◆ महत्वाची बातमी ◆
संघ लोकसेवा आयोगाचे २०१८ च्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
★ २०१८ ची नागरी सेवा पूर्व परीक्षा ३ जूनला ★
संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने २०१८ या वर्षात घ्यावयाच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा(IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) भारतीय विदेश सेवा (IFS) आदी अखिल भारतीय आणि केंद्रीय सेवांसाठी घेण्यात येणारी २०१८ ची नागरी सेवा पूर्व परीक्षा (Civil Services Exam) ३ जून रोजी घेण्यात येणार आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, या नागरी सेवा पूर्व परीक्षेची अधिसूचना (जाहिरात) ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून ६ मार्च २०१८ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत राहणार आहे.
आपल्याला माहितच आहे की पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यातून नागरी सेवेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येते.
*किशोर गांगुर्डे, १५ ऑगस्ट २०१७
--------
UPSC released the tentative examination calendar for 2018
Civil services exam 2018 to be held on June 3
The Union Public Service Commission (UPSC) has released the tentative examination calendar for 2018 and has announced that the civil services preliminary examination will be conducted on June 3. Candidates preparing for this exam can note the important dates from the official website or check the calendar below.
----