क एनर्जी ची माहिती मिळाली. तसेच आतापर्यंत कल्‍पनाविष्‍कार समजली जाणारी ‘कृष्‍णविवर’ ही संकल्‍पना प्रत्‍यक्ष अस्तित्‍वात असल्‍याचे पुरावेही ‘हबल’ने दिलेले आहेत.
    ‘हबल’ अवकाशात सोडण्‍यात आल्‍यानंतर तिचा सुरुवातीचा काही काळ निरीक्षणकर्त्‍यांसाठी असमाधानाचा ठरला. सुरुवातीलाच ‘हबल’चे भिंग नादुरुस्‍त झाले. त्‍यामुळे दुर्बिणीकडून चांगली छायाचित्रे प्राप्‍त होत नव्‍हती. ‘हबल’वर प्रचंड खर्च झालेला असल्‍याने त्‍यावेळी प्रकल्‍पावर मोठी टिका करण्‍यात आली. मात्र शास्‍त्रज्ञ आणि अभियंत्‍यांनी ‘हबल’च्‍या दुरुस्‍तीसाठी दहा दिवसांची मोहीम आखली होती. दुरुस्‍तीची ही घटना कादंबरी-चित्रपटात शोभावी अशीच आहे. दुरुस्‍तीसाठी पाठवलेल्‍या यानांनी ‘हबल’चा दोन दिवस अवकाशात पाठलाग केला. त्‍यानंतर यानाच्‍या महाकाय हातांनी ‘हबल’ला पकडले. तिची दुरुस्‍ती केली. त्‍यानंतर तिच्‍या चाचण्‍या केल्‍या आणि तिला अवकाशात सोडून दिले. दुर्बिणीची वैज्ञानिक उपकरणे सुधारण्‍यासाठी तसेच तिची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी १९९० पासून चार मोहिमा पार पडल्‍या आहेत. ‘हबल’ कार्यक्षमतेने अवकाशनिरीक्षणात गुंतलेली आहे. दुर्बीण आणखी पंधरा ते वीस वर्षे सक्षमतेने काम करू शकेल, असे शास्‍त्रज्ञ सांगतात.

           नव्‍याचा शोध घेणे हा मानवाचा स्‍थायिभाव आहे आणि त्यास ‘हबल’ पूरक ठरली आहे. तार्‍यांचे जन्‍म-मृत्‍यू, आकाशगंगेचा विस्‍तार अशा अनेक संकल्‍पना ‘हबल’ने छायाचित्रांच्‍या मदतीने समजावून सांगितल्‍या आहेत. केवळ वर्तमान नव्‍हे तर भूतकाळाची खिडकी उघडावी त्‍याप्रमाणे विश्‍वनिर्मिती, तारे-ग्रहांची निर्मिती आणि अन्‍य बर्‍याच घटनांची माहिती मानवाला पुरवलेली आहे. ती अधिक विश्‍वसनीय, वस्‍तुनिष्‍ठ आणि सैद्धांतिक मांडणीस प्रेरक ठरत आहे.


    No comments:

    Post a Comment