Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, September 28, 2017

    चालू घडामोडी 28 सप्टेंबर 2017

    Views

    🔹नवी दिल्लीत प्रथम भारत मोबाईल परिषद आयोजित


    27 सप्टेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत प्रथम भारत मोबाईल परिषद (India Mobile Congress) चे उद्घाटन करण्यात आले आहे. ही परिषद तीन दिवस चालणार आहे.
    निर्णयानुसार, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने दरवर्षी भारत मोबाईल परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशन (ICA) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनी (NASSCOM) यांचा हा एक संयुक्त कार्यक्रम आहे. ही परिषद मोबाइल, इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करणार.
    स्त्रोत: इंडिया टूडे

    🔹‘5G भारत 2020’ साठी उच्चस्तरीय मंचाची स्थापना


    भारतात 5G तंत्रज्ञान आणण्याच्या उद्देशाने ‘5G भारत 2020’ साठी उच्चस्तरीय मंचाची स्थापना केंद्र शासनाने केली आहे.

    दूरसंचार विभाग/मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST) येथील तीन सचिवांचा तसेच उद्योग, उद्योग संघटना, प्राध्यापक यांचादेखील या मंचात समावेश आहे. मंचात विविध क्षेत्रांसाठी सुकाणू समिती गठित केली जाणार.

    5G तंत्रज्ञानासंदर्भात लवकर अंमलबजावणी


    जागतिक बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक उत्पादने निर्मिती तसेच भारतीय व जागतिक बाजारपेठेत वाटा मिळविण्याच्या उद्देशाने दृष्टीकोन तयार करणे आणि कृती योजना आखणे हे या मंचचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारताच्या सर्व शहरी क्षेत्रात 10 Gbps आणि ग्रामीण क्षेत्रात 1 Gbps गतीच्या अति-उच्च क्षमतेच्या ब्रॉडबॅंडच्या 100% कवरेजला जलद गतीने प्राप्त करणे.

    मोबाइल पिढी:

    नॉर्डिक मोबाईल टेलिफोन कंपनीने 1982 साली पहिली 1G प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर 1992 साली 2G, 2001 साली 3G मध्ये प्रदर्शित झाली. 4G प्रणालीचा विकास 2001/2002 मध्ये सुरू झाला. त्यानंतर एप्रिल 2008 मध्ये 5G संचार तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अमेरिकेच्या NASA ने मशीन-टू-मशीन इंटेलिजन्स (M2Mi) कॉर्पसोबत भागीदारी केली. फेब्रुवारी 2017 मध्ये, भारत सरकारच्या BSNL ने 5G नेटवर्कची स्थापना करण्यासाठी नोकिया कंपनीसोबत करार केला.


    🔹मुंबईत ‘INS तारासा’ जहाज भारतीय नौदलात सामील


    26 सप्टेंबर 2017 रोजी ‘INS तारासा’ हे वॉटर जेट FAC जहाज भारतीय नौदलात सामील करण्यात आले. या जहाजाचे तळ मुंबईमध्ये असेल.
    ‘INS तारासा’ पश्चिमी नौदलाच्या आदेशाखाली असेल आणि ले. कमांडंट प्रविण कुमार या जहाजाचे कप्तान आहेत. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स (GRSE), कोलकाता द्वारा निर्मित हे जहाज नौदलाच्या वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (FAC) श्रेणीमधील (INS तारमुगली, तिहायु, तिलांचांग यानंतर) चौथे आणि शेवटचे आहे.
    ‘INS तारासा’ जहाजाची लांबी 50 मीटर असून तीन वॉटर जेटच्या सहाय्याने जहाज 35 नॉट इतका कमाल वेग गाठू शकते. जहाज 30 मिमी स्वदेशी बनावटीची मुख्य तोफ तसेच हलक्या, मध्यम आणि अवजड मशीनगने सुसज्जित आहे. जहाज मदत व बचावकार्य, मानवतावादी कार्ये आदींसाठी योग्य आहे.

    🔹उपराष्ट्रपतींच्या हस्ते कर्नाटकात ‘शौचालयाक्कागी समरा’ कार्यक्रमाचे उद्घाटन


    उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांच्या हस्ते 26 सप्टेंबर 2017 रोजी कर्नाटकच्या हुबळी शहरात एका समारंभात ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ आणि ‘शौचालयाक्कागी समरा’ (म्हणजेच शौचालयासाठी युद्ध) कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
    ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ आणि स्‍वच्‍छ भारत मोहिमेचा भाग म्हणून हा कार्यक्रम चालवल्या जात आहे. या कार्यक्रमामधून स्‍वच्‍छतेसंबंधी कार्यांमध्ये लोकसहभाग वाढावा यादृष्टीने कार्य केले जाईल.

    ‘स्‍वच्‍छता ही सेवा’:

    15 सप्टेंबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते बिहारमध्ये 15 दिवसांचा ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या काळात राबवला जात आहे. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या समन्वयाने स्वच्छ भारत अभियान मंत्रालयाद्वारे हा कार्यक्रम चालविला जात आहे.

    🔹सामाजिक न्याय मंत्रालयाच्या ‘दिव्‍यांग सारथी’ अॅपचे अनावरण झाले


    सामाजिक न्‍याय व सशक्तिकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते ‘दिव्‍यांग सारथी’ मोबाइल अॅपच्या बीटा संस्‍करणाचे उद्घाटन करण्यात आले.
    सामाजिक न्‍याय व सशक्तिकरण मंत्रालयाने हे मोबाइल अॅप दिव्‍यांगजनांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती, संस्थात्मक मदत आणि मंत्रालयाच्या दिव्‍यांगजनाचे सशक्तिकरण विभागासंबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रासंगिक माहिती मिळविण्यास सुलभता प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे.

    भारत आणि दिव्‍यांग लोकसंख्या:
    2011 सालच्या जनगणनेनुसार भारतात 2.68 कोटी इतकी दिव्‍यांग लोकसंख्या आहे, जे की एकूण लोकसंख्येच्या 2.2% हून अधिक आहे. दिव्‍यांगजनांचे अधिकार ‘दिव्‍यांगजनांचे अधिकार अधिनियम 2016’ मधून जपले जाते. दिव्‍यांगजनांसाठी भारतास अनुकूल करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी 3 डिसेंबर 2015 रोजी ‘सुगम्य भारत अभियान’ सुरू केले.


    🔹जागतिक पर्यटन दिवस: 27 सप्टेंबर


    दरवर्षी 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन 1980 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे.

    या वर्षी ‘सस्टेनेबल टूरिजम – ए टूल फॉर डेवलपमेंट’ या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी या दिवसाचे आयोजकत्व दोहा (कतार) कडे देण्यात आले आहे.

    ▪️दिवसाचा उद्देश - पर्यटन आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक मूल्यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर समुदायांमध्ये जागृती निर्माण करणे. तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशांना उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे.

    पर्यटन उद्योग हा देशाच्या उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देतो आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करते. शिवाय रोजगाराच्या दृष्टीने हे क्षेत्र सर्वाधिक रोजगार प्रदान करते.

    ▪️पर्यटनात भारत

    भारत जगातल्या पाच शीर्ष पर्यटक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पर्यटन विभागाने सप्टेंबर 2002 मध्ये 'अतुल्य भारत' नावाने एक राष्ट्रीय अभियान सुरू केले. या अभियानाचा उद्देश म्हणजे भारतीय पर्यटनाला वैश्विक मंचावर चालना देणे. या अभियानांतर्गत हिमालय, वन्य जीव, योग आणि आयुर्वेद वर आंतरराष्ट्रीय समूहांचे लक्ष खेचले गेले.

    ▪️पार्श्वभूमी

    सन 1970 च्या 27 सप्टेंबर या तारखेला संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटनाचे (UNWTO) संविधान स्वीकारले गेले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 27 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाचा रंग निळा आहे.

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने वर्ष 2017 ला ‘विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले गेले आहे.

    हे क्षेत्र जगाच्या सकल स्थानिक उत्पादनात अंदाजे 10% चे योगदान देते आणि जागतिक स्तरावर 10 पैकी 1 या प्रमाणात हे क्षेत्र रोजगार प्रदान करते. अंदाज आहे की, सन 2030 पर्यंत दरवर्षी 3.3% दराने पर्यटन क्षेत्राची वाढ होईल.

    🔹अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: 26 सप्टेंबर


    दरवर्षी 26 सप्टेंबरला जगभरात 'अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons) पाळला जातो. हा दिवस जगाला अण्वस्त्रापासून मुक्त करण्यासाठी समर्पित आहे, हे की संयुक्त राष्ट्रसंघाचे खूप जुने उद्दिष्ट आहे.

    ▪️उद्देश -
    उच्च प्राधान्य म्हणून जगाला अण्वस्त्रापासून मुक्त करण्यासाठी जागतिक समुदायांना आपल्या बांधिलकीची पुष्टी करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी नागरिकांना आणि नेत्यांना अण्वस्त्रे नष्ट केल्यास त्यापासून होणार्‍या वास्तविक फायद्यांविषयी जागृती निर्माण केले जाते.

    1978 साली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आपल्या प्रथम विशेष सत्रात पुष्टी केली की अण्वस्त्राच्या निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 1975 सालापासून, न्यूक्लियर नॉन-प्रोलीफरेशन ट्रिटी हा जवळपास प्रत्येक आढावा बैठकीचा एक प्रमुख विषय आहे.

    ▪️पार्श्वभूमी

    अण्वस्त्रांच्या जगभरातून पुर्णपणे निर्मूलनाच्या उद्देशाने 26 सप्टेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आण्विक शस्त्रसंन्यास (nuclear disarmament) वरच्या उच्च स्तरीय बैठकीनंतर ऑक्टोबर 2013 मध्ये पहिल्यांदा ठराव (A/RES/ 68/32) प्रस्तावित करण्यात आला. त्यानुसार दरवर्षी 26 सप्टेंबरला जगभरात अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळला गेला.

    🔹गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘पेंसिल’ व्यासपीठाचे उद्घाटन


    26 सप्टेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बालमजुरी विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘पेंसिल’ नावाच्या इलेक्ट्रॉनिक व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.
    ‘पेंसिल’ हे कामगार व रोजगार मंत्रालयाद्वारा विकसित केले गेलेले एक इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ आहे, ज्यामुळे बालमजुरीला आळा घालण्यास मदत होईल. या व्यासपीठाचे हे घटक आहेत - चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टम, तक्रार विभाग, राज्य सरकार, राष्ट्रीय बालमजुरी प्रकल्प, परस्पर सहयोग.

    ▪️भारतामधील बालमजुरीसंबंधी कायदे:

    1986 साली पहिल्यांदा बालमजुरी कायदा भारतात लागू झाला. त्यानंतर देशात 1 सप्टेंबर 2016 पासून बालमजुरी (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 लागू करण्यात आला. यानुसार, कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील मुलांना रोजगार प्रदान करणे गुन्हा आहे. राष्ट्रीय बालमजुरी प्रकल्प, 1988 च्या माध्यमातून बालमजुरीच्या सर्व प्रकारामधून बालकांना बाहेर काढणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासंबंधी प्रयत्न सुरू आहेत.

    🔹दिनदयाल बंदर - कांडला बंदराचे नवे नाव


    गुजरातमधील कांडला बंदराचे नाव बदलून पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या नावाने ‘दिनदयाल बंदर’ असे करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर 2017 पासून हे नाव प्रभावी करण्यात आले आहे.

    भारतीय बंदर अधिनियम 1908 अंतर्गत केंद्र शासनाला बंदराचे नाव बदलण्याचा अधिकार मिळतो.

    ▪️दिनदयाल (पूर्वीचे कांडला) बंदर:

    गुजरातमधील दिनदयाल (पूर्वीचे कांडला) बंदर हे भारतामधील 12 सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. सन 1931 मध्ये महाराव खेंगर्जी यांनी समुद्रात लहान धक्का बांधून या बंदराच्या कार्यास सुरूवात केली. वित्तीय वर्ष 2015-16 मध्ये 100 दशलक्ष टन वजनाची मालवाहतूक हाताळून या बंदराने इतिहास घडवला आणि यासोबतच हा इतिहास घडवणारे कच्छच्या प्रदेशात स्थित आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांपैकी एक असे हे बंदर भारतातले सर्वात पहिले बंदर ठरले.

    🔹पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ चा शुभारंभ केला


    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रत्येक घरापर्यंत वीज उपलब्ध करून देण्याचे सुनिश्चित करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना –सौभाग्य’ हे नाव आहे.

    ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ मर्यादित (REC) ही योजनेच्या अंमलबजावणीसाठी मध्यवर्ती संस्था म्हणून नेमण्यात आली आहे.

    ▪️योजनेचे स्वरूप:

    16,320 कोटी रूपयांचा योजनेच्या खर्चाचा आराखडा आहे आणि यामध्ये 12,320 कोटी रूपयांची सकल अर्थसंकल्पीय मदत (GBS) प्रदान केली जाईल.
    ग्रामीण क्षेत्रासाठी योजनेत 14,025 कोटी रूपयांची तरतूद आहे आणि त्यासाठी 10,587.50 कोटी रूपयांची सकल अर्थसंकल्पीय मदत (GBS) प्रदान केली जाईल.

    शहरी क्षेत्रासाठी योजनेत 2,295 कोटी रूपयांची तरतूद आहे आणि त्यासाठी 1,732.50 कोटी रूपयांची सकल अर्थसंकल्पीय मदत (GBS) प्रदान केली जाईल.
    केंद्र शासन या योजनेसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मोठ्या प्रमाणात वित्तीय सहाय प्रदान करणार.

    योजनेंतर्गत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत सर्व घरांना वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

    योजनेंतर्गत निशुल्क वीज जोडणीसाठी लाभार्थ्यांची निवड वर्ष 2011 च्या सामाजिक आर्थिक आणि जाती लोकसंख्या (SECC) द्वारा केली जाईल. यानुसार वीज जोडणी नसलेल्या घरांना केवळ 500 रुपयांच्या खर्चाने वीज जोडणी प्रदान केली जाईल. ही रक्कम वीज बिलाच्या 10 हप्त्यांमधून परत केली जाईल.

    दुर्गम क्षेत्रात वीज जोडणी नसलेल्या घरांना बॅटरी बँक सहित 200-300 Wp क्षमतेचे सौर ऊर्जा पॅक प्रदान केले जातील. यामध्ये 5 LED दिवे, एक DC पंखा आणि एक DC पॉवर प्लगचा समावेश आहे. यासोबतच पाच वर्षापर्यंत त्यांची निगा राखली जाईल.

    🔹राजीव मेहरीशी यांनी CAG पदाची शपथ घेतली


    माजी गृहसचिव राजीव मेहरीशी यांनी 25 सप्टेंबर 2017 रोजी नियंत्रक आणि महालेखाकार (Comptroller and Auditor General -CAG) पदाची शपथ घेतली. मेहरीशी यांचा कार्यकालावधी तीन वर्षांचा आहे.

    शशिकांत शर्मा यांच्या जागेवर राजीव मेहरीशी यांनी CAG चा पदभार सांभाळलेला आहे. 62 वर्षीय मेहरीशी 1978 सालचे (निवृत्त) भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.

    ▪️CAG:
    CAG पदावर सहा वर्षांसाठी किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत, यापैकी जे अगोदर होईल, नियुक्त केले जाते. CAG कडे प्रामुख्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    🔹स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापुर देशात पाहिलं


    कोल्हापूर - स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापुरनं देशात पहिला नंबर पटकावला आहे. देशभरातील सर्वच शहरांना मागे टाकत हा किताब पटकावला आहे. स्वच्छतेच्या गुणांकनात कोल्हापूरनं सर्वाधिक 90 गुण मिळवले आहेत. 2 ऑक्टोबरला रोजी स्वच्छता दर्पण पुरस्कराने गौरव कोल्हापूरचा गौरव करण्यात येणार आहे.


    🔹BALCO च्या 1200 MW औष्णिक वीज प्रकल्पाला बंद करण्याबाबत सूचना

    छत्तीसगड पर्यावरण संवर्धन मंडळाने (CGECB) भारत अॅल्युमिनिअम कंपनी (BALCO) लिमिटेडच्या कोरबा जिल्ह्यात स्थित 1200 मेगावॅट (MW) औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला बंद करण्याची सूचना दिली आहे.

    प्रकल्पाच्या राखेच्या साठ्यामधून राख मिश्रित पाणी बेलगिरी नाल्याच्या पाण्यात दुर्घटनेने मिसळले गेले आणि त्यामुळे पाणी प्रदुषीत करीत असल्याचे कारण पुढे करून हा निर्णय घेतला गेला.


    🔹2000-2015 दरम्यान भारतात बालमृत्यू दरात प्रचंड घट झाली: लॅन्सेट


    वैद्यकीय क्षेत्रातले नियतकालिक ‘लॅन्सेट’ ने नवजातांच्या मृत्युदरासंदर्भात त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालासाठी विशिष्ट कारणांस्तव नवजात (1 महिन्याहून कमी वयाचे) आणि 1-59 महिन्यांच्या वयोमर्यादेत मृत्यूदराचे सर्वेक्षण केले गेले. सर्वेक्षणानुसार, सन 2000 ते सन 2015 या काळात भारतात बालमृत्यू दरात प्रचंड घट झाल्याचे दिसून आले आहे.

    भारतात नवजातांच्या मृत्युदरात वार्षिक सरासरी 3.4% आणि 1-59 महिन्यांच्या वयोमर्यादेत मृत्यूदरात 5.9% इतकी घट नोंदवली गेले. 2005 सालापासून प्रथमच या स्वरुपात घट दिसून आलेली आहे, ज्यामुळे 2000-2005 च्या परिणामांच्या तुलनेत एक दशलक्षापेक्षा अधिक बालमृत्यू टळलेले आहेत.

    ▪️ठळक बाबी

    संक्रमणाने होणार्‍या नवजातांच्या बालमृत्यू दरात 66% ची घट झालेली असून हा दर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 11.9 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 4.0 इतक्यावर आला.

    श्वासोच्छवासासंबधी किंवा मानसिक अवस्थेसंदर्भात होणार्‍या बालमृत्यू दरात 76% ची घट झालेली असून हा दर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 9.0 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 2.2 इतक्यावर आला.

    1-59 महिन्यांच्या वयोमर्यादेत, न्यूमोनियामुळे होणार्‍या मृत्यूदरात 63% ची घट झालेली असून हा दर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 11.2 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 4.2 इतक्यावर आला.

    अतिसारमुळे होणार्‍या मृत्यूदरात 66% ची घट झालेली असून हा दर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 9.4 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 3.2 इतक्यावर आला.

    नवजात टिटेनस मृत्युदर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 1.6 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 0.1 इतक्यावर आला.

    1-59 महिन्यांच्या वयोमर्यादेत, गोवरमुळे होणारा मृत्यूदर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 3.3 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 0.3 इतक्यावर आला.

    मात्र, दिवस भरण्याआधीच किंवा कमी वजनाने होणारा मृत्यूदर सन 2000 च्या दर 1000 जन्मामागे 12.3 वरून सन 2015 मध्ये दर 1000 जन्मामागे 14.3 इतक्यावर आला. गरीब राज्यात आणि ग्रामीण भागात कमी वजनाने होणारा मृत्यूदर अधिक आहे.

    निष्कर्षानुसार, ‘लॅन्सेट’ चे असे स्पष्ट मत पडले आहे की, "बालमृत्युदरासंदर्भात 2030 शाश्वत विकास ध्येय साधण्यासाठी, भारताला 1-59 महिन्यांच्या वयोमर्यादेतला मृत्युदर सध्याप्रमाणेच कायम ठेवण्याची गरज आहे आणि सन 2015 नंतर पुढे नवजातांच्या मृत्यूदर (वार्षिकी >5% पर्यंत) कमी असायला हवे. तसेच न्युमोनिया, अतिसार, मलेरिया आणि गोवर यामुळे 1-59 महिन्यांच्या वयोमर्यादेतला मृत्युदर कमी होण्याची संभवता आहे. कमी वजनाच्या मुद्दयाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे."

    🔹23 सप्टेंबरला हैफा दिवस साजरा करण्यात आला


    23 सप्टेंबरला हैफा दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैफाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना अभिवादन केले.
    1918 साली हैफाच्या स्वातंत्र्य चळवळीत वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हैफा दिवस साजरा केला जातो.

    ▪️हैफा:

    हैफा हे उत्तर इस्राइलचे बंदर शहर आहे. हैफाची लढाई 23 सप्टेंबर 1918 रोजी शरोनची लढाई संपवण्यासाठी लढली गेली. या लढाईत भारतीय 15 वे (इम्पेरियल सर्व्हिस) कॅव्हेलरी ब्रिगेड, 5 वे कॅव्हलरी डिव्हिजन आणि डेझर्ट माउटेड कॉर्प्सचा भाग या भारतीय सैन्य तुकडीने ओट्टोमन साम्राज्यावर हल्ला चढवून हैफा आणि एकर या शहरांना ताब्यात घेतले.

    🔹ईशान्य भारतातल्या सात राज्यांमध्ये ‘मिशन इंद्रधनुष’ राबविणार


    ईशान्य भारतातल्या सात राज्यांमध्ये 7 ऑक्टोबर 2017 पासून तीव्र स्वरूपात 'मिशन इंद्रधनुष' या भारत सरकारच्या प्रमुख लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केल्या जाणार आहे.
    यामध्ये निवडक शहरी क्षेत्रांमध्ये आणि अन्य ठिकाणी, जेथे लसीकरण कमी प्रमाणात केले जाते, तेथे लक्ष केंद्रित केले जाईल.

    ▪️मिशन इंद्रधनुष:

    2020 सालापर्यंत देशातील सर्व बालकांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत आणण्यासाठी 15 डिसेंबर 2014 रोजी मिशन इंद्रधनुष हे अभियान आरोग्य मंत्रालयाने सुरू केले. ऑक्टोबर 2017 आणि जानेवारी 2018 दरम्यान प्रत्येक महिन्यात 7 दिवसांमध्ये 187 जिल्ह्यांमध्ये चार लसीकरण फेरीत हा कार्यक्रम पूर्ण केला जाईल. यामध्ये 16 उच्च प्राधान्य असलेल्या राज्यांमधील 118 जिल्हे, 17 शहरी क्षेत्रे आणि ईशान्यकडील 52 जिल्हे यांचा समावेश करण्यात आला आहे. 2018 सालापर्यंत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध सर्व लसी दोन वर्षापर्यंतची बालके आणि गर्भवती स्त्रियांना प्रदान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे.

    🔹हैदराबाद येथे 'प्रलय सहायम' सरावाची सांगता


    23 सप्टेंबर 2017 रोजी हैदराबाद येथे हुसैनसागर तलावाच्या किनारी 'प्रलय सहायम' या अनेक संस्थांचा सहभाग असलेल्या सरावाची सांगता झाली. या कार्यक्रमात हैदराबाद शहरातील नागरी पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व केंद्रीय व राज्य संस्था, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि सशस्त्र दल यांच्या प्रयत्नांचे प्रदर्शन नागरिकांना घडविण्यात आले. यामध्ये प्लान इंडिया, केयर इंडिया, स्फीयर इंडिया आदी स्वयंसेवी संस्था या कार्यक्रमात सहभागी झालेत.

    🔹अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत तिसर्‍या क्रमांकावर


    ‘वर्ल्ड न्यूक्लियर इंडस्ट्री स्टेटस रीपोर्ट 2017’ अहवालानुसार, अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत 6 अणुभट्ट्यासह जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर चीन हा या यादीत 20 अणुभट्ट्यासह प्रथम क्रमांकावर आहे.

    बांधकाम चालू असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाची संख्या सलग चौथ्या वर्षामध्येही जागतिक स्तरावर घटली आहे, जी 2013 साली 68 होती आणि आता 2017 साली ही संख्या 53 पर्यंत आली आहे. वेळापत्रकानुसार 37 अणुभट्ट्याना विलंब होत आहे. भारतामधील सहा अणुभट्ट्यापैकी पाचला विलंब झालेला आहे.

    2016 साली जागतिक स्तरावर अणुऊर्जेत 1.4% ने वाढ झाली आणि वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा 10.5% होता. तसेच जागतिक स्तरावर पवन ऊर्जा उत्पादन 16% आणि सौर ऊर्जा 30% पर्यंत वाढले. जागतिक नविकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता 62% एवढी आहे.

    🔹‘पंडित दीनदयाल उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल प्रकल्प’ चा शुभारंभ


    भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने आता ग्रामीण भारतामध्ये विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी प्रथमच ‘पंडित दीनदयाल उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल प्रकल्प’ नावाने एक नवा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भूविज्ञान आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते 22 सप्टेंबर 2017 रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल प्रकल्प’ चा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत उत्‍तराखंडमध्ये समूह पद्धतीच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी योग्य विज्ञान व तंत्रज्ञान यासंबंधी कृतींचे आयोजन केले जाणार. उत्‍तराखंडमधील ग्रामीण गावांमधील काही समूहांना दत्तक घेऊन त्यांना तंत्रज्ञान आधारित साधनांच्या वापरामधून कालबद्धरीतीने त्यांना स्‍व-शाश्वत समूह बनविण्यासाठी सक्षम करणे, ही या कार्यक्रमाची योजना आहे. प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांच्या कालावधीत 6.3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

    ▪️कार्यक्रमाचे स्वरूप

    गैंदिखाता, बजीरा, भिगुन (गढवाल) आणि कौसानी (कुमाऊं) या गावांमधील चार समूहांची निवड केली गेली. कार्यक्रमामधून उत्‍तराखंड राज्याच्या 60 गावांच्या चार निवडलेल्या समूहांमध्ये जवळजवळ एक लाख लोकांचा प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रूपाने लाभ होणार.

    दुग्ध, मध, मशरूम, हर्बल टी, वन उत्पादने, फलोत्पादन आणि स्थानिक पिके, औषधी आणि सुगंधी वनस्पती आणि पारंपारिक हस्तकला आणि हातमाग या क्षेत्रात प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पद्धती आणल्या जाणार.
    सोलर ड्रायिंग तंत्रज्ञानाद्वारे किवी, स्ट्रॉबेरी, चेरी, तुळसी, अद्रक, बडी इलायची तसेच कोल्ड प्रेस तंत्रज्ञानाद्वारे जर्दाळचे तेल काढणे.

    स्थानिक स्त्रोत तसेच उपलब्ध स्थानिक कौशल्य वापरले जाईल आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निवडक समुहांचे स्थानिक उत्पन्न आणि गुणवत्ता वृद्धिंगत केली जाईल.

    या कार्यक्रमामुळे ग्रामिणांना स्थानिक रोजगार आणि उपजीविका उपलब्ध होणार आणि अधिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल. यामुळे रोजगारासाठी गावांमधून बाहेर जाण्याची आवश्यकता निर्माण होण्यास अवरोध लागणार. पुढे या कार्यक्रमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल.

    🔹अँजेला मर्केल चौथ्यांदा विजयी!


    जर्मनीच्या चॅन्सेलर, कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन युनियनच्या नेत्या अँजेला मर्केल यांनी निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा बहुमान सोमवारी मिळवला; परंतु इस्लामविरोधी, स्थलांतरविरोधी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी या उजव्या विचारसरणीच्या पक्षाने संसदेत प्रवेश मिळवला असल्याने त्यांच्या विजयावर सावट पडले असल्याचे मानले जात आहे.

    मर्केल चौथ्यांदा विजयी झाल्या असल्या, तरी संपूर्ण बहुमत मिळवण्यात मर्केल यांचा पक्ष अपयशी ठरला आहे. ६३ वर्षांच्या मर्केल या जागतिक पातळीवर खंबीर आणि प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात. २०१५पासून त्यांच्या लोकप्रियतेमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोशल डेमॉक्रेट पक्षाच्या उमेदवारांनी मर्केल यांच्या पक्षाला चांगलीच टक्कर दिली. या पक्षाचे मार्टिन शुल्झ यांनी २० ते २१ टक्के मते मिळवली असून, हा पक्ष देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा पक्ष ठरला आहे.

    चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाची स्थापना फ्रेंच नॅशनल फ्रंट आणि ब्रिटनच्या ‘युकिप’पासून प्रेरणा घेऊन झाली. या पक्षाला जर्मनीतील कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांनी मोठा पाठिंबा दिला. लिबरल फ्री डेमॉक्रेट्सला सुमारे १० टक्के मते मिळाली आहेत. अँटी कॅपिटलिस्ट (डावे) आणि इकॉलॉजीस्ट ग्रीन या दोन पक्षांना ९ टक्के मते मिळाली आहेत. पक्षाला विजय मिळाला असला, तरी पक्षाला जी मते मिळणे अपेक्षित होती, त्यात होती त्यात ४० टक्के घट झाल्याची कबुली मर्केल यांनी दिली आहे. या मतांना पुन्हा आपल्या पक्षाकडे खेचून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

    🔹विनय क्षीरसागर यांना पुरस्कार


    इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंग या जहाजांचे वर्गीकरण करणाऱ्या अधिकृत मध्यवर्ती नियामक संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) विनय क्षीरसागर यांना यावर्षीचा इंदिरा ब्रँड स्लॅम सीएफओ लीडरशिप पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी पुण्याच्या इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला जातो. पुरस्काराचे वितरण २६ सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे.

    विनय क्षीरसागर हे सीए असून त्यांना वित्त, लेखा, कोश, प्रणाली व कॉर्पोरेट कर यांचा ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. यापूर्वी क्षीरसागर श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीत सीएफओ म्हणून १७ वर्षे कार्यरत होते.

    🔹एसबीआयचाही चॅटबोट


    आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आधार घेत भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) चॅटबोट हा ग्राहकांच्या समस्या सोडवणारा रोबो सोमवारपासून सेवेत दाखल केला. याची निर्मिती एआय बँकिंग मंच असलेल्या पेजो या कंपनीने तयार केला आहे.

    या चॅटबोटला एसबीआयने एसबीआय इंटेलिजन्ट असिस्टन्ट किंवा एसआयए (सिया) असे नाव दिले आहे. सिया हा चॅटबोट ग्राहकांना त्यांच्या बँकिंगविषयक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी एकाद्या बँक प्रतिनिधीप्रमाणेच मदत करेल. बँकिंग क्षेत्रात सिया ही क्रांती आहे, असे सांगून यामुळे बँक व ग्राहक यांच्यात संवाद साधण्याची पद्धतच बदलणार आहे, असा दावा पेजोचे संस्थापक व सीईओ श्रीनिवास एनजय यांनी केला आहे. सियामुळे एसबीआय ग्राहकांचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांचे विविधांगी प्रश्न एकाचवेळी सोडवले जातील, असा विश्वास एसबीआयचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी शिवकुमार भसीन यांनी व्यक्त केला आहे. सियामुळे बँकेच्या कामकाज खर्चाची मोठी बचत होणार आहे. सध्या सिया बँकिंग उत्पादने व सेवा यांसंदर्भातील चौकशांची निपटारा करणार आहे.

    🔹पंतप्रधानांसाठी आर्थिक सल्लागार परिषद


    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. आर्थिक विषयांचा अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असणार आहे.

    आर्थिक सल्लागार परिषदेत अर्थजगतातील दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य), डॉ. रथिन रॉय (अस्थायी सदस्य), डॉ. अशिमा गोयल (अस्थायी सदस्य) यांची परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. निती आयोगाचे सदस्य आणि मुख्य सल्लागार रतन वाटाळ यांची या परिषदेवर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    आर्थिक सल्लागार परिषद स्वायत्त असणार आहे. आर्थिक विषय तसेच त्या अनुशंगाने येणाऱ्या अन्य विषयांबाबत सरकारला विशेषत: पंतप्रधानांना सल्ला देण्याचे अधिकार या परिषदेला असणार आहेत. महत्त्वाच्या आर्थिक विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देणे, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवणे आणि पतंप्रधानांनी वेळोवेळी निश्चित केलेल्या कामांचा निपटारा करणे, अशा जबाबदाऱ्या प्रामुख्याने या परिषदेवर असणार आहेत.

    🔹पंढरीच्या विकासासाठी कॅनडाचा मदतीचा हात


    लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि कॅनडा यांच्या मत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडा सरकारने ‘स्मार्ट तीर्थक्षेत्र’ अंतर्गत पंढरपूरची निवड केली आहे. याअंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन-संवर्धन, चंद्रभागा नदी आणि वाळवंट स्वच्छ करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, प्लास्टिकमुक्त शहर आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ३ ऑक्टोबरला कॅनडा सरकारचे एक पथक पंढरपूरला भेट देणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

    🔹काम करण्यास गुगल, भेल, एसबीआय सर्वोत्तम


    21 व्या शतकात उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचाऱयांना काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. कर्मचाऱयांसाठी पोषक वातावरणनिर्मिती करत कंपनीचे प्रगती, आणि नफा वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कंपनीमध्ये नव्याने दाखल होणाऱया कर्मचाऱयांना अनुकूल वातावरण निर्मिती करण्यासाठी कंपनी आणि तेथील मनुष्यबळ विभागाकडून प्रयत्न करण्यात येतात. इंडीड या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगारविषयक वेबसाईटने भारतात गुगल, भेल आणि एसबीआय या तीन कंपन्या काम करण्यासाठी उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. या कंपनीने बुधवारी 2017 साठी काम करण्यासाठी सर्वोत्तम असणाऱया कंपन्यांची यादी जाहीर केली.

    सध्या उमेदवार वेतनाबरोबर कंपनीतील व्यवस्थापन, सुविधा, संस्कृती यांना अर्ज करण्यापूर्वी प्राधान्य देतात. यासाठी ते तेथील कर्मचाऱयांशी संवाद साधतात अथवा ऑनलाईन माध्यमांवर कंपनीचा रिव्हय़ू वाचला जातो असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार यांनी म्हटले. कर्मचाऱयांकडून मिळालेला प्रतिसाद आणि व्हिजिटर्सकडून मिळालेल्या प्रतिसादातून ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये टाटा स्टील (17 वे स्थान), भारती एअरटेल (20), अपोलो हॉस्पिटल्स (22), टाटा मोटर्स (33), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (37), एशियन पेन्ट्स (45), टाटा कम्युनिकेशन्स (46), रिलायन्स इन्डस्ट्रीज (47 व्या स्थानी) आहे.

    ▪️पहिल्या 10 कंपन्या

    कंपनी मूळ कंपनी

    गुगल…………. अमेरिका

    भेल…………… भारत

    एसबीआय…… भारत

    ऍमेझॉन……… अमेरिका

    मॅरिएट इन्टरनॅशनल अमेरिका

    इन्टेल………… अमेरिका

    अमेरिकन एक्स्पेस अमेरिका

    आयबीएम…… अमेरिका

    टीसीएस…….. भारत

    हियात अमेरिका

    🔹ट्विटरची अक्षरमर्यादा 280 वर


    ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सने संदेश लिहिण्यासाठी असलेली मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. 2006 मध्ये सुरू झाल्यापासून 140 इंग्रजी अक्षरांची मर्यादा आहे. ही मर्यादा 280 करण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे कंपनीकडून पहिल्यांदाच अधिकृतपणे बुधवारी सांगण्यात आले.

    पहिल्यापासून कंपनीने 140 अक्षरांची मर्यादा घातली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक भाषा असून वापरकर्त्यांना संपूर्ण अर्थपूर्ण संदेश लिहिणे एका ट्विटमध्ये अशक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त कमी अक्षरमर्यादा असल्याने कंपनीच्या लोकप्रियतेत घसरण होत असल्याचे समोर आले होते. इंग्रजी भाषेत 140 अक्षरांत एक संदेश लिहिणे अवघड जात होते. मात्र जपानीजमध्ये हे सहजसोपे आहे. जानेवारी 2016 मधील अहवालानुसार ट्विटर अक्षरमर्यादा वाढवित 10 हजारपर्यंत करणार असल्याचे सांगण्यात येत होते. नेते, कलाकार यांच्यासाठी लोकप्रिय असणाऱया या सोशल नेटवर्किंगने दुसऱया तिमाहीत वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ नोंदविलेली नाही. या दरम्यान कंपनीला 116 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर 328 दशलक्ष वापरकर्त्ये आहेत.

    चायनीज, जपानीज, कोरियन या भाषांमध्ये रोमन अक्षरांपेक्षा अधिक माहिती देता येते. 280 अक्षरांसाठी चालणारी ही चाचणी काही आठवडे चालू राहील. चायनीज, जपानीज आणि कोरियन या भाषांव्यतिरिक्त सर्व भाषांमध्ये ती सुरू करण्यात येईल. एसएमएसपेक्षा कमी अक्षरमर्यादा असावी असे कंपनीच्या संस्थापकांचे मत होते. सध्या एका एसएमएसमध्ये 140 शब्दांची मर्यादा असून त्यातून ही संकल्पना आकारात आली होती.

    🔹पर्यावरणपूरक खतांवर भर


    राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)ने रासायनिक खतांचे उत्पादन पर्यावरणपूरक स्वरुपात मोठय़ा प्रमाणात घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होईल. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीने देशातील विस्तार वाढविण्यावर भर दिला आहे. कंपनीचे महाराष्ट्रात दोन प्रकल्प असून येथील उत्पादन वाढीचा निर्णय घेण्यात आला. ट्रॉम्बे आणि थळ येथे असणाऱया प्रकल्पातून नायट्रोजेनस, फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खत आणि औद्योगिक खतांचे उत्पादन घेण्यात येते.

    कंपनीच्या दोन्ही प्रकल्पांना एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत एसएसओ 9001 (गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र), आयएसओ 14001 (पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली), ओएचसएसएएस-18001 (व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य व्यवस्थापण प्रणाली)ने प्रमाणित करण्यात आले आहे. ट्रॉम्बेमधील प्रकल्पाला आयएसओ 50001:2001 (ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र) मिळाले आहे. कंपनीने गेल्या अनेक वर्षांत एमओयू कार्यात उत्कृष्टतेचे मानांकन कायम राखले आहे.

    🔹‘फॉर्च्युन’मध्ये तीन भारतीय उद्योजिका


    उद्योग क्षेत्रातील प्रभावशाली महिलांची यादी फॉर्च्युन या नियतकालिकाकडून प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये तीन भारतीय उद्योजिकांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या असणाऱया इंद्रा नुयी या अमेरिकेतील उद्योजिकांच्या यादीमध्ये तिसऱया स्थानी आहेत. आंतरराष्ट्रीय यादीमध्ये चंदा कोचर आणि शिखा शर्मा यांनी स्थान पटकावले.

    आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावशाली उद्योजिकांमध्ये बॅन्को सतन्दर समूहाच्या व्यवस्थापकीय प्रमुख ऍना बॉटिन या सर्वोच्च स्थानी विराजमान आहेत. याच यादीमध्ये आयसीआयसीआयच्या चंदा कोचर पाचव्या स्थानी आणि ऍक्सिस बँकेच्या शिखा शर्मा 21 व्या स्थानी आहेत. अमेरिकेसाठीच्या यादीमध्ये पेप्सिकोच्या प्रमुख आणि सीईओ चंद्रा नुयी दुसऱया स्थानी असून सर्वोच्च स्थानी जनरल मोटर्सच्या मेरी बर्रा या आहेत. तिसऱया क्रमांकावर लॉकहिड मार्टिनच्या प्रमुख, अध्यक्षा आणि सीईओ मेरिलिन हय़ुसन आहेत.

    आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ कोचर या गेल्या आठ वर्षांपासून भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा बँकेचे प्रतिनिधीत्व करत असून बँकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे फॉर्च्युनने म्हटले. शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आल्याने बँकेच्या डिजिटल सेवेचा विस्तार होण्यास मदत होईल असे म्हणण्यात आले. आंतरराष्ट्रीय यादीमध्ये जीएसकेच्या सीईओ एम्मा वॉम्लस्ली दुसऱया स्थानी, इन्जीच्या सीईओ ईसाबेल कोचर तिसऱया क्रमांकावर आहेत. आंतरराष्ट्रीय यादीमध्ये 17 देशांच्या महिला प्रतिनिधी असून 11 नव्यानेच दाखल झाल्या आहेत.

    🔹आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपन्यांत रिलायन्स तिसऱया स्थानी


    आंतरराष्ट्रीय पातळीवर रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने भरारी मारली आहे. प्लॅट्स टॉप 250 ग्लोबल एनर्जी कंपनी रॅकिंगमध्ये रिलायन्स एनर्जी तिसऱया स्थानी पोहोचली आहे. गेल्या वर्षी कंपनी सातव्या स्थानी होती. या यादीमध्ये पहिल्या स्थानी रशियन कंपनी गाझरपॉम असून दुसऱया पातळीवर जर्मन कंपनी ई.ऑन ही आहे.

    गेल्या तीन वर्षात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने गेल्या तीन वर्षांत उत्तम भरारी मारली असून 2017 मध्ये सातव्या स्थानी पोहोचली आहे. 2016 मध्ये ही कंपनी 14 व्या स्थानी आणि 2015 मध्ये 66 व्या पातळीवर होती. ओएनजीसी ही दुसरी सरकारी कंपनी 2017 च्या यादीत 11 व्या स्थानी पोहोचली असून गेल्या वर्षी 20 व्या स्थानी होती. एस ऍण्ड पी ग्लोबल प्लॅट्स टॉप 250 ग्लोबल एनर्जी कंपनी रॅकिंगमध्ये 14 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडा एकने कमी झाला.

    कोल इंडिया या जागतिक पातळीवरील सर्वात मोठय़ा उत्पादक कंपनीचे मानांकन घसरले आहे. गेल्या वर्षी 38 व्या स्थानी असणारी कंपनी यंदा 45 व्या पातळीवर आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (39), हिंदुस्थान पेट्रोलियम (48), पॉवरग्रिड (81) आणि गेल इंडिया (106) या भारतीय कंपन्यांचे यादीमध्ये स्थान आहे. गेल्या सलग 12 वर्षी या यादीमध्ये प्रथम स्थानी विराजमान असणाऱया एक्झॉनमोबिल ही अमेरिकन कंपनी नवव्या स्थानी घसरली असून तिची जागा रशियाच्या गाझप्रोमने पटकाविली. याव्यतिरिक्त गेल्या वर्षी 114 व्या स्थानी असणाऱया ई.ऑन या कंपनीने 112 स्थाने मजल गाठत दुसऱया स्थानी पोहोचली.

    🔹झेल-धावचीतसह 6 नियम उद्यापासून बदलणार


    आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने क्रिकेटमधील बदललेले 6 नियम उद्यापासून (दि. 28) खेळवल्या जाणाऱया प्रत्येक मालिकेसाठी अमलात आणले जाणार असून बॅटची जाडी, एखाद्या खेळाडूला मैदानाबाहेर पाठवणे, झेल घेणे, धावचीत करणे व डीआरएससंबंधित अनेक बाबी यामुळे बदलल्या जाणार आहेत. नव्या नियमांची पहिली अंमलबजावणी दक्षिण आफ्रिका-बांगलादेश कसोटी व पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिकेत होईल. सध्या सुरु असणारी ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील वनडे मालिकेवर हे नियम लागू नसतील. त्यामुळे, जुन्या नियमानुसार खेळवली जाणारी ही शेवटची मालिका असेल, हे देखील यामुळे निश्चित झाले.

    बदललेल्या नव्या नियमानुसार, मैदानी पंच आता गैरवर्तन करणाऱया खेळाडूला रेड कार्ड दाखवून थेट मैदानाबाहेर पाठवू शकतील. असे निलंबन त्या सामन्यापुरते मर्यादित असेल, तसेच मालिकेतील पुढील काही सामन्यांना देखील लागू असेल. खेळाडूचे गैरवर्तन कोणत्या कक्षेत मोडते, यावर या शिक्षेचे स्वरुप अवलंबून असणार आहे. या सर्व नियमांची शिफारस मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) गतवर्षी मुंबईत डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत केली होती.

    ▪️यापुढे टॉप-अप रिव्हय़ू नाही

    एखाद्या खेळाडूने सातत्याने नियमाचा भंग केला, पंच किंवा खेळाडूंविरोधात हात उचलला, खेळाडू, पदाधिकाऱयांशी धक्काबुक्की केली किंवा मैदानावर सामना सुरु असताना कोणतीही हिंसक कृती केल्यास या नियमाचा अवलंब केला जाणार आहे. आणखी एका नव्या नियमानुसार, टी-20 क्रिकेटमध्ये देखील यापुढे डीआरएस घेता येईल. यापूर्वी, टी-20 क्रिकेटमध्ये डीआरएस घेता येत नव्हता. आणखी एका बदलानुसार, कसोटी क्रिकेटमध्ये 80 षटकानंतर ‘टॉप-अप’ रिव्हय़ू घेता येणार नाहीत. याचाच अर्थ असा की, कोणत्याही संघाला दोनपेक्षा अधिक रिव्हय़ू घेता येणार नाहीत.

    ▪️धावचीतचा नियम फलंदाजांना अनुकूल

    धावचीतशी संलग्न एक नियम आता बदलत तो फलंदाजांना पोषक केला गेला आहे. या नियमानुसार, फलंदाजाने डाईव्ह मारल्यानंतर देखील बेल्स पडत असताना फलंदाज किंवा त्याची बॅट क्रीझमधील हवेत राहिली तरी त्याला नाबाद ठरवले जाईल. अर्थात, यासाठी फलंदाजाने प्रारंभी क्रीझमध्ये पोहोचलेले असणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, बॅटची जाडी किती असावी, याबद्दल देखील आयसीसीने बंधने घालून दिली आहेत. यानुसार, बॅटची कड 40 एमएमपेक्षा व एकूण बॅटची जाडी 67 एमएमपेक्षा जास्त असू नये, अशी अट आहे. मैदानी पंचांना बॅटबद्दल साशंकता आल्यास त्यांना मैदानावरच त्याची चाचपणी करण्याचा अधिकार असेल. यासाठी पंचांना ‘बॅट गेज’ दिले जाणार आहे.

    नव्या नियमानुसार, क्षेत्ररक्षण सुरु असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या किंवा अन्य क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला आदळल्यानंतर झेल पूर्ण केला गेला किंवा यष्टीचीत, धावबाद केले गेले तर अशा परिस्थितीत फलंदाजाला बाद ठरवले जाईल. सीमारेषेवर घेतल्या जाणाऱया झेलाच्या नियमात देखील यावेळी बदल केले गेले आहेत. आता क्षेत्ररक्षक हवेत झेल घेईल, त्यावेळी हवेत झेपावण्यापूर्वी त्याचा पाय सीमारेषेच्या आत असायला हवा. यापूर्वी क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर थांबून तेथूनही हवेत झेपावत झेल पूर्ण करण्याची मुभा होती. आता मात्र तसे केल्यास फलंदाजांना षटकार बहाल केला जाणार आहे.

    ▪️असे असतील 6 नवे नियम

    1. मैदानी पंच देखील देणार रेड कार्ड

    2. टी-20 क्रिकेटमध्येही डीआरएस

    3. बेल्स पडताना बॅट किंवा शरीर हवेत असले तरी फलंदाज नाबाद

    4. बॅटची कड 40 एमएम व जाडी 67 एमएमपेक्षा जास्त नको

    5. हेल्मेटला चेंडू लागून झेल घेतला गेला, यष्टीचीत केले तरी फलंदाज बाद

    6. सीमारेषेबाहेर झेल पूर्ण केल्यास फलंदाजाला षटकार बहाल केला जाईल.

    🔹पीव्ही सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस


    क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पीव्ही सिंधूची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण या या तिसऱया सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली. क्रीडा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी वृत्तसंस्थेशी बोलताना याला अधिकृत दुजोरा दिला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोनवेळा कांस्य जिंकणारी पीव्ही सिंधू गतवर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्य जिंकल्यानंतर उत्तम बहरात राहिली आहे.

    हैदराबादच्या या 22 वर्षीय दिग्गज बॅडमिंटन तारकेने 2016 चीन ओपन सुपरसिरीज प्रीमियर, इंडिया ओपन सुपरसिरीज स्पर्धा जिंकली. शिवाय, गत महिन्यात ग्लास्गो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. याशिवाय, याच महिन्यात तिने कोरियन ओपन स्पर्धेवरही आपले नाव कोरले. मकाऊमध्ये तीनवेळा विजेती ठरलेली सिंधू यंदा लखनौमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां प्रि स्पर्धेतही अजिंक्य राहिली आहे.

    एप्रिलमध्ये तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे मानांकन प्राप्त केले तर पुन्हा घसरण झाली तरी सेऊलमध्ये दमदार कामगिरी साकारत ती पुन्हा दुसऱया स्थानी झेपावली आहे. 2014 मध्ये तिने राष्ट्रकुल, इंचेऑन आशियाई, उबेर चषक व आशिया चॅम्पियनशिपमध्ये 4 कांस्यपदके जिंकली आहेत. यापूर्वी, मार्च 2015 मध्ये तिला पद्मश्री या भारताच्या चौथ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले आहे.

    No comments:

    Post a Comment