चालू घडामोडी (17 जून 2017)
संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसर :
- माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे.
- जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) दहाव्या आवृत्तीत ही माहिती देण्यात आली आहे.
- भारत हा आशियातील उदयोन्मुख नावीन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत 106व्या क्रमांकावर आहे.
- जगातील उदयोन्मुख 130 देशात भारताचे स्थान 60वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या 66व्या स्थानावरून भारत यंदा 60व्या स्थानावर आला आहे.
- भारत, केनिया, व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशांपेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
- संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीच्या ते नव्या उत्पादनांच्या संदर्भात जागतिक परिवर्तनात समृद्ध देशांचे वर्चस्व कायम आहे. सलग सातव्या वर्षी स्वित्झर्लंड अव्वल स्थानावर आहे.
50 हजारांपेक्षा जास्त व्यवहारासाठी आधार कार्ड अनिवार्य :
- बँकेत खाते उघडण्यासाठी आणि 50 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे.
- महसूल विभागाने याचा आदेश काढला आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड 31 डिसेंबर 2017 पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले.
- आधार नंबर न दिल्यास बँक खाते सक्रीय राहणार नाही. 2017-18 च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे.
- करातून पळवाट काढण्यासाठी लोकांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्डचा वापर करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
- आता व्यक्ती, कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना 50 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर, फॉर्म नंबर 60 देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अमेरिकेमध्ये होणार इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळा :
- भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचे जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.
- येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
- बॉलिवूड, मराठी सिनेमा तसेच टॉलिवू़डच्या सिनेमांनाही गौरवण्यात येणार आहे. तसेच हॉलिवूडच्या सिनेमात जे भारतीय कलाकार आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात अश्या दिग्गजांचाही या पुरस्कार सोहळ्यात विशेष गौरव होणार आहे.
- या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाहरूख खान इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
जर्मनीचे चान्सलर हेलमट कोल यांचे निधन :
- जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.
- 1982 ते 1998 या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
- हेलमट कोल यांचा जन्म 3 एप्रिल 1930 रोजी झाला होता. 1946 च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटीक युनियनमध्ये ते सामील झाले.
- 1990 च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व-पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
- 1982 ते 1990 या कालावधीत कोल हे पश्चिम जर्मनीचे चान्सलर होते. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर 1990 ते 1998 ते जर्मनीचे चान्सलर होते.
- जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक काळ (16 वर्ष) राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने विकासाच्या दिशेने वाटचाल केली.