~~~~
काळ, काम व वेग
==============
1) काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो.
2) काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
3) काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.
✔सुत्रे :
1) अंतर = वेग × वेळ
अंतर
2) वेग = ----------
वेळ
अंतर
3) वेळ = -----------
वेग
============================
*आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ*
आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....
18 X
वेळ = ------ × --------
5 v
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....
18 ( X + Y )
वेळ = ------ × -----------------
5 v
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....
✏ एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....
18 ( X + Y )
वेळ = -------- × -----------------
5 ( v - u )
एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....
18 ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
5 ( v + u )
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
रेल्वे वरील उदाहरणे सोडविताना एकक सारखे करणे गरजेचे असते. कारण दिलेला वेग हा किलोमीटर प्रती तास असतो, व काळ / वेळ सेकंदात आणि रेल्वेची लांबी (अंतर) मीटर मध्ये दिलेले असते. म्हणून वेगाचे रुपांतर मीटर प्रती सेकंद करावे लागते, त्या साठी वेगळा ५ / १८ ने गुणावे.
याउलट जर मीटर प्रती सेकंद चे रुपांतर किलोमीटर प्रती तास करावयाचे असेल तर वेगळा १८ / ५ ने गुणावे.
जर दोन ट्रेन एकाच दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची वजाबाकी करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.
जर दोन ट्रेन विरुद्ध दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची बेरीज करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.
वरील दोन्ही प्रकारात ट्रेन च्या लांबीची बेरीजच करावी.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●