Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, November 6, 2017

    चालू घडामोडी -6 नोव्हेंबर 2017

    Views

    ६ नोव्हेंबर २०१७



    भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप जिंकला


    भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग 13 वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे 2004 मध्ये असे घडले होते; तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे 13 वर्षांनी घडले आहे.

    🏑 जपानमध्ये 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीतभारतीय महिलांनी चीनचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असे पराभूत करत विजेतेपद मिळविले.

    🏆 भारतीय पुरुष हॉकी संघाने 2003 मध्ये क्वालालंपूरआशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका वर्षाने भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा आशिया कप जिंकला, त्या वेळी पुरुष विजेतेपद भारताकडेच होते. आता 13 वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघ जिंकला. त्यापूर्वी केवळ 15 दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ढाक्‍यात आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.

    🏑 भारतीय महिलांनी यापूर्वी 2004 मध्ये भारतातच झालेल्या स्पर्धेत जपानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. 2009 मध्ये विजेतेपदाच्या लढतीत चीनकडूनच झालेल्या पराभवाचा परतफेड या विजयाने केली. तसेच 1999 मध्ये देखील त्या उपविजेत्या राहिल्या होत्या.


    जगभरातील काळा पैसा उजेडात<





    नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त 'अँटी ब्लॅक मनी डे'साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली असतानाच 'पॅराडाईज पेपर्स' उजेडात आले आहे.


    'पॅराडाईज पेपर्स'मध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला असून या कंपन्यांचा वापर जगातील श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत होती. यामध्ये भारतातील दिग्गज नेते, सिनेसृष्टीतील कलावंत आणि उद्योजकांचे नावही समोर आले आहे.


    जर्मनीतील 'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील इंडियन एक्स्प्रेससह जगातील96 नामांकित माध्यमसमूहांनी 'पॅराडाईज पेपर्स'चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.


     'पॅराडाईज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची 13.4 दशलक्ष कागदपत्रे उघड करण्यात आली आहे.


     बर्म्युडामधील अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी या कंपन्यांनी कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 19 ठिकाणांवरुन स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा फिरवल्याचा गौप्यस्फोट 'पॅराडाईज पेपर्स'मधून करण्यात आला आहे. त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंतांनी आपली मालमत्ता लपवली आणि कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

    तसेच 714 भारतीयांचा या यादीत समावेश असून'पॅराडाईज पेपर्स'मधील 180 देशांच्या यादीत भारत 19व्या स्थानी आहे.




    सोलापूर विद्यापीठाचे नामांतर होणार



    धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संवैधानिक तरतुदींचे पालन करीत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.धनगर आरक्षणाचा दिलेला शब्द पूर्ण करणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.


     धनगर समाज संघर्ष समितीतर्फे 5 नोव्हेंबर रोजी स्नेहनगर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात ते बोलत होते.

     केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, मत्स्य, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, गणेश हाके उपस्थित होते. 

     मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी केंद्राला पाठविलेल्या शिफारसपत्रात धनगर आरक्षणासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता करू शकत नसल्याचे नमूद करून समाजाची फसवणूक करण्यात आली. आता टीआयएसएसमार्फत सर्व पुराव्यांसह अहवाल तयार करण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंत हा ऐतिहासिक अहवाल तयार होईल. त्यानंतर संवैधानिक तरतुदींचे पालन करून शिफारसपत्र केंद्राला पाठविण्यात येईल. लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आरक्षण मिळवून घेतले जाईल. हे आरक्षण देताना काही विघ्नसंतोषी लोकांकडून आदिवासींना भडकविण्याचे काम सुरू आहे; पण आदिवासी आरक्षणाला बाधा निर्माण न करता धनगर समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


    टॉरेन्टला व्यवसायविक्रीस युनिकेम बोर्डाची मंजुरी



    ❇ युनिकेम लॅबोरेटरिज लि.च्या भारत व नेपाळमधील औषध उत्पादन, विक्री व वितरणाच्या व्यवसायाची अनुषंगिक मालमत्ता व कर्मचा-यांसह टॉरेन्ट फार्मास्युटिकल्स लिमिटेडला विक्री व हस्तांतरण करण्याच्या व्यवहारास युनिकेम कंपनीच्या संचालक मंडळाने 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.

    ❇ या व्यवहार एकूण 3,600 कोटी रुपयांचा असून त्यासंधीच्या अटी व शर्ती दोन्ही कंपन्यांनी वाटाघाटी करून याआधीच ठरविल्या असून त्यासंबंधीचे औपचारिक करार लवकरच केले जातील. या व्यहारामुळे युनिकेमचे भारत व नेपाळमधील अनेक ब्रॅण्ड, सिक्किममधील कारखाना व या व्यवसायाशी संबंधित कर्मचारी टॉरेन्ट कंपनीकडे हस्तांतरित होतील.


    ❇ भागधारकांच्या संमतीसह अन्य वैधानिक मंजुर्‍या मिळून डिसेंबर 2017 अखर हा व्यवहार पूर्ण होईल. त्यानंतरही युनिकेम ही शेअर बाजारातील लिस्टेट कंपनी म्हणून कायम राहील व तिच्या सध्याच्या भागभांडवल रचनेत त्याने काही फेरबदल होणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🎯🎯 *_दिनविशेष_*

    ♦सन 1860 मध्ये 6 नोव्हेंबर रोजी अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
    ♦ दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना 6 नोव्हेंबर 1913 रोजी अटक झाली होती.


    रेल्वेच्या तिकिटांवर लवकरच तृतीयपंथीयांसाठी पर्याय


    🚉रेल्वेकडून लवकरच आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. सध्या रेल्वे तिकिटासाठी आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला असे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र आता तिकीट आरक्षित करताना आणि ते रद्द करताना भरावा लागणाऱ्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी वेगळा पर्याय दिला जाणार आहे. याबद्दलची सूचना रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागांना देण्यात आली आहे.
    🚉  'तिकीट अर्जात पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे एम आणि एफ असे दोन पर्याय देण्यात येतात. मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी टी हा पर्याय द्यावा,' अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे.
    🚉  रेल्व बोर्डाने सर्व विभागांना लिहिलेल्या पत्रात सामाजिक न्याय मंत्रालयाकडून तृतीयपंथीयांसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख आहे. तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक 2016 चा संदर्भही या पत्रात आहे.
    🚉 संसदेच्या स्थायी समितीकडून सध्या तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयकाचा आढावा घेतला जात आहे. 'सामाजिक न्याय मंत्रालयाकडून याबद्दलची सूचना येण्यापूर्वी तिकीट अर्जावर तृतीयपंथींयांसाठी 'टी' हा पर्याय देण्यात यावा,' असे रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना 17 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रेल्वेच्या सर्व विभागांनी या सूचनेचे पालन करावे, अशी ताकीदही पत्रातून देण्यात आली आहे.

    वातावरणातील कार्बनच्या प्रमाणात उच्चांकी वाढ


    पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले असून पॅरिस हवामान करारातील उद्दिष्टे गाठण्यासाठी कृती करण्याची नितांत गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
     जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2016 या वर्षांत वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. 2016 मध्ये ते 403.3 पीपीएम होते, तर 2015 मध्ये 400 पीपीएम होते. मानवी कृती व एल निनो यामुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे.

     ग्रीनहाऊस गॅस बुलेटिन या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात 1970 पासून वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढतच गेले त्यात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण तर खूपच वाढले. कार्बन डायॉक्साईडची संहती वाढण्याचे प्रमाण एवढे जास्त तीन ते पाच दशलक्ष वर्षांपूर्वी होते. त्यावेळी सागरी पातळी आताच्या पेक्षा 20 मीटरने अधिक होती.

     तसेच कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायूंच्या प्रमाणात कपात केल्याशिवाय आपण तापमानवाढीच्या धोक्यापासून वाचू शकत नाही. शतकाअखेरीस हे प्रमाण खूपच वाढलेले असेल त्यामुळे पॅरिस करारात दिलेली हवामान उद्दिष्टे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख पेटेरी तलास यांनी सांगितले.

    No comments:

    Post a Comment