मोनोट्रीमाटा
अंडी घालणारे स्तनधारी प्राणी "मोनोट्रीमाटा" या उपवर्गामध्ये येतात. या उपवर्गामध्ये केवळ दोन प्रकारचे प्राणी येतात. यापैकी एका आहे डकबील प्लेटीपस व दुसरा आहे एकीडना ( साळीद्र).
प्लेटीपस हा प्राणी बदकाप्रमाणे चोच असलेकारण डक हे नाव धारण करतो. हा प्राणी सहसा पाण्यामध्ये आढळतो. या प्राण्याकडे व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येते कि, या प्राण्याच्या पायाच्या बोटांमध्ये पडदा असतो, जो पोहण्याकरिता मदत करतो.
मोनोट्रीमाटा या उपवर्गाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
१. या उपवर्गातील प्राणी अंडी घालतात.
२. या वर्गातील प्राण्यांना स्तन ग्रंथी असतात. पण स्तन नसतात. या प्राण्यांमध्ये दुध हे त्वचेवर स्त्रवले जाते व केसांचा पुंजका होउन त्याचा वापर दुध पिण्याकरिता केला जातो.
३. या प्राण्यांच्या बालकांचा विकास सावकाश होतो, त्यामुळे पालक आपल्या अपत्यांची काळजी घेतात.
४. हे एकमेव स्तनधारी प्राणी आहेत ज्यांना इलेक्ट्रोरिसेप्शन असते.
५.इलेक्ट्रोरिसेप्शन म्हणजे या प्राण्यांना विद्युत क्षेत्र वापरुन आपल्या भोवती असलेल्या सजीवांचाशोध घेता येतो.
No comments:
Post a Comment